Skip to main content

दर्पण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 14/07/2019 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
.......... गावात स्वामी आल्याची बातमी हळुहळु पसरु लागली. नगरी च्या बाहेर असलेले भग्न शिवमंदीर..तेथे फारशी वर्दळ नसायची.. त्याच परिसरात स्वामी नी एक पर्ण कुटी बांधली होति..बाजुलाच एक झरा वहात होता. त्याने तो परिसर स्वछ्य केला...व तिथेच त्याचा मुक्काम होता.. बाजुलाच एक विशाल वट्वृक्ष होता..

प्रतिशोध -एक भयकथा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 14/07/2019 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
माधव जोशी -स्ववानिवृत्त लिपिक -मुंबई महापालिकेतून रिटायर्ड जानकी जोशी -माधव ची भार्या -गृहिणी अतुल -अजय दोन मुले अतुल बुद्धिमान -इंजिनियर झाला अन वसईतील एका कारखान्यात तो उच्चं पदार्थ इंजिनियर रेशमा गायकवाड त्याच्याच कंपनीत काम करणारी तरुणी रेशमाचे बाबा काही दिवसापूर्वी वारले होते त्यांचा वसईला प्रशस्त बंगला होता आई व रेशमा दोघीजणी राहात असतात अतुल व रेशमचे प्रेम जमते व ते विवाह करतात अतुल सासुरवाडीलाच राहात असतो माधव चा दादर ला चार रुम चा फ्लॅट असतो नगरपालिका कर्मचारी लोकांनी सोसायटी फॉर्म करून फ्लॅट्स बांधले असतात जानकीस विवाह मंजूर नसतो ती जुन्या वळणाची असते गोत्र शाखा आदी बघून

लौकिक पार लौकिक -सैतान पुत्राचा जन्मोत्सव अर्थात मध्य रात्रीचे भय नाट्य

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 13/07/2019 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
लौकिक पार लौकिक -सैतान पुत्राचा जन्मोत्सव अर्थात मध्य रात्रीचे भय नाट्य -------------------------- भद्रदंभद्र व देवयानी मा साहेब निरंजन प्रधानाच्या ऑफिस मध्ये चर्चा करत होते भद्रदंभद्र व देवयानी मा साहेब वायुरूप तत्त्व समाजाचे मुखिया होते कालभैरव चा अनुग्रह प्राप्त साधक होते ते दोघे कालभैरव ने सारे तंत्र मंत्र मायावी शक्ती त्यांना दिलेल्या होत्या २० वर्ष काल भैरव ची तपश्चर्या केल्याचं ते फळ होते अन त्यांना मानव रूपात वावरण्यास अनुमती होती दोघेही आपल्या मायावी शक्तीने हवे तेव्हा वायू वा मानव रूप धारण करू शकत होते कित्येक हजार वर्षांपूर्वी आमचे त्रिखंडा वर राज्य होते आम्ही असुर कुलोत्प

कुत्रत्वाचे नाते (?) नाण्याची दुसरी बाजू

लेखक बाप्पू यांनी शनिवार, 13/07/2019 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. इमानी आहे, प्रेमळ आहे, अमुक करतो, तमुक करतो इ इ आपण https://www.misalpav.com/node/44832 या आणि अश्या अनेक धाग्यावर आणि प्रतिक्रियांमध्ये वाचलेच असेल.. पण ज्या न्यायाने प्रत्येक माणूस एकसारखा नसतो त्याच्या न्यायाने प्रत्येक इतर प्राणी देखील एकसारखा नसतो. उदा. काही बैल आपल्या मालकाशी प्रेमाने वागतात तर काही बैल समोर येईल त्याला डोक्यावर घेतात. मग तो मालक असो वा आणखी कोणी.. मग कुत्रा देखील याला अपवाद कसा असेल??

माझे जिम चे प्रयोग ... जिम मधली गाणी (भाग २)

लेखक अमर विश्वास यांनी शनिवार, 13/07/2019 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
जिम मधली गाणी एपिसोड #३ रोजच्या प्रमाणे सकाळी उठून जिम मध्ये धडकलो ... (विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही च्या चालीवर ) आज स्पिंनिंग चा दिवस ... सायकल ऍडजस्ट करून "वॉर्म अप" ला सुरवात केली. हळू हळू गाण्यांनी जोर पकडला आणि त्याचबरोबर आमच्या पॅडलिंगने ही आणि .. अचानक ते गाणे आले ... आजा डूब जाऊं तेरे आंखों के ओशनमें... स्लो मोशन में... अहाहा .. काय ती शायरी ... शब्द ऐकून मी अडखळोच ... ओशन मध्ये गटांगळ्या खातोय असा फील आला .. पायांची हालचाल स्लोमोशन झाली ... ह्या अवस्थेत किती वेळ होतो माहित नाही .. पण अचानक सरांचे शब्द ऐकू आले .. don' give up ... keep going ... लगेच सावरलो.

अंधाधुंद

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 12/07/2019 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
जरा जास्तच दिस झाले आपल काही बोलण झाल नाही. पण आता का करता जी उनच अस तापल होत का काही लिहूशाच वाटत नव्हत. वरुन लगनसराईचा टाइम तवा टायमच नव्हता. म्या इचार केला पाउस पडून जाउ दे मंगच बोलू. पाउस बी असा दडी मारुन बसला का बोलाच काम नाही. अख्या मिरग गेला पण येक थेंब पावसाचा पता नाही. आता कोठ दोन पाणी झाले. पऱ्हाटी टोबली आन म्हटल आता तुम्हाले सांगतो मायी गोष्ट. मायी लय मोठी पंचाइत झालती राजेहो. आजकाल आमच्यासारख्या गाववाल्यायले शिनेमे पायन कठीण होउन गेल. लय बेक्कार दिस आले पाहा. पिक्चर पायला तर डोक्याले झिणझिण्या आल्या. नाही म्हणाले साहा महिने तरी झाले असन.

कुत्रत्वाचं नातं

लेखक इरामयी यांनी शुक्रवार, 12/07/2019 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
काही समस्या या धाग्यावर माझ्या एका प्रतिसादाला एक संतापयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली गेली आहे. प्रतिसाद लिहिणाऱ्यांचा (श्री. बाप्पू) राग मला समजू शकतो आणि त्यांचं मत चुकीचं आहे असंही मी म्हणणार नाही.

प्रस्थापितांचे सामाजिक भान

लेखक सर टोबी यांनी शुक्रवार, 12/07/2019 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखात प्रस्थापित म्हणजे ज्यांनी जीवनातील अनिश्चितता संपवून स्थैर्य प्राप्त केले आहे असे सर्व जण. आता यातील प्रत्येक जण जाणीव पूर्वक समाजाकरिता काही करेलच असे नाही. परंतु ज्या देशात पदोपदी तुम्हाला जीवनाशी झगडणारे लोक दिसतात तेथे प्रस्थापितांकडे आपसूकच 'टॉर्च बेअरर' या अर्थाने बघितले जाते. आणि म्हणून त्यांचे सामाजिक भान असणे किंवा नसणे हे देखील इतरांसाठी महत्वाचे असते. तर हा असा प्रस्थापित एकूणच समाजासाठी आणि देशासाठी कळत नकळत महत्वाची भूमिका बजावत असतो. या समाजाने जर पुरोगामी भूमिका पत्करली तर इतर समाज घटक देखील अशा गोष्टींचे अनुकरण करतात.

घनदाट गर्द रेशमी केशकुंतल

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 12/07/2019 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
घनदाट गर्द रेशमी केशकुंतल नेत्रास कोरले काजळ कि सोमल तनुत रातराणीची मादक दरवळ गात्रात मदनाची बेफाम सळसळ * नजर, कधि लाजरी, कधि नाचरी रतिरुप,नखशीकांत तु लावण्य परी वाकलेली लज्जेने तु अबोध रमणी रुप चमके,जशी नभी शुक्रचांदणी * वसने ,गर्भ रेशमी अंगी ल्याली तव उरास काचे ,भर्जरी काचोळी देहात रानवारा,उसळे उधाण लाटा गालास खळी,अशी तु लावण्यकळी * अबोल पौर्णीमा, अन धुंद चांदणी जवळ श्रुंगार वेडी,बेधुंद रागीणी नाचति वक्षावर, चकोर मंडले बेभान मुग्ध ति कुजबुज अन चोरटे अलिंगन , * रोम रोम नशेने फुलले,श्वासात श्वास भिनले.. एक मेकाच्या सहवासात,बहरुन यौवन आले तारुण्य अन यौवनाचा प्राशितो मी कण नी कण ओंजळीत दिले मी त

काल धरण बांधिले

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 12/07/2019 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
काल धरण बांधिले खेकड्यांनी हो तोडिले येरू म्हणे बघा नीट विठू चरणीची वीट सृष्टीचा जो तोले भार त्यासी विटेचा आधार युगे अठ्ठावीस ठेला विठू विटेवरी भला वीट अजूनी अभंग बघणारे होती दंग मूळ माल जर नीट (जशी विठ्ठलाची वीट) तर फिजूल बोभाट नको खेकडी खटपट
काव्यरस