Skip to main content

गडगडत्या बाजारातील संधी

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 16/04/2019 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
लोक हो माझ्या "दर महा ८% ते १०% परतावा शक्य आहे का?" या धाग्यावर भवति न भवति होऊन बरीच धूळ उडाली. त्यात एक मत पुन:पुन: व्यक्त केले गेले ते असे की फक्त चढत्या बाजारात असा परतावा मिळु शकेल. गडगडत्या बाजारात असा परतावा मिळणे शक्य नाही, इ० या प्रश्नाचा पुरता छडा लावण्यासाठी अलिकडेच २०१८ मध्ये म्ह० २८ ऑगस्ट २०१८ ते २६ ऑक्टोबर २०१८ या कालावधीमध्ये बाजार गडगडलेला असताना काय चित्र दिसते याचा तपास करायचा ठरवले. या अभ्यासाठी माझ्याकडील ChartAlert या सॉफ्टवेअरची मदत घेतली.

तू चांदणी माझी

लेखक चामुंडराय यांनी मंगळवार, 16/04/2019 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - चंद्राची चांदणी - ओळखा पाहू तू चांदणी माझी शांत, सोज्वळ, साजिरी तुज चुम्बण्या तुज मागे धावणारा उठवळ अश्व मी .... घेऊन कवेत तुला निखळ उब अंगी भरावी प्रणय करावा मी एव्हढा की लाजावी मजसमोरची चांदणी ....

असे असावे

लेखक अन्या बुद्धे यांनी सोमवार, 15/04/2019 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
असतो दगड तर कदाचित जमले असते कोरडे राहणे हिरव्या पावसात देखील आतून रुजून न उमलणे निळ्या नभात ढग व्हावे अमृताने पूर्ण भरलेला द्यावे आणिक निघून जावे इतकेच ठाऊक असलेला बासरीतून संगीत जन्मते रसिक मनांना भिजविते श्वास थांबता फुंकलेला पोकळ रिक्त शांत उरते फक्त असावे या जगती नसो अभिलाषा जगताना सहजस्फुर्त अस्तित्व असावे भार नसावा श्वासांना -अनुप

आठवणीतील गीत रामायण...

लेखक महामाया यांनी सोमवार, 15/04/2019 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
रवींद्र दत्तात्रय तेलंग 1983 साल आठवणीत घर करुन आहे कारण त्यावर्षी क्रिकेटचा वर्ल्ड कप कपिलच्या चमू ने जिंकला होता... ते उन्हाळ्याचे दिवस होते... दुसरं कारण जास्त महत्वाचं कारण या दिवसांमधेच मी गीत रामायणाचं पारायण केलं... माझ्या चुलत भावाचं इलेक्ट्रिकचं दुकान होतं. साउंडबाक्स, ढीग भर कैसेट्स...त्याच्या कडे गीत रामायणाचा 10 की 12 भागांचा सेट होता.

तू चंद्र माझा

लेखक प्रणया यांनी सोमवार, 15/04/2019 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
तू चंद्र माझा शांत,शुभ्र, साजिरा तूज स्पर्शिण्या तूज मागे धावणारे उथळ अभ्र मी.... येवून कवेत तूझ्या नीखळ उब मनी भरावी प्रकाशावे मी एवढे की लाजावी मजसमोर चांदणी....

आणीबाणी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/04/2019 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे देशात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा मी पाचवी सहावीत असेल. या वयात आणीबाणीचा मला काहीच फरक पडणार नव्हता. पडला नाही. माझे वडील प्राथमिक‍ शिक्षक होते. आमच्या विरगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एका लहान गावाला वडिलांची बदली होती. वडील शाळेत पायी जात. तिकडूनही पायी यायचे. त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळेत एसटी नव्हती. पायी जायचं आणि वेळेवर शाळेला पोचायचं. म्हणून वडील पहाटे शाळेला निघत. ‘आणीबाणी असल्याने शाळेला उशीरा जाऊन चालणार नाही’ असं त्यांच्या बोलण्यातून कळत असे. पण आणीबाणी म्हणजे नेमकं काय हे ते समजण्याचं वय नव्हतं. गावात किराणा दुकान होतं.

माथेरानवर सायकल स्वारी

लेखक अन्या बुद्धे यांनी सोमवार, 15/04/2019 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
14.04.2019 गेल्या महिन्यात 6 दिवस सायकलसफर झाल्यावर आता परत पाय फुरफुरायला लागले होते. 10-12 दिवसांपूर्वी नमिता दामलेचा लेख वाचनात आला ज्यात तिच्या माथेरान राईडबद्दल लिहिले होते.. वाचून सुरसुरी आलीच. या महिन्यात तो घाट सर करायचं ठरवून टाकलं. आणि त्यासाठी आजचा मुहूर्त पक्का झाला. 'सकाळी लौकर उठून' या शब्दांनी मला व्यायाम, फिजिकल ऍक्टिव्हिटी वगैरे बाबत भारी छळलं आहे. एकदा गादीतून बाहेर पडलो की ओके पण तोवर फारच अवघड लढाई असते. काल शाळूमित्रमैत्रिणी सोबत gt करून घरी यायलाच 12 होऊन गेले होते. त्यामुळे 5:40 चा गजर बंद करण्यासाठीच होता. पण दुसरा गजर 6:40 ला झाल्यावर उठलोच.

पण तू येणार नाहीस..

लेखक सिक्रेटसुपरस्टार यांनी सोमवार, 15/04/2019 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
मला तुझी आठवण यायला कारण लागत नाही, झोप लागावी म्हणून दिवसभर केलेल्या दगदगीचा शीण, पाठ अंथरुणाला टेकताच वैरी होतो, मी त्याला धरून ठेवायचं म्हटलं तरी निसटून जातो, डोळ्यांच्या कडा ओल्या होणं, मग जरा कमी कमी आवाजातले हुंदके, मग उशीत डोकं खुपसून हमसाहमशी रडणं, असे सगळे सोपस्कार पार पडल्यावर गोठलेली बोटं लिहू लागतात..