Skip to main content

चावट रश्श्यांची दुनिया !

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 11/05/2018 15:06 या दिवशी प्रकाशित केले.

काल खफवर रश्श्याची चर्चा वाचली.  लिहिणाऱ्याने रशियाची आठवण काढली होती आणि मालकांसहित सर्वांना तरतऱ्हेचे रस्से आठवू  लागले. त्यांची नावे वाचूनच जीवाचे (आणि जिव्हेचे) पाणी पाणी झाले. मग रश्श्यांच्या दुनियेत मनानेच फेरी मारली.

रस्सा हा तसा चावट किंवा खरं म्हटलं तर चाबरट खाद्य-प्रकार ! तामसी खाणे या क्याटेगरीत येणारा. मराठी माणसाला रस्सा भुरकण्याचा प्राचीन काळापासून नाद !

अनवट किल्ले ३२ : डेरमाळ ( Dermal )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 11/05/2018 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला म्हणजे कसमादे ( कळवण-सटाणा-मालेगाव-देवळा ) परिसरात काही अफलातून किल्ले आहेत. मात्र शिअवछत्रपतींच्या साम्राज्याचा इकडे विशेष विस्तार न झाल्याने, तसेच मुख्य मार्गापासून काहीसे आडबाजुला असल्याने हे गडकोट फारचे कोणाला माहिती नाहीत. अगदी क्वचितच दुर्गप्रेमी इथे भेट देतात. यापैकी एक म्हणजे, "डेरमाळ". नुकतीच आपण गाळणा किल्ल्याची ओळख करुन घेतली. या परिसरातील गाळणा हा महत्वाचा किल्ला असल्याने या सर्व डोंगराना गाळणा टेकड्या म्हणतात. मालेगावच्या इशान्येला, नामपुर-ताहराबाद रस्त्याजवळ या गाळणा टेकड्यात एक दुर्गरत्न विसावलेले आहे, "डेरमाळ".

आयुष्य म्हणजे काय रे भाऊ?...

लेखक अबोलघेवडा यांनी शुक्रवार, 11/05/2018 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
एकंदरीत काहीतरी philosophical लिहायचा मूड झाला आज. सोसायटीची मीटिंग झाली. त्याच त्याच चर्चा, तेच तेच विषय.. आयुष्यात नाईलाजास्तव करावी लागणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे आपण राहतो त्या सोसायटी च्या कमिटी मध्ये काम करणं. परमेश्वर सगळी सुखं हात जोडून समोर उभी येऊ देत नाही. म्हणून जेव्हा आनंदाने मनस्वी जगायचं ठरवलं तेव्हा परमेश्वर म्हणाला थांब. अजून हिशेब चुकते करायचेत तुझ्या पापांचे. आणि मग मी सोसायटी चा सचिव झालो. दर दिवशी आपण जगत असतो. वास्तविक जगणं हे सहज सुलभ असलं पाहिजे. पण आपण जगण्यासाठी किती आटापिटा करत असतो! आपल्या देशात हा आटापिटा जरा जास्तंच असतो अमेरिका, इंग्लंड देशांच्या मानाने.

फुलांचा फोटो

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/05/2018 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
‘ती आज येईल, तेव्हा तिला सांगेन,’ मनोहर कॅमेऱ्याची लेन्स पुसता पुसता स्वतःशीच म्हणाला. ‘तिला कळत नसेल, असं नाही, पण तिच्या लक्षात आलं नसेल. आपल्यातरी कुठं लक्षात आलेलं आधी!?’ सोनेरी फ्रेममधून त्याने बाहेर नजर टाकली. पाचगणीचा table land सकाळच्या कोवळ्या उन्हात फार लोभस दिसत होता. आज या batchला घेऊन जायचं होतं. आधी या मैदानावरून एक चक्कर, मग दऱ्याखोऱ्यात , जंगलात .....निसर्गाची प्रत्येक फ्रेम सुंदर, कशाचेही फोटो काढा! .... अठरा मुलंमुली, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या. आज तिसरा, उद्या शेवटचा दिवस. उद्या संध्याकाळी सगळे पांगतील. पुन्हा गाठ पडतील, न पडतील.... मनोहरला हे नवे नव्हते.

छत्रपती संभाजी महाराजांचे एक तथाकथित चित्र

लेखक मनो यांनी गुरुवार, 10/05/2018 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीराजांविषयी एक फेसबुक पोस्ट पाहण्यात आली. तिच्याबरोबर एक चित्रही होते. अर्थातच मी मोठ्या उत्सुकतेने लगेच उघडली. चित्र तर मी आजपर्यंत पाहिलेले नव्हते. छत्रपती संभाजीराजांची अगदी एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी चित्रे आजवर उजेडात आली असल्याने छत्रपती संभाजीराजांचे नवीन चित्र म्हणजे फार मोठा शोध होता. त्याला तितक्याच बारकाईने तपासून पाहायला हवे होते. पण दुर्दैवाने ते चित्र कुठले ते त्या पोस्टमध्ये काही लिहिलेले नव्हते. इंटरनेटवर बरेच शोधूनही मला काही ते चित्र मूळ कुठले ते सापडले नाही.

कोकण सफ़र भाग २ - दिवेआगर, आंजर्ले, हर्णे, पाळंदे

लेखक सतिश पाटील यांनी गुरुवार, 10/05/2018 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस दूसरा- सकाळी ७ ला उठून भरपेट नाश्ता करुन १० वाजता निघालो, आजचा प्रवास ८० किमी बागमांडलाची जलफेरी धरून.

स्वानंदासाठी

लेखक शाली यांनी गुरुवार, 10/05/2018 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
नारदमुनींना आज काही करमत नव्हते. बरेच दिवस झाले होते ‘ईकडची बातमी तिकडे’ करुन. देवलोकात, मृत्यूलोकात चक्क शांतता नांदत होती. शांतता असली की मुनीजी अशांत होत. “काय करावे?” या विचारात सगळे ‘लोक’ पायाखाली घालून झाले पण काही सुचेना. तसं म्हटलं तर ‘लावालावी’ करायला कितीसा वेळ लागतो? पण नारदांची तत्वे आड येत होती. पहिले म्हणजे कळ लावायची पण फक्त सत्याचा आधार घेऊन. ज्याला भडकायचे आहे त्याने स्वतःच बातमीचा गैरअर्थ काढून भडकावे. आणि दुसरे म्हणजे कळ लावल्याने मनोरंजन होत असले तरी फक्त मनोरंजन म्हणून कळ लावायची नाही. त्यातून काही तरी भले व्हावे, कुणाला तरी शिकायला मिळावे, धडा मिळावा.

स्कॉसपूस प्येग बाबा , स्कॉसपूस प्येग ( अर्थातच प्रेरणा )

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 10/05/2018 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
स्कॉसपूस प्येग बाबा , स्कॉसपूस प्येग फक्त एक मारा मग वर होतील ल्येग जास्त पैक नकोत त्याला मारा बाजारात फेरी क्वार्टरला जोड द्या पिळून हापूसची कैरी आकाश होईल काळेनिळे दिसेल पुब्लिश भारी जीभ होईल जड मग सुटतील नव्या फैरी कसले वेब आणि कसले सायन्स इथे "थोमोस रयुतर" पण मिळेल जो मारल स्कॉसपूस प्येग फक्त तोच पेपर टंकेल टंकत सुटा पेपर सारे सोडा , सोडा आंजावारी जोडीला एक क्वार्टर ठेवा नि सोबत हापूसची कैरी एकच बस्स , पुरे झालं, असा नसतो क्रायेतीरिया डोकं चालत नाही तोपर्यन्त ठोकत जा जोपर्यंत येते नवीन आयडिया टंका हळूच विचार करून काम बघून नि मापून टंकता येत नसेल तर
काव्यरस

दोसतार-८

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 10/05/2018 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://misalpav.com/node/42569
अशी मुले शाळेत घेताना त्यांची तोंडी परीक्षा कशी घेतात हे एकदा मला बघायचंय. या शाळेतही असा एखादा कोणीतरी मुलगा नक्की असणारच. मला प्रश्न होता की ढगाची पाठ कुठे असते. कुणालातरी विचारावे असा विचार आला पण चुकुन ज्याला विचारावे तो गण्यासारख्या निघाला तर काय या धास्तीन मी तो प्रश्न गिळून टाकला.
मुळात ढगाला आपण भॉ...

प्रश्नोत्तरे

लेखक मार्मिक गोडसे यांनी बुधवार, 09/05/2018 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर लेखन करण्यासाठी काही पर्याय दिलेले आहेत. मला प्रश्न विचारायचे असल्याने मी, प्रश्नोत्तरे हा पर्याय निवडला असता खालील प्रमाणे मेसेज येतो. You are not authorized to access this page. हा मेसेज फक्त मलाच दिसतो की इतरही मिपा सदस्यांना येतो? का ठरावीक सदस्यांसाठीच ही सुविधा आहे? गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस फुड फोटोग्राफीसाठी मीपा स्पर्धा आयोजकांनी प्रवेशिका मागितल्या होत्या. चार महिने होऊन गेले अद्याप फूड फोटोग्राफी स्पर्धेचे फोटो प्रदर्शित केले गेले नाही. स्पर्धा आयोजकांना स्पर्धेच्या धाग्यावर अधून मधून ह्याबद्दल विचारणा केली ,तरी अद्याप खुलासा केला गेला नाही.