Skip to main content

शेवट

लेखक मनुष्य यांनी बुधवार, 27/06/2018 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
पंधराव्या मजल्यावरून खाली बघताना तिच्यात कसलीच भावना नव्हती. फक्त वरून सारं जग खेळण्यातलं वाटत होतं. टेरेसच्या कठड्यावर चढताना तिच्या पायांना सुरवातीला घाम सुटला होता पण आता भितीची कणभर ही जागा तिच्यात उरली नव्हती. फक्त श्वासांचा आवाज आणि वाऱ्यामुळे कुडत्याचा फड-फडण्याचा आवाज. पण सकाळच्या पाखरांची किलबिल तिच्या काना पर्यंत पोहोचत नव्हती. एक दिर्घ श्र्वास घेत तिने डोळे मिटले. कोणतातरी पाखरू अलगद तिच्या खांद्यावर येऊन बसल्याचा भास तिला झाला आणि मनाने ती थेट बालपणात जाऊन पोहचली. "एक होती चिऊ" अशी बोलणारी आई. इवल्याशा फाईटने जोराचं लागलं असं खोटं-खोटं ॲक्टिग करणारे बाबा.

सुखाचं मृगजळ

लेखक अबोलघेवडा यांनी बुधवार, 27/06/2018 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी एका मित्राची भेट झाली. थोडासा दुःखी वाटत होता. मी विचारलं काय झालं? तर म्हणाला बायकोशी पटत नाही. मी परत विचारलं, अरे हे काय अचानक? तर म्हणाला अचानक वगैरे काही नाही. तसं लग्न झाल्यापासूनच आमचं बऱ्याच गोष्टींवर पटत नाहीये. पण आता जरा त्याची फ्रिक्वेन्सी वाढली आहे. त्याला म्हटलं अरे एकदा का कळलं ज्या गोष्टींवर पटत नाही की मग त्या गोष्टी उगाळा कशाला? ज्या गोष्टींवर तुमचं पटतं तेच बोलत जा ना तिच्याशी. तर मला म्हणाला ‘अरे तुला काय माहित आमचं कुठल्या गोष्टींवर पटतं ते.

न्युयॉर्कराज्यातील एक भटकंती : वॉटकिन ग्लेन्स स्टेट पार्क - गॉर्ज ट्रेल

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 27/06/2018 02:09 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच केलेल्या एका ट्रिप मध्ये Watkins Glen State Park मध्ये जाण्याचा योग आला. हे पार्क न्युयॉर्क राज्यातील फिंगर लेक्स च्या भागात येत. फिंगर लेक्स हा पाच सहा अत्यंत निमुळत्या लांबलचक तलावांचा प्रभाग आहे. अतिषय सुंदर , घनदाट झाडीने भरलेला प्रदेश त्यात ही आपण लहान्पणी चित्रात ज्या निळ्यारंगाने नदी /तलाव रंगवायचो तितक्या नितळ निळ्या रंगाचे लेक्स . अतिषय सुंदर क्लायमेट असल्याने भरभराटीला आलेल्या वाईनरीज . त्यामध्ये असणार्‍या सर्वात मोठ्ठ्या सिनेका लेक जवळील वॉटकिन ग्लेन्स हे नॅशनल पार्क ! ह्या इथे इंडियन ट्रेल आणि गोर्ज ट्रेल असे दोन अत्यंत सोपे ट्रेल्स आहेत .

आठवणी

लेखक चंद्रकांत यांनी मंगळवार, 26/06/2018 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
‘आठवणी’ एक लहानसाच, पण अर्थाचे अनेक आयाम असणारा शब्द. आनंदाच्या पाकळ्या घेऊन उमलत राहणारा, कधी वेदनांच्या व्यथा घेऊन कोमेजणारा. आठवणी समुद्रासारख्या अथांग. आभाळासारख्या अफाट. क्षितिजासारख्या अमर्याद. आयुष्याच्या वाटेवरून प्रवास घडताना इच्छा असो, नसो स्मृतींची सोबत घडत राहते. कुणासाठी त्या आनंदाचं अभिधान असतात, तर कुणासाठी वेदनांचे वेद. आठवणींचं पाथेय घेऊन निघालेली माणसे सुखांचे कवडसे हाती लागताना हरकतात. पदरी पडणाऱ्या वंचनेच्या वेदनांनी विकल होतात. त्यांचं असणं, नसणं जेवढं कालसापेक्ष तेवढंच परिस्थितीसापेक्ष. आठवणींच्या ओलाव्याने मनाचं आभाळ भरून येतं.

हजारो बेटांचा देश...... फिनलँड.... भाग २

लेखक बरखा यांनी मंगळवार, 26/06/2018 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/42878 भाग १ पहिले सुरुवात करुयात फिनलँडबद्दलच्या माहितीने. पहिल्या धाग्याच्या प्रतिक्रिया वाचल्यावर असे वाटले की या देशाबद्दल थोडी माहिती द्यायला हवी. म्हणुन ती पहिली देत आहे. नुसत नावावरून हे नेमक कुठ आहे? असाच भाव मी बर्‍याच जणांच्या चेहर्‍यावर बघितला. मी सुद्धा त्यातलीच एक. मग आंतरजालावर याची माहिती मिळवली. घराजवळची नेमकी खुण काय असे आपण विचारतो, त्या भाषेत सांगायचे झाले तर स्विडन आणी नॉर्वेच्या जवळ फिनलँड हा देश आहे. युरोपमधिल आठव्याक्रमांकावर हा देश आहे.या देशाची लोकसंख्या ५.५ दशलक्षच्या जवळपास आहे.

तेव्हा माघार घ्यावी....

लेखक Patil 00 यांनी मंगळवार, 26/06/2018 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
तेव्हा माघार घ्यावी.... जेव्हा आपलंच माणूस अनोळखी होतं ... तेव्हा... शांतपणे माघार घ्यावी....... जेव्हा संपतात सारी नाती काही सकारणं... अन काही विनाकारण.... तेव्हा पुरावे मागू नयेत नाती संपण्याचे..

टूर..टूर..

लेखक नजदीककुमार जवळकर यांनी मंगळवार, 26/06/2018 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी , तुम्हा सर्वांची मदत हवी आहे . ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान ७ दिवसांचा बजेट युरोप टूर कुटुंबासह (बायको, मुलगी वय ८,मुलगा वय ३) किंव्हा थायलँड (४ ते ५दिवस)करण्याचा बेत आहे. बजेट युरोप टूर कुटुंबासह : - प्रवासात/टूर मध्ये जास्त धावपळ नको - पॅरिस आणि स्वित्झर्लंड पाहायचेच आहे - बाकी अजुन कुठली ठिकाणं बघता येतील ? - मुंबई >>> पॅरिस >>> मुबई असा प्लॅन योग्य आहे ?

मनोमनी

लेखक Patil 00 यांनी मंगळवार, 26/06/2018 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
मनोमनी मनोमनी कोणाच्या काय असते कधी नाही कळायचे। समजा कळले असते तर अग बाई!अरेच्चा! व्हायचे।।