Skip to main content

...उर्फ सुगरणीचा सल्ला : पोळ्या - एक अर्वाचीन छळ

लेखक मेघना भुस्कुटे यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 माझ्या स्वैपाकघरात घुसून वर आपला साटोपचंद्रीपणा पाजळणाऱ्या भोचक लोकांच्या खालोखाल त्रास जर मला कुणी दिला असेल, तर पोळीप्रेमी लोकांनी. आय हेट पोळी. चपाती. फुलका. घडीची पोळी. पुरणपोळी. आपापल्या सांस्कृतिक-राजकीय इतिहास-भूगोल-वर्तमानासह जे काय समजायचं असेल ते समजून घ्या. सगळ्याच्या सगळ्या इंटरप्रिटेशन्सना माझा तिरस्कार लागू आहेच. पहिलं कारण अत्यंत साधं आहे. मला पोळीची चव आवडत नाही. इथे अनेक 'तव्यावरून-पोळी-ताटात' पंथातले लोक जागीच अस्वस्थ झाले असतील. त्यांना तसंच तडफडू दे.

दृकश्राव्य विभाग :- पाककृती - मुंगोटे

लेखक सविता००१ यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2

आम्ही म्हणलो होतो ना, एक मांगो दोन देंगे... ! अरे दोन काय, तीन देंगे! एक व्हिडीओ काय मागता, तीन घ्या!! असं म्हणत हा अजून एक खमंग व्हिडीओ सविताच्या किचन मधून. नेहमीच्या फराळातून जरासा बदल हवाच हो. म्हणून ही जरा वेगळी पाककृती.
Footer

पड्यारमाम

लेखक पैसा यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 कवळे शाखेत बदली झाली, तेव्हा शाखा घराजवळ असल्याने मोठ्या उत्साहाने जॉइनिंग टाईम न घेता शाखेत दुसर्‍याच दिवशी हजर झाले. शाखेत पाय ठेवला, तेव्हा मॅनेजरची केबिन रिकामी होती. काउंटरवरचे काही चेहरे ओळखीचे होते. एक नवाच अनोळखी चेहरा 'मे आय हेल्प यू' काउंटरवर बसला होता. त्याचे वय बघता हा नवा क्लार्क नव्हे, हे सहजच लक्षात येत होते. चेहर्‍यावर भरपूर पावडर चिकटून बसलेली, कसला तरी उग्र वासाचा सेंट मारलेला आणि कपाळावर गंध.

पांढरा कावळा

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 झोळी पाठीवर घेतली. एक हात जमिनीवर टेकवून सावकाश उठलो. सूर्य टाळ्यावर आला होता. खडकाळ डोंगर. मृगजळांचं राज्य असलेली ती टेकाडं. हे बाभळीचं झाड किती वाळून गेलंय. कुठे एखादी पालवी दिसतेय का बघितलं. पण व्यर्थ. खालच्या तुटक्या फांदीवर कावळा बसलेला आढळला. तो 'काव काव' असं दोनदा ओरडला. आणि इथेच आक्रीत घडलं. देऊळ फारसं लांब नव्हतं. त्यावरची भगवी पताका अजूनही उंच फडकत होती. तिथूनच हात जोडले. सगळी त्याची कृपा. जगात कोट्यवधी कावळे आहेत. झाडून सगळे काळे. मग हाच कसा पांढरा?

तू माझा?

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 17/10/2017 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
हे तुझं असं अवेळी येणं आणि मोकळं मोकळं होणं... कसं बरं झेलू मी? माझं मन आणि ओंजळ; अपुरी आहे तुझ्या प्रपातासमोर! आणि सगळं जाणूनही, हे तुझं मला आपलंसं करणं.... आवडत मला. आणि मग... तू मागे ठेऊन गेलेल्या आठवणी.. जपते मी मनात हळुवार. तुझ्या आवेगला भितेही.... आणि तुझ्यात सामावून जायला आतुर अशी तुझी विरहणी!! अन् तू माझा... माझा..?
काव्यरस

ब्रॉडबँडचा वापर करुन आय पी फोन वापरता येईल का ?

लेखक मराठी कथालेखक यांनी मंगळवार, 17/10/2017 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
घरातील ब्रॉडबँडचा इंटरनेटचा वापर करुन आय पी फोन वापरता येईल का ? माझ्या घरी मोबाईलच्या नेटवर्क अनेकदा खूप खराब असते. कॉल ड्रॉप होणे, नीट ऐकू न येणे ई ई चालूच असते [स्थळ : चिंचवड] पण ब्रॉडबँड इंटरनेट सेवा (आयडिया) बर्‍यापैकी चांगली आहे. तर या उपलब्ध ब्रॉडबँड सेवेचा वापर करुन मी घरी आय पी फोन वापरु शकतो का ? असल्यास कसे ? मुख्य उद्देश घरात असताना सहज व नीटपणे कॉल व्हावेत इतकाच आहे म्हणून इतर काही पर्याय असल्यास सुचवू शकता. पण खालील पर्यांयाचा मी आधीच विचार केलाय. --> दूसरी मोबाईल सर्विस वापरणे.

चितळेंपेक्षाही जास्त माजोरडे दुकान!

लेखक mayu4u यांनी मंगळवार, 17/10/2017 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना? कालपर्यंत मी सुद्धा अशी काही कल्पना केली नव्हती... पण सत्य हे कल्पनेपेक्षाही विचित्र असते, याचा फर्स्ट ह्यांड अनुभव घेतला मी! =============================================================================== कार्यालयीन कामानिमित्त गेल्या आठवड्यात बंगलोरास आलेलो, आणि वीकेंड मैसुरच्या कार्यालयात घालवून, धनत्रयोदशीच्या संध्याकाळीच घरवापसी करणार होतो. हा मैसुर म्हणजे महिषासुराचा धाकटा भाऊ आणि बकासुराचा चुलत भाऊ असावा असं उगीच वाटत रहातं. असो. तर, दिवाळीच्या आधीच्या वीकांताला मी घरात नसल्याने सौ तुफान चिडलेली...

गाण्यांचे शब्द व आमचे मजेशीर शब्द

लेखक dadabhau यांनी मंगळवार, 17/10/2017 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मराठी शाळेच्या दिवसात म्हणजे बच्चनभौ शिखरावर असतांना (जेव्हा दूरदर्शन आमच्या गावात आलेले नव्हते) हिंदी मराठी गाणी फक्त रेडिओ वर च कानावर पडत ( विविधभारती म्हणजे जीव कि प्राण होता आमचा !!) आमच्या गावाच्या पूर्वेस एक ओपन टाकी ( टॉकीज नव्हे...टाकीच) होती , दर मंगळवारी म्हणजे बाजारच्या दिवशी शिनेमा बदलत असे. नवीन आलेल्या पिच्चर चे पोस्टर हातगाडीवर ठेवून ढोल ताशाच्या गजरात गावभर मिरवत असत. आम्ही मुले त्या गाडीमागे गावभर फिरून त्यांच्या जाहिरातीस हातभार लावत असू. देवीची यात्रा १५ दिवस चाले व आमच्या शाळेस सुट्ट्याच असत.