Skip to main content

अच्छे चाचा कच्चे चाचा

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 14/11/2018 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
"स्वातंत्र्य दिल्यावर तथाकथित भारतीय नेते थोडयाच कालावधीत भारताची वाट लावतील.भारतीय लोकांकडे राज्य करण्याची क्षमताच नाहीय, ते फक्त गुलामच राहू शकतात.... " तत्सम इंग्रजी वल्गनांच्या गदारोळात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दिवसात स्वतंत्र भारतचे सक्षम नेतृत्व करू शकेल असा नेता जवाहरलाल नेहरू यांच्या इतका कुणी होता असे मला तरी आजही वाटत नाही. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेहरू हे सर्वात अधिक योग्य नेतृत्व होते. आज रुजलेल्या आणि प्रगल्भ होऊ घातलेल्या लोकशाही व्यवस्थेतल्या दिवसात त्यांच्या नेतृत्वाचे अनेक अंगानी विश्लेषण होईल वा होते आहे.

छकु

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 14/11/2018 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
छकु एकदा एक गंम्मत झाली.... माझी आईच शाळेत गेली. प्रयोग वही अपूर्ण म्हणून... हातावर पट्टी देखील ख्खाली; इंग्रजीच्या स्पेलिंगची; प्प्रॅक्टिस तिने नव्हतीच् केली... सरांनी 'ढ़ढ्ढोबा' म्हणताच मात्र, हिरमुसली झाली! 'छकुला नाव सांगिन....' अस मनातच म्हणाली; तेवढं म्हणून मग... माझ्यासारखीच खुश झाली. 'सारखा सारखा अभ्यास... मग खेळायचं कधी आम्ही? तुम्ही मोठे झालात..... आमच्यासाठी काही?' खूपसारं खेळून मग खूप खूप दमली; घरी येऊन एकदम 'हुश' करुन बसली. 'भूक लागली ग खूप छकु... खायला काय आहे? शूज काढून दे न....' म्हणे मी दमले आहे. 'अग तू आई नं... मग मी काय खायला देऊ?' म्हंटलं... शाळेत मिच जाईन...
काव्यरस

'सर्चिंग' आणि '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 13/11/2018 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी 'सर्चिंग' हा इंग्रजी सिनेमा पाहिला. बर्याच दिवसांनी एक चांगला, उत्कंठावर्धक रहस्यपट पाहिल्याचं समाधान मिळालं. अतिशय संयत हाताळणीमुळे 'सर्चिंग' एकाच मुख्य कथासूत्राभोवती प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. मला या चित्रपटाबद्दल आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे कुठलाच इतर फापटपसारा या चित्रपटात नव्हता. समांतर असणारी उपकथानके नाहीत; विनाकारण वाढवून ठेवलेली गुंतागुंत नाही; प्रेक्षकांना भुलवण्यासाठी रचलेले फसवे भूलभुलैय्या नाहीत. एकच प्रश्न आणि त्याभोवती फिरणारे, खरे वाटणारे नाट्य! एका माणसाची एक टीनेज्ड मुलगी एक दिवशी अचानक गायब होते.

माणूसकी

लेखक Prajakta Yogiraj Nikure यांनी मंगळवार, 13/11/2018 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
माणूसकी सुमन आज खूप आनंदात होती . का नाही असणार ? तिच्या मैत्रिणीचा मोनाचा फोन आला होता. तिने सुमनला व श्रीधरला भीमाशंकरला सहलीस येण्यास आमंत्रित केले होते . सुमननेही लगेचच होकार दिला. श्रीधर घरी आल्या आल्या तिने मोनाने त्यांना दोघांना निमंत्रण दिले आहे , हे सांगितले. त्यालाही ही कल्पना आवडली, सहलीस जाण्यासाठी सुमनने व मोनाने आवश्यक ती सर्व तयारी केली. ते सर्व इतके आनंदी होते की , सहलीला जाऊन काय करायचे , काय घ्यायचे याची यादी सतत तपासून पाहत होते.

Cold Blooded - ९

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 12/11/2018 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
रोहित अतिशय शांतपणे आपल्या आयपॅडवर काहीतरी वाचत होता. कोलंबियातून बॅट्रॅकटॉक्सिन आणणार्‍या डॉ. मालशेंच्या असिस्टंटची सखोल चौकशी केल्यावर त्याने थेट एअरपोर्ट गाठला होता आणि मिळालेली पहिली फ्लाईट पकडून रात्री अकराच्या सुमाराला तो मुंबईत उतरला होता. फ्लाईटच्या प्रतिक्षेत असताना त्याने डॉ. रेड्डींना फोन करुन डीएनए टेस्टच्या रिपोर्ट्सची चौकशी केली तेव्हा अद्यापही काही टेस्ट्स बाकी असून दुसर्‍या दिवशी सकाळी किंवा जास्तीत जास्तं दुपारपर्यंत त्याला रिपोर्ट इमेल करण्याचं डॉ. रेड्डींनी कबूल केलं होतं. संपूर्ण प्रवासामध्ये आतापर्यंतच्या तपासात पुढे आलेल्या माहितीची तो डॉ.

अवदसा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 12/11/2018 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष्मी पूजनाचा दिवस होता दिलीप चित्रे झपाझप पावले टाकत निघाला होता रात्र अमावास्येची असल्याने काळोख होता मात्र रस्त्यावर दिवे पणत्या मिणमिणती होत्या आसमंता तील वातावरणात एक भेसूर अमंगल अशी छटा जाणवत होती दिवाळीची थंडी -वा-याचे गार सपके त्याला जाणवत होते बाजूच्या रस्त्याने तो निघाला एक शॉर्ट कट होता रस्त्यावर अंधार मातला होता तो रस्त्याने कडे कडेने चालला होता त्याच वेळी समोरूम एक ट्र्क भरधाव वेगात आला -हेड लाईट्स फुल्ल ऑन होते चित्रे रस्त्याच्या कडेला अंग चोरून उभाहोता हेड लाईट्स च्या प्रकाशात त्याला दिसले तो उभा होता त्या बाजूलाच कुणी व्यक्ती झोपलेली होती ट्रक चा आवाज प्रकाशा झोत

महिलांचा T-20 वर्ल्ड कप २०१८

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 11/11/2018 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, खरे तर हा धागा श्रीगुरुजी काढतील असे वाटले होते, पण ...असो... आत्ता पर्यंत तरी ४ मॅचेस झाल्या आहेत. भारताच्या दृष्टीने आनंदाची बातमी म्हणजे, हरमनप्रीत कौरने काढलेले शतक...फक्त ५१ बॉलमध्ये १०३ धावा.. आस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने आपापल्या मॅचेस जिंकल्या आहेत तर, इंग्लंड आणि श्रीलंका ह्यांच्या मधली मॅच पावसामुळे वाया गेली... अजून अर्ध्या तासाने, भारत विरूद्ध पाकिस्तान मॅच सुरु होईल. रात्री १:३० वाजता, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड ह्यांच्या मध्ये सामना होईल. हरमनप्रीत कौर आणि भारतीय टीमला शुभेच्छा.... अधिक माहितीसाठी खालील लिंक बघा...

विश्वस्तवृत्तीकडे वाटचाल

लेखक arunjoshi123 यांनी रविवार, 11/11/2018 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
या जगाकडे पाहण्याचे दोन दृष्टीकोण आहेत- एक असा की हे विश्व निराधार नि निरीश्वर आहे. दुसरा असा की ते साधार नि ईश्वरप्रणित आहे. निराधार विश्व आपसूकच निरर्थक ठरतं. कारण शेवटी अशा विश्वातली प्रत्येक गोष्ट ही केवळ भौतिक स्वरुपाची असते. आणि स्वतःचे अस्तित्व असल्याचे भान असलेल्या, स्वतःस मुक्तेच्छा आहे असे मानत असलेल्या, बुद्धिमान, विवेकी, विचारी मनुष्यजातीस आपण केवळ करकच्च नियमांनी बांधलेले एक भौतिक पदार्थ आहोत असं सांगणं म्हणजे त्याच्या स्वतःसकट सगळं काही निरर्थक आहे असं सांगीतल्याजोगं आहे.

Cold Blooded - ८

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 10/11/2018 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
रोहित थंडपणे समोरच्या खुर्चीत बसलेल्या अल्ताफकडे पाहत होता. दिल्लीहून निघाल्यावर त्याने बरेली पोलीसांना फोन करुन अल्ताफला अ‍ॅरेस्ट करण्याची सूचना दिली होती. त्याचा फोन येताच इन्स्पे. शेख सादीकनी आपल्या स्टाफसह एजाज नगरकडे धाव घेतली. निसारच्या घराभोवती चारही बाजूला पोलीसांचं कडं उभं करुन ते आपल्या स्टाफसह आत घुसले. रात्री एक वाजता ध्यानीमनी नसताना पोलीस घरात घुसलेले पाहून तिथे एकच गोंधळ उडाला. आतल्या खोलीत असलेले अल्ताफ आणि रुक्साना जागे झाले होते. पण कोणतीही हालचाल करण्याची संधी मिळण्यापूर्वीच शेखनी त्याच्यावर झडप घालून त्याच्या हातात बेड्या चढवल्या होत्या!

समलिंगी संबंध ..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 10/11/2018 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी मिपा वर आले आहे.. पुन्हा थोडी आता लिहित जाईन म्हणते.. तुमची मदत लागेल.. एक लेख लिहिते आहे.. समलैन्गिकत्व ... लहानपणी म्हणजे साधारण ७वी मध्ये असताना एक मैत्रीण, घरी आलेले वर्तमान पत्र शाळेत घेऊन आली. आल्या आल्या तो पेपर हातात नाचवत म्हणाली.. ए हि बघा बातमी.. एका मुलीनं मुलीशीच लग्न केलं! असं म्हटल्या बरोबर आम्ही सगळ्याजणी त्या पेपर वर तुटून पडलो. नेमकं कसं कसं काय काय घडलं हे वाचायला प्रचंड उत्सुक होतो. बातमी निपाणी गावातली होती. हे असं काही घडणं म्हणजे किती चुकीचं वागतायत अशीच समजूत लोकांची होती, तेव्हाही आणि काही प्रमाणात आत्ताही!