Skip to main content

कॉलेज

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी मंगळवार, 18/12/2018 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेज आयुष्यात अल्लड जीवनातून संजस्याकडे पडलेल पाऊल नादान मनाला किशोरी जीवाला तारुण्याची लागलेली चाहूल गुरुजनांनच्या सावलीत लागलेलं कोमल झाड प्राध्यापकांच्या सहवासात झालेली मैत्रीची वाढ बालपणी मैदानाची लागलेली कास कॉलेज जीवनात त्यात स्पर्धेची आस सिनिअर रुपी नात्यानं पडलेली त्यात भर त्यांच्या सहवासातून भेटलेला चारित्र्याचा आदर शालेय सवंगाड्यांच्या सहवास फुललेल्या मैत्रीच्या बागा कॉलेज कट्टयावर त्याला भेटलेली हक्काची जाग

मुंबईचे धडे - १

लेखक मालविका यांनी मंगळवार, 18/12/2018 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
२००५ साली बी कॉम ची परीक्षा दिली नि मी नवीन कोर्स करिता कोकणातून मुंबईला येऊन दाखल झाले. ठाण्याला काकांकडे राहण्याची सोय झाली. स्टेशनपासून काकांचं घर अगदीच जवळ होतं. तशी मुंबईला राहायची आणि मुंबईची सवय करून घायची हि पहिलीच वेळ. याआधी कधीतरी फिरायला म्हणून कुणाबरोबर तरी मी मुंबई पाहिलेली. मुंबई बाहेरची असल्याने लोकल जिथपर्यंत जाते त्याला सगळ्याला मुंबई म्हणायचे. माझा क्लास विद्याविहार स्टेशन जवळ होता. तेव्हा रोज ठाणे ते विद्याविहार रोज लोकलचा प्रवास करावा लागणार होता.

अडनिडी मुलं-३

लेखक जेडी यांनी सोमवार, 17/12/2018 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
दहावी होऊन मुलांना चांगले मार्क्सही मिळाले पुढे ११ वी साठी मुलांनी मिळेल तिथे ऍडमिशन घेतले . सीबीएस्सची कॉलेजेस जास्त नाहीत आणि स्टेट वाल्याना आदी प्रेफरेन्स म्हणून आणखीच गोंधळ . शिवाय त्यांची स्टेट बोर्डच्या सिलॅबस मुळे तिकडे मन असे रमतच नाही. लेकीला आर्ट्स विथ मॅथ्स घ्यायचे होते , पुण्यासारख्या शहरात ५ कॉलेज फक्त . एसपी , फर्ग्युसन ला मिळाले तरच आर्टस् ला घ्यायचे नाहीतर सायन्स असे ठरले . पण ते मिळाले नाही. एकाच कॉलेजला सायन्स आणि आर्ट्ससाठी नंबर लागला . मग सायन्स ला घेतले ऍडमिशन .

अतृप्त आत्मा 13

लेखक प्रमोद पानसे यांनी सोमवार, 17/12/2018 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
एरवी आमच्याशी प्रेमाचे धड चार शब्दही न बोलणारी आमची बायडी आज आमच्या विरहाने एवढी व्याकुळ झालेली बघुन आम्हालाही गलबलुन आलं. थोड्या वेळात सावरलेली बायडी अचानक सावध होत तिथुन उठली.आणी आलेच असं म्हणत स्वयंपाकघरात गेली.तीच्या एकंदर हलचाली संशयास्पद वाटल्याने आम्हीही तरंगत तीच्या मागे गेलो.आत सर्व सन्नाटाच होता .भराभरा तांदुळाचं पिंप उघडत तीने आतुन रुमालाचं एक छोटंस गठुडं बाहेर काढलं. अॉ !

राजस्थान सफर....(वाळवंटातील सौंदर्य....)

लेखक मॅक यांनी सोमवार, 17/12/2018 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
राजस्थान सफर ...( वाळवंटातील सौंदर्य....एक स्वप्न) भाग-पहीला..... पुर्वतयारी.......... २०१४ नंतर देवभूमी केरळची सफर केल्यानंतर गेली तीन वर्ष छोट्यामोठ्या सहली सोडल्यातर कुठे मोठ्या सहलीसाठी जाण झाल नव्हत. त्यांच कारणही तसच होत मध्यल्या काळात ब-याच घडामोडी घडल्या आणि सहलीसाठी जाण्यासाठी लागणार आर्थिक गणित सुध्दा जुळत नव्हतं. तसही मी अशा सहलीसाठी स्वतंत्र SIP केली आहे पण अनेक अडचणी आल्यामुळे ते काही शक्य झाल नाही. असो..... त्यापैकी एक महत्वाच कारण म्हणजे २०१६ च्या शेवटी आम्ही नवीन घर खरेदी केलं आणि जानेवारी-२०१७ मध्ये तिकडे रहायला गेलो.