Skip to main content

सदाभाऊची हॅकिंग...

लेखक चिनार यांनी बुधवार, 22/05/2019 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
गजाभाऊ : अरे काय म्हणतं सदा... काय लेका दिसतंच नाही तू आजकाल? सदा: काही नाही भाऊ ...मी इथंच आहो तसा ....थोडं नवीन काम मिळालं होतं म्हणून तालुक्याला गेलतो चार दिवस. गजाभाऊ : कोणतं काम मिळालं तुले? सदा: ते थोडं शिक्रेट हाय भाऊ.. गजाभाऊ : एवढं काय शिक्रेट हाय बा..? सदा: जौद्या ना भाऊ.. गजाभाऊ : अबे तुये सारे शिक्रेट मले माहिती आहे लेका, तुये बँकेचे सारे पासवर्ड मले माहिती आहे. अन ह्यापेक्षा मोठं कोणतं शिक्रेट हाय बे? सदा: आता तुम्ही हॅकर माणूस भाऊ..

नॉस्टॅल्जिया - पहिल्या अमेरिका वारीचा!

लेखक लई भारी यांनी बुधवार, 22/05/2019 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
एका ग्रुपवर काही चर्चेनिमित्ताने अमेरिकेची पहिली वारी आठवली. प्रचंड अप्रूप होत आणि कदाचित तेच एकमेव कारण होत की इतर चांगल्या संधी न शोधता किंवा आलेल्या संधी लाथाडून एका IT कंपनीची ऑफर स्वीकारली होती; वेडेपणा! असो, जर-तर ला काही अर्थ नाही. पण त्या पहिल्या ट्रीप च्या आठवणी जाग्या झाल्या आणि आता मागे वळून बघताना अक्षरशः अद्भुत वाटतंय ते. सांगतो का ते :) मला वाटतंय त्यावेळी क्लायंट ODC मध्ये लोकांना टिकवून ठेवण्यासाठी गाजर म्हणून ह्या वाऱ्या सुरु झाल्या होत्या. ३ महिन्यांसाठी एका वेळी ४ लोक जायचे. माझ्यासोबत सुदैवाने बहुतांश चांगले लोक होते.

शूर दुचाकीस्वार श्रीमान अभिवंदनचे अरमान

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 20/05/2019 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरु काकासाहेब खोपोलीकर यांनी लिहिलेले १४(बहुतेक, जास्तकमी झाल्यास जबाबदार नाही) ओळींचे खंडकाव्य! (हे लिहिण्यास काकासाहेबांना अडिच दिवस लागले. तस्मात् वाचकांनी एक दिवस तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व फोनबुकमधील कुठल्याही मोबाईल नंबरवर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!) खंडकाव्य: अभिवंदन, अभिवंदन! वीस जून २०१८ रोजी आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन सोलापूरकर, पुणे देशातून पिंपरी चिंचवडास परतला.

श्यामरंग.. त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण!- निमंत्रण

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 20/05/2019 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, नमस्कार! श्यामरंगच्या ठाण्यातील दोन यशस्वी प्रयोगानंतर आता मुंबईत येत आहोत. सर्व मिपाकरांना आग्रहाचं निमंत्रण! "मटा कल्चर क्लब" सोबत, सादर करीत आहोत.... श्यामरंग...त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण! तो सावळा, श्रीरंग..! त्या श्यामरंगात रंगलेल्या.. काय वाटलं असेल त्यांना कृष्णाबद्द्ल? काय प्रश्न विचारतील त्या कृष्णाला? प्रत्येकीचा कृष्ण निराळा.. प्रत्येकीचा प्रश्न निराळा.. त्या प्रश्नांचा रंग... श्यामरंग... त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण! एक आगळावेगळा नाट्य संगीत नृत्याविष्कार! अंतर्नाद निर्मित, अपूर्वा प्राॅडक्शन्स प्रस्तुत सारस्वत को.ऑ. बँक प्रायोजित "श्यामरंग...

...पत्र...

लेखक चुकलामाकला यांनी सोमवार, 20/05/2019 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
...पत्र ... काय मायना घ्यावा? कल्लोळ कसा लपवावा? सारेच जाणते पत्र. ...पत्र... मजकूर रिकामा होता. पत्ताही लिहिला नव्हता. पोचले तरीही पत्र. ...पत्र... जीर्ण शीर्ण झालेले, कोपरेही दुमडून गेले, तरीही जपले पत्र! ..पत्र... खरेच लिहिले होते? काहीच कसेना स्मरते? प्रश्न पाडते पत्र! ...पत्र...
काव्यरस

" कशी आहेस ? "

लेखक फिझा यांनी सोमवार, 20/05/2019 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
" कशी आहेस ? " वेशीमधून बाहेर पडताना उरले सुरले बळ एकवटून त्याने शेवटी विचारलेच " कशी आहेस ? " निर्विकार डोळ्यांनी निर्विचार मनाने मग मीही फक्त मान हलवली . शब्द खूप जड असतात ........ परत कोण ..... ... ते ओझं वाहणार........ नाहीतर सांगितलं असतं त्याला "जशी सोडून गेलास ....... तशीच आहे !" -----------------फिझा !

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ८

लेखक शेखरमोघे यांनी सोमवार, 20/05/2019 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
(भाग १ ते भाग ५ यांमधील लिखाण मुख्यतः "दिल्ली, बहादूरशहा आणि १८५७" याबद्दलचे होते. या मालिकेतील पुढील भाग "अवांतर " म्हणायला हरकत नाही. हा भाग या मालिकेंतील शेवटचा भाग आहे .

श्री. अतिश तसीर यांच्या लेखावर प्रतिसाद

लेखक गामा पैलवान यांनी रविवार, 19/05/2019 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. अतिश तसीर यांनी २० मे २०१९ च्या टाईम नियतकालिकात मोदींना उद्देशून एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. भारतीय जनता आजून पाच वर्षं मोदी शासन सहन करेल काय, असं शीर्षक आहे. उपरोक्त लेखावर प्रतिसाद व काही प्रमाणावर प्रतिवाद म्हणून सदर लेख लिहला आहे.

ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा?

लेखक onlinetushar यांनी रविवार, 19/05/2019 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या खूप दिवसांपासून अनेकांचे माझ्या फेसबुक पेजवर मेसेज येत होते कि आम्ही आधी ब्लॉगरवर ब्लॉग तयार केलाय. आता तो आम्हाला वर्डप्रेसवर स्थलांतरित (Migrate) करायचा आहे कसा करू? तर हे अतिशय सोपे आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि तुमच्या गुगल रँक अथवा इतर गोष्टींना धक्का न पोहचवता ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा हे जाणून घेऊ.

ब्लॉगर आणि वर्डप्रेस यामध्ये नेमका फरक काय?

ब्लॉगर हे एक गुगलचे प्रोडक्ट आहे. ब्लॉगरवरील आपल्या ब्लॉगवर आपल्यापेक्षा गुगलचे अधिक कण्ट्रोल आहे.