Skip to main content

तू का राम??

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 10/10/2018 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
डॅशिंग आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या कारवायांच्या कहाण्या म्हणजे आजकाल अविश्वसनीयच वाटाव्यात असेच प्रकार असतात. नाशिक मनपाचे आयुक्त असलेल्या मुंढे यांनी आजही अशीच धडक कारवाई केली. नवरात्रीनिमित्त कालिका मंदिरात तुकाराम मुंढे आरतीकरिता पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी मंदिरात आणि प्रसाद स्टॉल्सवर त्यांना प्लास्टिक दिसले. राज्यात प्लास्टिकबंदी असूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पाहून, आयुक्त तुकाराम मुंढे चांगलेच भडकले.

बोनेदी बारीर पूजो

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 10/10/2018 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
“महालय आच्छेन. आजे चॊक्खू दानेर दिन !” (पितृपंधरवडा संपतोय आज, आज देवीच्या मूर्तींना डोळे रेखण्याचा - चक्षु-दानाचा दिवस आहे) माझे मित्र राधामोहन बाबू उत्साहात बोलले आणि मी मनातल्या मनात जुन्या कोलकाता शहराच्या अरुंद रस्त्यावरून कुमारटोली (कुंभारवाडा) भागात फेरी मारून आलो सुद्धा. कोलकात्याच्या दुर्गापूजेची महती आणि मोहिनीच तशी आहे. चला तर, तुम्हालाही माझ्यासोबत थोडे फिरवून आणतो. 'दुर्गापूजा' (बंगालीत फक्त 'पूजो') असा नुसता शब्द जरी ऐकला तरी समस्त बंगालीजनांचे डोळे लकाकतात आणि चेहऱ्यावर हमखास स्मिताक्षरे उमटतात.

सुखदु:ख मीमांसा - एक अनेकरंगी अभ्यास

लेखक कवितानागेश यांनी बुधवार, 10/10/2018 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
सुखदु:ख मीमांसा - एक अनेकरंगी अभ्यास Emotions drive people and people drive performance, हे बोधवाक्य वाचून काय समजते? भावना मनुष्याला गती देतात आणि मनुष्य कृतीशीलतेला गती देतो. प्रत्येक कृतीमागचं कारण कुठलीतरी भावना हेच आहे. पण emotions, हा शब्द वाचून मात्र आधी कुणाच्याही डोळयासमोर उभे राहणारे चित्र आहे ते, अश्रूंनी भरलेले डोळे अन् व्याकुळ भाव! जास्तीत जास्त माणसांच्या मनात खोलवर रुजलेली अन् नकोशीही असलेली अशी हीच भावना आहे - दु:ख, सल, बोच, त्रास.... तीच भावना मूळापासून शोधून, उकलून, स्पष्ट करून, अभ्यासून तो गुंता सोडवताना केलेला एक सर्वांगीण अभ्यास, आपल्यासमोर पुस्तकरूपानी आलेला आहे.

यंत्र (भाग ३)

लेखक गतीशील यांनी मंगळवार, 09/10/2018 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
यंत्र (भाग १) https://www.misalpav.com/node/43400 यंत्र (भाग २) https://www.misalpav.com/node/43408 परीक्षितने मागे वळून बघितले तर एक ३५शी च्या आसपासचा पण रगेल दिसणारा असा एक माणूस त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत होता.. "बोला सावंत, काय म्हणताय?" "कोण तुम्ही?" परीक्षितने उसने अवसान आणून विचारले.. "चला जरा..आमच्या साहेबांना बोलायचं तुमच्याशी" "कोण साहेब? अन कुठे चला? मी येत नाही.ज्याला बोलायचं त्याला इकडे ये म्हणावं" "चल लौकर.

हा सागरी किनारा

लेखक केदार गाड्गीळ यांनी मंगळवार, 09/10/2018 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
हा सागरी किनारा । रवि दूर लोटताना हीरा राजा ची ही जोड़ी । थोडा भार सोसताना पाणी अथांग मुक्त । पक्षी शोधी निवारा। वाहे खटयाळ् वारा। हा सागरी किनारा बघता सखे तुला मी। क्षण होती धूंद धूंद। मग मंद होइ वारा। हा सागरी किनारा। हा सागरी किनारा रवि जाई सांज होइ ।भासे चंद्र कोंदणात। अन एक शुक्रतारा। हा सागरी किनारा ऋतू सांजवेळी खुलला। मनि मोगराच फुलला । आकाशी नक्षत्र नजारा। हा सागरी किनारा मन बावरे असे हे स्वप्नात ही नजारे ही कोणति नशा रे हा कोणता किनारा मन शोधता किनारा व्हावे कधी मि तृप्त मिटता तुज़्या कवेत म्हणती जश्या लाटा त्या सागरी किनारया मृद्गन्ध मि तू थेंब दवबिन्दु पावसाचे धरणी करिसी च

यंत्र (भाग २)

लेखक गतीशील यांनी सोमवार, 08/10/2018 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
यंत्र (भाग १) https://www.misalpav.com/node/43400 परीक्षित त्या गल्लीत डोकावून बघत होता. अजय गल्लीच्या आत थोडा पुढे जाऊन थांबला. १०-१५ मिनिटानंतर ऍक्टिवावरून एक मुलगी आली आणि अजय जवळ जाऊन थांबली. ते दोघे थोडा वेळ बोलत होते आणि मग दोघांनी आपापल्या गाड्या सुरु केल्या. हे बघताच परीक्षितने आपली गाडी स्टार्ट केली आणि U टर्न घेऊन रस्त्याच्या पलीकडे थांबला व स्वतःच्या गाडीच्या आरश्यातून मागे नजर ठेऊन उभा राहिला. ते दोघे त्या गल्लीतुन एक मागोमाग एक असे बाहेर आले आणि अमनोरा मॉल च्या दिशेने जाऊ लागले.

भयकथा: त्या वळणावर..

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 08/10/2018 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
"भेटलास का तू धर्मेंद्र साहेबांना? झालं ना तुझं काम?", जितेंद्र मला फोनवर म्हणाला. "अरे, काम झालं. अगदी मनासारखं. हा क्लायंट मला मिळाला. कोरम साहेबांकडे माझ्याखातर शब्द टाकल्याबद्दल धन्यवाद. मी त्यांच्यासोबत चांगला बिझिनेस करून त्यांचे मन जिंकेल, चांगल्या दर्जाचे प्रॉडक्ट त्यांना देऊन तू त्यांना माझ्यासाठी दिलेला शब्द सार्थ करून दाखवेन!", मी म्हणालो. आता रात्रीचे आठ वाजून गेले होते. हे काम सहा वाजता आटोपणार होते पण होता होता या ना त्या कारणाने उशीर झाला. मी जितेंद्रच्या शहरात म्हणजे अलकापूरला आलेलो होतो.

माळढोक पर्वाचा अंत झाला

लेखक खिलजि यांनी सोमवार, 08/10/2018 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
माळढोक पर्वाचा अंत झाला आता हळूहळू माळरानही संपेल अशीच भूक वाढत राहिली तर उद्या फक्त माणूसच उरेल तो डौलदार असेल , रुबाबदार असेल तो कसा होता ?

यलो ऑकर ची स्वप्ने

लेखक हर_हुन्नरी यांनी सोमवार, 08/10/2018 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
यलो ऑकर ची स्वप्ने : पानगळ सुरु झालीय नोव्हेंबर मधली सेकंदागणिक कोसळतायत हजारो स्वप्नं गवताच्या अगणित हिरव्या छटांमध्ये रानावनांत , जंगलात शहरातल्या पार्कात पडीक घरांच्या अवतीभवती धांदल नुसती अविरत एकेक पान पाहावं अगदी जवळून , गाढ , सुगंधी झोपेतल्या खुशबूदार स्वप्नासारखं पहिल्या धारेच्या प्रशियन ब्लू चे शिंतोडे सूर्याने जाळून टाकलेले कच्चे खाऊन टाकलेले रंग व्हर्मीलॉन रेड पासून बर्न्ट सिएना पर्यंत च्या सर्व रंगश्रुती अलगद ऐकाव्यात पान गळून पडताना किणकिणतात या श्रुती ...काही तुटक जिवंततेच्या हिरव्या खुणा छोट्या मोठ्या , नुकत्याच मेलेल्य

वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग २

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 08/10/2018 07:11 या दिवशी प्रकाशित केले.
(१९०१ व १९०४ चे पुरस्कार) १. या लेखनाची सुरवात आपल्याला अर्थातच १९०१च्या सलामीच्या पुरस्काराने करायची आहे. विजेता संशोधक : Emil A v Behring देश : जर्मनी संशोधकाचा पेशा : सूक्ष्मजीवशास्त्र संशोधन विषय : घटसर्प (Diphtheria) या रोगावर प्रतिविषाचे उपचार (serum therapy). आता आपण घटसर्प हा आजार समजावून घेऊ. हा एका जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. वैद्यकात त्याची नोंद इ.स. पूर्व ५ व्या शतकापासून आढळते.