Skip to main content

अतृप्त आत्मा -५

लेखक प्रमोद पानसे यांनी गुरुवार, 15/11/2018 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
मुळात आम्ही बाकीच्या कुणालाच दिसत नसताना हा डांबर गोळा आंम्हास कसाकाय बघु शकतोय ? या कल्पनेने आम्ही आश्चर्यचकित झालो होतो.पण चला कुणीतरी संपर्क साधतोय हेच खुप असं मानुन आम्ही द्रोणात तरंगत तीकडे निघालो. जवळ जाताच जाड्या खेकसला "काय राव ! केव्हाचा बोलावतोय .चला बसा पटकन बॉसने बोलवलय." "च्यायला ! बॉस ? कोण बॉस ?? त्या धसकटाला सांग जाउन आधी बोनस पाठव घरी मग बघु यायचं की नाही " आम्ही पण खेकसलो "अहो ! यावं लागेल आता तुम्हाला .तुम्ही मेलायत आणी यमदेवांनी बोलावणं धाडलय .मी दुत आहे त्यांचा .पोटावर नका मारु चला पटकन" च्यायला !

अतृप्त आत्मा -४

लेखक प्रमोद पानसे यांनी गुरुवार, 15/11/2018 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
गॕलरीतुन खाली बघितलं तर सर्व सक्रिय कार्यकर्ते आमची पालखी बांधत होते.

गावातला आड

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/11/2018 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे पूर्वी गावात आड असत. घरोघरी नसले तरी प्रत्येक पंधरा वीस घरांमागे एक आड असायचाच. घराच्या मागच्या दारी आड खोदला जायचा. जमिनीत चाळीस पन्नास हात खोल जाताच आडाला पाणी लागायचं. आडाची रूंदी चार बाय चार हात अथवा तीन बाय तीन हात असायची. या रूंदीला कडं म्हटलं जायचं. ‘आडनं कितीनं कडं घिदं?’ उत्तर यायचं ‘चार हात’. ‘हेरनं (विहिरीचं) कितीनं कडं घीदं?’ उत्तर यायचं ‘बारानं कडं’. (म्हणजे बारा बाय बारा हात). आड धसू नये म्हणून तो बांधून घेतला जायचा. दगड आणि चुना यात तो खालून वरपर्यंत गोल आकाराने बांधावा लागायचा. आडाच्या वर लाकडी रहाट बसवलं जायचं.

अतृप्त आत्मा -३

लेखक प्रमोद पानसे यांनी गुरुवार, 15/11/2018 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
आता जयडी आमच्या गालावरुन हात फिरवतीये हे बघुन आमच्या बायडीचा मत्सर जागा झाला नसता तर आश्चर्य होतं.त्याही परिस्थितीत डोळ्यातल्या अश्रुंआडुन ? आमच्या कलंत्राने ते सर्व हेरलच.आणी खस्सदिशी जयडीचा हात बाजुला करुन हि बया हात फिरवत हमसायला लागली. च्यामायला ! अगं बया जिवंत असताना नाही कधी फिरवलास आणी आत्ताच का गं सुचलं तुला ?

अतृप्त आत्मा -२

लेखक प्रमोद पानसे यांनी गुरुवार, 15/11/2018 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्यावेळाने कंटाळुन सिलींगवरुन आमचं द्रोण घेउन खाली उतरलो .म्हणलं बघु तरी आपण कसे दिसतोय ते . कालच बाबल्याच्या सलुन वरुन उधारीत दाढी आणी फेशियल करुन घेतलेलं.गोखल्यांची जयडी माहेरपणाला आलेली .ती आधीपासुनच झलक द्यायची आम्हाला.म्हणजे बॕचलर असताना इथे रहायला आलेलो तेव्हापासुनच.

Cold Blooded - १० (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 15/11/2018 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
रोशनी, जवाहर आणि अखिलेश या तिघांचीही हत्या करण्यासाठी बॅट्रॅकटॉक्सिन वापरण्यात आलं आहे हे ऐकून चारु नखशिखांत हादरली होती. रोहित बँगलोरला डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये आलेला असतानाची सारी चर्चा क्षणांत तिच्या नजरेसमोर फिरुन गेली! "मिसेस द्विवेदी, तुम्ही डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये असिस्टंट म्हणून काम करता, राईट?" "येस!" चारु स्वत:ला सावरत उत्तरली. "तुम्ही आणि शेखर अमेरीकेहून परत येताना कोलंबियात थांबून बॅट्रॅकटॉक्सिन घेवून मुंबईला आलात, करेक्ट?" "येस! मी व्हेकेशनसाठी स्टेट्सला जाणार आहे हे कळल्यावर परत येताना बॅट्रॅकटॉक्सिनचा स्टॉक आणण्याची डॉ. मालशेंनी सूचना केली होती.

साहस

लेखक Prajakta Yogiraj Nikure यांनी गुरुवार, 15/11/2018 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
साहस प्राची बॅकेत नोकरीस लागल्यापासून तिने फार सुट्टया घेतल्या नव्हत्या. रोजच्या धावपळीतून ती थकली होती. रोज घरातले आवरून बॅकेत जाणे, बॅकेत अकाऊंटचे काम करणे, रोजचे हिशोब ठेवणे यामुळे तिला खूप थकवा आला होता. तसंही तिच्या सुट्ट्या बर्याच बाकी होत्या तिने काही दिवस रजा घेऊन बाहेर गावी जाण्याचे ठरविले. तिने त्याच दिवशी बॅकेत रजेचा अर्ज केला आणि तो मंजूर देखील झाला. घरी आल्या आल्या तिने आई - वडिलांना आपण बाहेरगावी जात आहोत असे सांगून टाकले. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला गडचिरोली मधील एक नयनरम्य गाव सुचविले. तिही त्या ठिकाणी जाण्यास तयार झाली. तशी तिने तयारी देखील केली.

अतृप्त आत्मा -१

लेखक प्रमोद पानसे यांनी गुरुवार, 15/11/2018 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री अचानकच आम्हाला आम्ही निवर्तल्याचं समजलं .म्हणजे आम्ही झोपलेलोच होतो आणी आजुबाजुला थोडी कुजबुज ऐकु आली.हळुहळु कुजबुजीचं रुपांतर मुसमुसण्यात आणी नंतर गदारोळ आणी गोंगाटात झाले.त्यामुळे झोप चाळावली.डोळे उघडले तर आम्ही सिलींगला आणि द्रोण कॕमेरातुन दिसतं तसं दृष्य दिसायला लागलं. आम्ही अंथरुणातच अर्धी लुंगी वर गेलेल्या आणी भोकं पडलेल्या गंजीफ्रॉकात उताणे पडलेलो.आणी भोवती आमचे हवे नको ते सर्व नातेवाईक ,सगे संबंधी,मित्रमंडळी ,आमच्या उधार्या थकलेले बरेचसे वाणगट,गवळी ,न्हावी सगळे हजर. ओढुन ओढुन आणलेली सुतकी तोंड .काहींच्या मनातला आनंद न दिसताही जाणवत होता. च्यायला !

अस्थिकलश

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 15/11/2018 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
/ फाशीची कार्य वाही होण्या पुर्वि काही मिनिटे आधि नथुराम गोडसे यांनी आपले बंधू श्री दत्तात्रेय यांच्या कडे आपली अंतिम इच्छा प्रकट केली.. " जो पर्यंत सिंधू नदी अखंड हिंदुस्तानातून प्रवाहित होत नाही ..भले त्या साठी कितीही वर्षे लागोत..कितीही पिढ्या येवो जाओ तो पर्यंत माझ्या अस्थीचे विसर्जन करू नये.. श्री नथुराम गोडसे व श्री नारायण आपटे यांच्या वर अंतिमसंस्कार झाल्या नंतर अस्थी कुंभ त्यांच्या नातेवाईकां कडे सोपवण्यात आला नव्हता.. जेल प्रशासनाच्या लोकांनी तो अस

रमतगमत

लेखक शिवोऽहम् यांनी गुरुवार, 15/11/2018 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
हिंडताना दूर देशी, गर्द रानी हरवलेला कोणत्या वाटे इथे येऊन मज मी भेटलो निसरड्या वाटेवरी, हलकेच पाऊल टाकता मखमलीचा पायगोवा सोडुनी गुंगावलो वाटले विहिरीत वाकून डोकवावे मोडल्या चाहुलीने कोणत्या बोलाविले मज ना कळे वर्तुळे पाण्यावरीची स्तब्ध होऊ पाहता दिसत शेवाळातले आकाश निळसर बावरे घेता विसावा सावली पारावरी रेंगाळली ऊन कुरवाळीत होते कुरण हिरवे कोवळे दूर कोठे वाजणारी बासरी मी ऐकताना स्पर्शली कविता मनोमन मोरपंखासारखी सांजवेळी गोधुली घरट्यात पक्षी पावता मिटुनी डोळे सूर शोधत बैसलो तेजाळले