Skip to main content

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ९

लेखक कलम यांनी शुक्रवार, 23/11/2018 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात आपण खूप चुका करतो... काही लहान सहान, काही खूप मोठ्या तर काही माफी सुद्धा नसणाऱ्या. आपण करतच जातो त्या चुका, कारण काहीही असो.. कधी त्या चुका करणं हि आपलीच चूक असते, कधी परिस्थितीची गरज असते तर कधी जाणून बुजून आपण ते सर्व करतो. चुका कुठल्याही असोत, आयुष्यात झालेली प्रत्येक चूक आपली सावली बनते आणि आपण सरणावर जाईपर्यंत आपला पिच्छा करते...सगळा वेळ, आपल्याही नकळत. आपण एखादी चूक सुधारतो, सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला वाटतं कि सगळं कसं पूर्वीसारखं ठीक होईल, पण नाही.. केलेल्या चुकांचे फास आपल्याला कधीतरी आवळतातच... कुठंतरी, कुठल्यातरी वळणावर आपल्या समोर उभे ठाकतातच.

आयुबोवेन रत्नद्वीप -- भाग ४

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 23/11/2018 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
कॅंडी नंतर आमचा आजचा पुढचा बेत होता नुवारा एलीया किंवा नुवा एलीया हे थंड हवेचे ठिकाण बघणे आणि तिथेच मुक्काम करणे.शिवाय जाताना वाटेत बॉटनिकल गार्डन चहाचे मळे स्ट्रॉबेरी गार्डन रॅम्बोडा फॉल्स हनुमान मंदिर हे सर्व बघत जायचे होते. सकाळी भरपेट नाश्ता करून दिवसाची सुरुवात तर मस्त झाली. हॉटेलचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि गाडी पुन्हा वळणावळणाच्या रस्त्याने धावून लागली.आता बाहेरचे दृश्य अजूनच सुंदर आणि हिरवेगार होते. १०-१०.३०चा सुमार असूनही डोळ्याला ऊन जाणवत नव्हते.

सर्व हिंदू पद्धती आणि देवतांपासून दूर रहाण्यासाठी काय करावे ?

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 23/11/2018 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी एवढ्या सगळ्या हिंदू पद्धती आणि देवतांचा हिंदूंनाही कंटाळा येतो की नाही, आणि ते ३३ कोटी देवतांचे तर भयंकर प्रकरण आहे. खासकरुन ज्यांना अहिंदू म्हणून रहायचे म्हणून हिंदू पद्धती आणि देवतां पासून कटाक्षाने दूर रहायचे तर त्यासाठी काय काय करावे ? याचे या उतार्‍यात काही उपाय सुचवले आहेत पण यातील काही देवतांपासून दूर रहाण्याचे प्रकार कायदा आणि आप्त स्वकीयांच्या अनुमतीने वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय सल्ल्याने आणि स्वजबाबदारीवर करावेत. धागा लेखकाचा उत्तरदायीत्वास नकार लागू आहे.

कविते.....!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 23/11/2018 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
कविते......!. तू, तुला हवं तसं जग !! उमलत राहा, फुलत रहा, कागदांवरून मनांवर बहरत रहा, नेहमी सारखीच! पण एक लक्षात ठेव आता ...... तू ना माझी , ना त्याची ! मी लिहिलं तुला म्हणून तो वाचेल तुला, एवढाच काय तो उरलेला दुआ ! कारण भेटलो तर , स्वप्न वाटेल, नाही भेटलो तर, विरक्त वाटेल ! नव्याने काही केलं तर पाप वाटेल, जुन्यातच अडकुन राहीलो तर श्राप वाटेल! हात दिला तर स्वार्थ वाटेल, ढळणारा अश्रूच, सार्थ वाटेल! काही केलं तर...काय केलं? वाटेल नाही केलं तर...का नाही केलं? वाटेल ! आमचं काय ??......

देवाची दुश्मन

लेखक परशुराम सोंडगे यांनी शुक्रवार, 23/11/2018 02:53 या दिवशी प्रकाशित केले.
सावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर.हार घातलेला.शायनासरीत.आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली.

देवाची दुश्मन

लेखक परशुराम सोंडगे यांनी शुक्रवार, 23/11/2018 02:53 या दिवशी प्रकाशित केले.
सावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर.हार घातलेला.शायनासरीत.आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली.

आयुबोवेन रत्नद्वीप-भाग ३

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 22/11/2018 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी कोलंबो एअरपोर्ट वरून बाहेर निघाली आणि सगळ्यात पहिले काय नजरेत भरलेली गोष्ट म्हणजे हिरवळ आणि स्वच्छता. आता आपण भारतीय लोकांना सगळेच देश फारच स्वच्छ वाटतात परंतु मला श्रीलंका हे भारताचेच एक्स्टेंशन असेल असे वाटले होते त्या समजुतीला तडा गेला आणि सुदैवाने तो पुढे समज पुढेही आठवडाभर तसाच राहिला.

पिठलं - ज्वारीच्या पिठाचं

लेखक योगेश कुळकर्णी यांनी बुधवार, 21/11/2018 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
पिठलं सगळ्यांच्याच आवडीचा प्रकार. अगदी पटकन होणारा तरीही अतिशय चविष्ट आणि रुचकर. इथेच इकड्च्या तिकडच्या धागांवर ज्वारीच्या पिठाच्या पिठल्याची रेसीपी मिळाली होती; एक-दोनवेळा केलंही होतं पण वेगळी अशी पाकृ काही नव्हती. आज मी पुन्हा केलं हे सो कृती देतोय.

आयुबोवेन रत्नद्वीप -- भाग २

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 21/11/2018 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
अयुबोवेन रत्नद्वीप -प्रस्तावना एकीकडे दिवाळी सुरु झाली आणि दुसरीकडे ऑफिसची कामे उरकण्याची धांदल चालूच होती.वेळ मिळेल तसे यादी करणे सामान भरणे औषधे वगैरे आणणे चालूच होते.तेव्हढ्यात श्रीलंकेत राजकीय भूकंप झाल्याची बातमी आली. विद्यमान सरकारला उलथून नवीन सरकारने सत्ता ब्लॅकवायचा प्रयत्न चालविला आहे असे पेपर मध्ये येऊ लागले आणि आम्ही जरा धास्तावलो. नेहमी शांत असणाऱ्या या देशात आत्ताच काय हे संकट उद्भवले आणि आमची ट्रिप रद्द तर होणार नाही ना अशी शन्का येऊ लागली.

तुझ्या माझ्यासवे......(विडंबन)

लेखक OBAMA80 यांनी मंगळवार, 20/11/2018 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या माझ्यासवे.... तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही तुला बोलावता पोहोचायचा पाऊसही पडेना पापणी पाहून ओलेती तुला कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा कश्या युक्त्या मला शिकवायचा पाऊसही कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही आता शब्दांवरीया फक्त उरलेल्या खुणा कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही *********************** विडंबन तुझ्या माझ्यामागे कसा यायचा भाऊ तुझाही तुला बोलावता पोहोचायचा भाऊ तुझाही होईना पाच मिनीटे भेटूनी तुला कसा कोठूनी अलगद टपकाय