Skip to main content

फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १

लेखक रा.म.पाटील यांनी रविवार, 21/01/2018 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! (Decorate Your Love..) कथा - १ संक्रांत.. (प्रेमाचे उत्तरायण..) आज तिचा आरशासमोर नेहमीपेक्षा जास्त वेळ जात होता. दररोज ती स्वतःसाठी सजत होती पण आजचा तिचा साजश्रुंगार दुसऱ्या कोणासाठी तरी.. ज्याला तिला आपला करायचं होतं, त्याच्यासाठी होता. आज ऑफिसमध्ये संक्रात स्पेशल सर्व महिला वर्ग साडी नेसून येणार होता. हीच संधी होती तिला त्याला आकर्षित करण्यासाठी..! त्यासाठी काल तिने तिचा पूर्ण रविवार खर्ची केला होता. हवी तशी साडी शोधता शोधता तीचे अविरत श्रम झाले होते.

एपि फनी श्रद्धा, ऑर्थोडॉक्स पुतीन

लेखक माहितगार यांनी शनिवार, 20/01/2018 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
पुतीन हे रशियाचे बर्‍याच वर्षांपासूनचे अध्यक्ष, अजून एकदा अध्यक्षीय निवडणूक रिंगणात आहेत. आमेरीकेत मागच्या वर्षी ओबामा जाऊन ट्रंप सरकार आल्यामुळे आमेरीकन टिका कमी झाली असली तरी युरोमेरीकन माध्यमे अजूनही पुतीन बद्दल टिकात्मक मजकुर छापत असतात. पुन्हा एकदा अध्यक्षीय निवडणूकीस उत्सूक ६५ वर्षीय व्लादिमीर पुतीन यांनी फूल मिडीया ग्लेअर मध्ये सलमान खान स्टाईल शर्ट काढून ठेवला आणि त्यांच्या रशीयन ऑर्थोडॉक्स श्रद्धेनुसार पवित्र स्नानासाठी -६ डिग्री सेल्सीअस तापमानातील खुल्या तलावात डुबकी मारली.

सर्व द्रव्यांमधला समान धागा कोणता? (What is the similarity between all the nine substances)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी शनिवार, 20/01/2018 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
राजा कालस्य कारणम्..म्हणजे राजाच्या इच्छेने राज्यात बऱ्याचश्या गोष्टींना चालना मिळते. घरातल्या कर्त्या पिढीच्या मताने घरातल्या गोष्टी घडतात. विक्रमाच्या राज्यातही काही वेगळे घडत नव्हते. पण सृष्टीमध्ये अशाही काही गोष्टी घडतात की जिथे असा कोणी माणूस, कोणी सजीव काही करताना दिसत नाही. जसं लोहचुंबक(magnet) जवळ आल्यावर गुळाला मुंगळे चिकटावे तसा लोहकीस त्याला चिकटतो. थंड पदार्थ व गरम पदार्थ जवळ जवळ ठेवल्यावर थंड पदार्थ काही अंशी गरम होतो व गरम पदार्थ काही अंशी थंड होतो. थंडीत तेलाचा व तुपाचा दिवा लावावा, तर तेलाचा दिवा जळत राहतो पण तुपाच्या दिव्यातले तूप सतत गरम करावे लागते, नाहीतर दिवा शांत होतो.

(जरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 19/01/2018 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
जर विशालची तरही तर आमची जरही (जरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला मोकळे हापिसात् कधिही, व्हायचे नव्हते मला या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला, कळ उठता पोटातूनी, दाबूनी ठेउ किती? दर्प जहरी इतरे जनांना, द्यायचे नव्हते मला आज गडबड जाहली पोटामधे माझ्या कशी? करपट ढेकर द्यायची, मिटींग मधे नव्हती मला वेळ नाही काळ नाही, ना कुणाची लाजही, पाचवी वाटी बासुंदीची , प्यायची नव्हती मला, पोट भरण्या अर्थ नव्हता, पंगती मधे तुझ्या खात आलो मी जरीही, खायचे नव्हते मला पैजारबुवा,

शब्दविता

लेखक फुंटी यांनी शुक्रवार, 19/01/2018 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेला अर्थ नसावा संदर्भ नसावा विचारांचा मागमूसही नसावा शब्दांच्या शिड्या नसाव्या नसावेत अर्थाचे मनोरे कवितेतून काहीतरी सापडलंच पाहिजे अस काही नाही कवितेला नसावी अस्मिता नसावा द्वेष , नसावा क्रांतीचा ललकार कवितेत नसावा गूढ वगैरे अर्थ सापडूच नये संदर्भाला स्पष्टीकरण कवितेत नसावा निसर्ग कवितेत नसावे दुःखाचे डोंगर नकोत आनंदाचे चित्कार नकोत मनाचे हुंकार नकोत जातीधर्माचे अन्याय नसावी जगण्याची भौतिकता नसावे मोहाचे आगार नसावी प्रणयाची धुंदी नसावा विरह एवढ सगळ नसल्यावर मग उरेल काय ?? उरेल असंबंध शब्दांची मांडणी वेडीवाकडी मुक्त धुंद अव्यक्त भ्रमांचा मोठा नद वाहेल एका कवितेच्य

अनवट किल्ले २६: खानदेशाचे वैभव, भामेर, रायकोट ( Bhamer, Raikot )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 19/01/2018 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
धुळे जिल्ह्यात असणाऱ्या पाच डोंगरी किल्ल्यांमध्ये सर्वात सुंदर डोंगरी किल्ला म्हणजे भामगिरी अथवा भामेरगड. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धुळे - सुरत महामार्गावर धुळ्यापासून ५० किमी अंतरावर असलेल्या ह्या गडाची उंची समुद्रसपाटीपासून २५०० फुट आहे. एकेकाळी अहीर राजांनी राजधानी असलेला हा किल्ला भामेर गावाभोवती नालेच्या आकारात पसरलेला असुन या किल्ल्याने व शेजारच्या डोंगराने गावाला ३ बाजूंनी कवेत घेतल्यामुळे गावाला नैसर्गिक संरक्षण लाभलेल आहे. उरलेल्या चौथ्या बाजूला दुहेरी तटबंदी व प्रवेशद्वार बांधून त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी गावाला व किल्ल्याला संरक्षित केले होते.

वलय (कादंबरी) - प्रकरण ४

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 19/01/2018 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण ३ ची लिंक: http://www.misalpav.com/node/41807 --- प्रकरण 4 एकदा सोनी आणि सुप्रिया रूमवर नव्हते तेव्हा दुपारी एक वाजता गरमागरम “राजमा चावल” खातांना रागिणीला एक फोन आला. नंबर ओळखीचा वाटत नव्हता. पलीकडून आवाज आला, “जानू, पहचाना मुझे?” तो आवाज ऎकताच ती एकदम अस्वस्थ झाली. चमचा तसाच ताटात ठेवून ती डायनिंग टेबल वरून उठली आणि अस्वस्थपणे बोलत बोलत बेडरूम मध्ये गेली. जेवतांना त्या काॅलवर बोलणे तिच्यासाठी जवळपास अशक्य होते. “क क कौन? रा राहुल गुप्ता?” घाबरत रागिणी बोलली. “अरे वा! ठिक पहचान लिया तूने!

प्रवास

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 19/01/2018 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास तो म्हणाला, ‘मोना, प्लान चेंज! अब हम रेलसे नहीं, driving करके जायेंगे!’ त्याने गाडी बाहेर काढली, तेव्हा ती तिच्या कोषातून बाहेर पडली . गाडी शहरातील धूळधूर अंगावर घेत, गर्दीतून वाट काढू लागली. गाडी शहराबाहेर आली, त्याला तरतरीत वाटू लागले.....

आठवणीतला घरचा मेवा -२

लेखक जेडी यांनी शुक्रवार, 19/01/2018 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीतला घरचा मेवा -१ पावसाळ्यातल्या पदार्थ तसे फारसे नसत पण आषाढ लागला कि आषाढ तळणे हे एक काम असे . त्यात मग मुख्यतः तिखट आणि तळणाचे पदार्थ असत . चकली, खाऱ्या शंकरपाळ्या, तिखटाच्या पुऱ्या असे ते पदार्थ असत . आमच्या कोल्हापुरी भागात कर्नाटकी बेंदूर असतो तर तोही असाच जून जुलै महिन्यात येतो तर त्यासाठी खडूगळी (कडबोळी ) केली जात . बोली भाषेत खडूगळीच म्हणतात . हे म्हणजे तेच बेंदराला मातीच्या बैलांच्या शिंगात गोल जे वळे घातलेले असत तेच . त्यात हरबरा डाळीचे पीठ, कणिक आणि गूळ असे भिजवून त्याची गोल गोल वळी बनवायची आणि नंतर तळायची .

कुणी घरटं देतं का घरटं !

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 18/01/2018 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
(लेखातील माहिती जालावरून संकलित केलेली आहे.) आपले लहानपण 'एक घास चिऊचा , एक घास काऊचा' असे ऐकण्यात गेले. 'चिऊताई चिऊताई दार उघड असे विनवणारा कावळा आणि त्याला न जुमानणारी चिमणीही असायची. माणसाला हा नखरेलपणा बहुधा आवडला नसावा. अक्षरक्षः रस्त्यावर आणले हो त्याने दोघांना. कावळ्यालाही पिंडापुरते ठेवून त्याचाच पराचा कावळ केला. आज ते दोघे 'कुणी घरटं देतं का घरट' असा चिवचिवाट करत असतील असं उगीचच वाटत राहत. पण मला खात्री आहे की पक्ष्यांची ही भाषा माणसाला कधी कळणारच नाही.