Skip to main content

यंत्र (भाग १)

लेखक गतीशील यांनी सोमवार, 08/10/2018 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
"पऱ्या, यार सिर्फ लास्ट answer दिखा दे, पास हो जाऊंगा भाई " ... परीक्षित हसला व त्याने आपली उत्तर पत्रिका मागे बसलेल्या अजयला दिसेल अशी ठेवली. परीक्षित सावंत, BE Mechanical Engineer ..वडिलांचा ऊर अगदी भरून आला होता जेव्हा परीक्षित चा फायनल इयरचा निकाल लागला तेव्हा. कारण साहेबाना एका प्रथितयश अश्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये पुण्यातच R & D मध्ये कॅम्पस selection मधून नोकरी सुद्धा लागली होती. परीक्षित तसा लहानपणापासूनच हुशार होता. नुसता पुस्तकी कीडा न होता तो चौफेर लक्ष ठेऊन असे. चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय राजकारण, संगीत, खेळ सगळ्यांचंच त्याला थोडेफार ज्ञान होते.

एवढंच करा.

लेखक अंतरा आनंद यांनी शनिवार, 06/10/2018 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाकडे प्रतिभेची कुंडले असतील तर, तर ती उतरवूनच ठेवावी. कारण ती मागणारे इंद्र, रस्तोरस्ती उतरलेत. तुमची प्रतिकं असतील मारे प्रत्यक्षाहून उत्कट तुम्हीहून ती जाळा. कारण प्रत्यक्षांच्या उरावर, त्यांना थयाथया नाचवणारे, तुमच्या अंगणात आलेत.

फ्रेंड !

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 05/10/2018 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
परिस्थितीचे चटके माणसाला शहाणं करतात की नाही, माहीत नाही. पण जनावरं मात्र या अनुभवांतून खूप काही शिकतात. परिस्थितीशी जुळवून घेतात आणि त्यावर मातही करून स्वत:चे जगणे सोपे करून घेतात. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एका दिवशी हा नवखा देखणा, बोलक्या डोळ्यांचा कुत्रा अचानक कुठून तरी आमच्या गल्लीत आला. चुकून आला, की घरात नकोसा झाला म्हणून कुणी आणून सोडला, माहीत नाही. काही लोक हौस म्हणून कुत्रे पाळतात, मग कालांतराने त्यामुळे होणाऱ्या गैरसोयी जाणवू लागल्या की त्यांना बेवारस स्थितीत लांब कुठेतरी सोडून देतात. घराच्या सावलीची सवय झालेली ही कुत्री रस्त्यावर आली की बावरतात. कावरीबावरी होतात.

मुंबई जयपूर अजमेर पुष्कर उदयपूर चित्तोडगड - 1

लेखक विकास... यांनी गुरुवार, 04/10/2018 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
जयपूर विमानतळावरून ओला कॅब लगेच मिळतात. . जयपूर ते सिंधी कॅम्प रुपये १५० - २००. सिंधी कॅम्प येथे बरीच हॉटेल आहेत. Hotel Arco Palace त्यापैकी एक बुक केले होते ९९९ मध्ये AC rooms आहेत. Online आणि app वर बुकिंग करता येते मोठ्या रूम्स आहेत. फॅमिली साठी एकदम व्यवस्थित सोय आहे. लिफ्ट आहे, सकाळी सहा ते उद्या संध्याकाळी सहा असे बुकिंग होऊ शकते (30 Hours). गरम पाणी, Tea/Coffee maker चालू होता coffee / tea kit दिले होते सिंधी कॅम्प मेट्रो स्टेशन हॉटेल मधूनच दिसते. सिंधी कॅम्प मेट्रो स्टेशन वरून udaipole ला मेट्रो ने जाता येते. Udaipole पासून छोटी चोपड ला रिक्षा मिळते.

दुत्त यजमाण, स्पष्ट गुर्जी-एक खरीखुरी टेस्ट म्याच!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 04/10/2018 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
यजमा'ण :-" काय गुर्जी, एव्हढ्यातच अलीकडे लग्न झालं म्हणे तुमचं!? " गुर्जी:-" हो!!!" यजमा'ण :-" आणि मुलगाही झाला लगेच! " गुर्जी:-" हो!!!!! " यजमा'ण :-" उशिरा होऊन बर जमलं(लवकर!) " गुर्जी:-"!!!" यजमा'ण :-" ह्या ह्या ह्या...15 ओव्हर झाल्यावर उतरलात खेळायला! " गुर्जी:-" (दु दु दु दु!!!) " यजमा'ण :-" तरी फास्टेस्ट फिफ्टी झाली की(तुमची!) " गुर्जी:-" (लउल्लूल्लूल्लूऊ) " यजमा'ण :-" भाग्यवान आहात. " गुर्जी:-" हो!!!!!!! " यजमा'ण :-" नायतर 15 ओव्हर नन्तर खेळणार्यांना पॉवर प्ले गेल्या(?)मुळे रिस्टरीक्षण ( क्षण???)येतात,त्यांनी पळून(!!!!)रन खूप काढावे लागतात नै!? हहा हहा हहा हहा हहा हहा हा!

चित्रातल्या कळ्या...

लेखक कलम यांनी गुरुवार, 04/10/2018 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नात रंगलेल्या चित्रातल्या कळ्यांनो फुलणे तव बघाया मी अधीर झालो फुलतील फुले तुमची देतील गंध ह्रदया रंगूनी टाकतील अन माझ्याही जीवनाला फुलबाग मग कदाचित मनीही फुलेल माझ्या मन ही म्हणेल गाणे जुळवूनिया सुरांना पसरेल गंध तुमचा गंधीत होई माती होईल पूर्ण गाणे जुळुनी नवीन नाती फाकेल सूर्यबिंब पसरेल दश दिशांना माझेच नवे जग हे दावीन जीवनाला पण ह्या मनास वेड्या सांगू कसे तुम्हाला फुलण्यास वेळ नाही चित्रातल्या कळ्यांना

मारवा

लेखक शिवोऽहम् यांनी गुरुवार, 04/10/2018 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
कालचीच असावी तशी आठवते ती गोष्ट फाटकाबाहेर तुझी वाट पहाताना थकली नव्हती रविवारची आळसावलेली सकाळ आणि तू आलीस, सावळी-सुंदर, किरणांचं पाणी प्यालेले ओले केस घेऊन, सुगंधी.. पाकळ्यांवर दवं सावरणाऱ्या शेलाट्या निशिगंधासारखी. आणि दिसलीस फलाटावर वाट पहाताना त्या घुसमट गर्दीतही तुझं हसू तेवत होतंच तेच आठवतं अजून तुला आठवताना.. पण तुला जाणवले का माझे हात हासत 'दे टाळी!' म्हणताना कधी? जेंव्हा हिंडलो निवांत फुटपाथवर पुस्तकं धुंडाळत असू देत कितीही फसवं आता पण काही घडलं नसतं का निराळं? जेंव्हा तू बोलत होतीस भरभरून जाणाऱ्या क्षणांना थांबवणाऱ्या स्वप्नांबद्दल.. आणि प्रवास थांबूच नये वाटलं होतं मूक पाषाणशिळां