Skip to main content

सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..

लेखक Jayant Naik यांनी गुरुवार, 26/04/2018 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा .. प्रसंग पहिला. एका तरूण मुलीच्या मागे चार ते पाच जण शाळेची बस घेऊन लागतात. ती मुलगी दुचाकी वरून कॉलेज मधून घरी येत असताना, तिचा पाठलाग करतात आणि बस आडवी घालून तिच्या दुचाकीचा अपघात घडवून आणतात. ती मुलगी जखमी होते . अगदी चित्रपटात घडते तसे दृश्य ...पण इथे खरे घडणारे ….त्या मुलीच्या जीवाचे काही बरे वाईट झाले नाही हे तिचे भाग्य. पण झाले असते तर ? प्रसंग दुसरा. एक दत्तक घेतलेली मुलगी . काळी सावळी. गोरी अजिबात नाही . तिच्या आईला ती गोरी व्हायला हवी आहे. कोण काय सल्ला देते तर कोण काय ? एक सल्ला.

द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ६ (अंतिम)

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 26/04/2018 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – १ द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – २ द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ३ द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ४ द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ५ पूर्वसूत्र : मी तो कोयता हातात घेतला आणि कोयंड्याच्या विरुद्ध बाजूच्या बिजागरीच्या सापटीत त्याचे धारदार चपटे टोक घालून किंचित जोर दिला.

फसता फसता जमलेली गोष्ट

लेखक शाली यांनी गुरुवार, 26/04/2018 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
मी शक्यतो मंगळवारी कोणतही महत्वाचे काम करत नाही. काही तरी सुचलेलं लिहूण काढणे किंवा फुटपाथवरील पुस्तकांची, रद्दीची, एमपी3ची दुकाने धुंडाळणे, जुन्या बाजारात भटकणे किंवा एखाद्या मित्राला सरप्राईज व्हिजीट देणे याच भानगडीत दिवस जातो. बऱ्याच जणांना वरिलपैकी एकही गोष्ट आवडत नाही. पण माझ्याकडे असलेल्या अनेक दुर्मीळ गोष्टी याच सवयीतुन मला मिळाल्यात. या मंगळवारी मी अति ऊन्हामुळे बाहेर जायचे टाळले होते. घरीच पुस्तके विषयवार लाव, लॅपटॉपची सफाई, बॅकप घे, पुस्तके विषयवार लाव यात गुंतलो होतो. इतक्यात बेल वाजली. मी डोअर आय मधुन पाहीले तर मित्र हात हलवत होता. आता हे साहेब कशाला आले? असं वाटलं.

मी स्वप्न पाहत नाही

लेखक खिलजि यांनी बुधवार, 25/04/2018 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी स्वप्न पाहत नाही कारण , मला ते पडत नाही नेहेमी ठरवतो आज झोपल्यावर स्वप्न बघायचे काहीतरी वेगळंच बनायचे मी पडतो , लकटतो त्या पलंगावर विचार हाच असतो , कि आज स्वप्न बघायचे डोळे काही मिटत नसतात स्वप्न कुठले बघायचे नि कसे ? याचेच विचार मनात घोळत असतात हळूहळू झापड यायला लागते डोळे जड होत जातात , निद्रादेवी प्रसन्न होते मिट्ट काळोख , कसलीही आठवण नाही , कसलीच साठवण नाही डोळे उघडतात , पण तोंडावर पाणी शिंपडून पुन्हा एक तासभर पलंगावर तस्साच पडून राहतो काही स्वप्न पडलं का ?