Skip to main content

रॉबिन विलियम्स

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 12/08/2019 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ ची ती सकाळ काहीशी भकासच होती, हॉलिवूडच्या माझ्या अत्यंत आवडत्या नटांपैकी एक असणाऱ्या रॉबिन विलियम्सला घेऊन गेलेली ती सकाळ होती. हॉलिवूड चे चित्रपट पहायचं वेड लागलं त्या काळात पहिल्या काही चित्रपटांत त्याचा 'गुड मॉर्निंग व्हिएतनाम' होता. आर्म्ड फोर्सेस रेडिओ मध्ये RJ म्हणून काम करणारा तो Goooooooood morning Vietnam! म्हणत सगळ्यांचा मूड फ्रेश करण्याची पद्धत जाम आवडून गेली होती. लगे रहो मुन्नाभाई मध्ये विद्या बालन ने ती हुबेहूब कॉपी केलीये.

पुण्यात (अर्थात) विम्बल्डन !

लेखक चौकस२१२ यांनी सोमवार, 12/08/2019 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच क्षमा मागतो कि हि काही पाककृती नाही .. मग इथे का लिहिलंय असा प्रश्न विचारलं.. कारण खाण्याशी संदर्भ आहे म्हणून! तर सांगायची गोष्ट अशी कि फळ भाजी इत्यादी मोसमपणाने खाद्योत्सव असतात , आंबे, हुरडा, इत्यादी हे काही नवीन नाही ...त्यावरून एक आयडिया ची कल्पना आली, बघूया कोना उद्योजकाला भावतीय का ते. डिसेंबर महिन्यात प्रथमच आयुष्यात महाबळेश्वर परिसरात मधुर स्टरबेरीचं आस्वाद घेतला त्या नंतर पुण्यनगरीत बालेवाडी टेनिस ची भारतातील एकमेव अशी जी ऐटीपी टूर्नामेंट असते ती पहिली,,, अर्थात तिथे सगळं झाकपाक मामला , स्टेटस सिम्बल म्हणून पण जनता हजर होती आणि माझा लक्ष खाद्य विभाग कडे गेलं...

युगांतर-आरंभ अंताचा भाग २७

लेखक मृणालिनी यांनी रविवार, 11/08/2019 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैव आणि शाप एकाच घराण्याला गिळंकृत करू पाहत होते. एकीकडे कुंती वनवास भोगत होती आणि दुसरीकडे तिचा चुलत भ्राता वासूदेव, कारावास ! माता पित्यांपासून दूर देवकीनंदन कृष्ण गोकुळात वाढत होता आणि त्याचा आत्मबंधु युधिष्ठिर आणि सोबत वायुपुत्र भीम राजमहालापासून दूर वनातल्या कुटीत. कुंतीने मंत्रशक्तीने इंद्राला पाचारण केले. काळंभोर ढगांची गर्दी झाली आणि शुभ्र विजेचा झोत येत तेजस्वी रुप समोर आले. "प्रणाम इंद्रदेव!" "कुंती, कश्या पुत्राची अपेक्षा आहे तुला?" "तो....जो मानव म्हणून उत्कृष्ट असेल.

तत्त्वमसि ।

लेखक मायमराठी यांनी रविवार, 11/08/2019 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
" तत्त्वमसि" पहिल्या घटक चाचणीचा शेवटचा पेपर देऊन शाळेच्या बसमधून येताना गार्गी आणि व्योम मनातल्या मनात कोकणातल्या आजी-आजोबांकडेच जातोय असं समजत होते. आता चतुर्दशीपर्यंत सुट्टी. आज पॅकिंग, उद्या भल्या पहाटे प्रयाण, गावात पोचल्यावर सजावटीची धामधूम, विहिरीत व ओढ्यात डुंबणे, आजीकडून खायचे प्यायचे चोचले पुरवून घेणे, आजोबांकडून अमर्याद लाड करून घेणे आणि अनंत गोष्टी या दोघांच्या मनात कोवळ्या गवतासारख्या तरारून येत होत्या. गार्गी ९वीत आणि व्योम ६ वीत, अभिषेक आणि अर्चना यांची गोंडस मुलं. नोकरी मुंबईत आणि गाव कोकणात या पठडीतील एक मध्यमवर्गीय कुटुंब. तसं आजकाल मध्यमवर्गीय कोण?

आनंदाचे डोहीं आनंद तरंग।

लेखक टर्मीनेटर यांनी रविवार, 11/08/2019 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतः आनंदी, हसतमुख राहणे आणि आसपासच्या सर्व व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद, हास्य पाहणे कोणाला नाही आवडत? पण नेहमीच आनंदी, हसतमुख राहणे इतके सोपे नाही.

Hawaii ट्रिप बद्दल माहिती हवी ahe

लेखक चामुंडराय यांनी शनिवार, 10/08/2019 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नाताळ झाल्यावर मी hawaii ट्रिप चा विचार करत आहे. काही माहिती हवी आहे: साधारण प्लॅन असा आहे - ईस्ट कोस्ट -> maui -> oahu -> पर्ल हर्रबर -> व्हॉल्कॅनो नॅशनल पार्क -> होनोलुलू (waikiki टुरिस्ट हॉटस्पॉट) -> इस्ट कोस्ट १. ह्या साठी किती तासांचा प्लॅन करावा? मी ६ व्हॉल्कॅनो असा विचार करतोय २. आम्ही तिघांचं जण (बायको आणि आमची ४ महिन्यांची मनीमौ) असणार आहोत, तर वॊशिंग्टन हुन कॅब करावी असा विचार करत आहे साधारण कॉस्टली जाईल पण इतर काही ऑपशन दिसत नाहीये. असल्यास सांगावा ३. हॉटेल्स सांगावीत अजून काही ट्रीप्स असतील तर नक्की सांगा

डिप्रेशन

लेखक nishapari यांनी शनिवार, 10/08/2019 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
डिप्रेशनची कारणं असंख्य आहेत . आयुष्याच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात म्हणजे - शिक्षण , नोकरी , अर्थार्जन , विवाह / संसार यात आलेलं अपयश हे कारण तर सर्वज्ञात आहे . पण डिप्रेशनचं दुसरंही एक तितकंच प्रभावी कारण म्हणजे अपराधीपणाची भावना , गिल्ट हेही असतं हे कदाचित कमी लोकांना माहीत असेल .. म्हणजे जे त्या अनुभवातून गेलेले नाहीयेत असे इतर डिप्रेशन फ्री हेल्दी लोक ... काहीवेळा वरच्या कारणाशी ते निगडीत असतं तर काहीवेळा स्वतंत्र ...

आयतं भांडवल आणि बाजारभाव!

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 10/08/2019 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
हॅलो! अरे काका कुठायंस? १५ मिनिटं झाली मला येऊन इथे! "आलो आलो.अगदी दारात कॅफेच्या." "हं बोल अमित काय घ्यायचं? मस्त आयरिश कॉफी घेऊया? छान मिळते इथे!" "मागव तुला काय हवं ते.पण आधी इथं का बोलवलंयस ते सांग!आधीच सकाळच्या प्रकरणामुळे माझं डोकं फिरलंय!" "हो हो सांगतो.धीर धर!

युगांतर - आरंभ अंताचा! भाग २६

लेखक मृणालिनी यांनी शनिवार, 10/08/2019 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
युगांतर-आरंभ आंताचा! भाग २६ कंसाने आकाशाकडे बघत हातातला सोमरसाचा प्याला नाचवला. "बोल.... बोल आता.... तुझा मृत्यू जन्म घेतोय म्हणून....." जोरजोरात हसला , " या स्वतःच्या हाताने मृत्यूलाच मृत्यु देणारा एकमेव आहे हा कंस! सातही पुत्र यमसदनी धाडलेत मी. आणि आता आठव्यासाठी प्रतीक्षा कर." "महाराज, एक प्रश्न आहे...." "राजमंत्री.... काय विचारायचं आहे? आणि कोणाला ? याला?" कंसाने आभाळाकडे बोट दाखवत विचारलं. "नाही महाराज... तुम्हाला." "मग ठिक आहे. कारण तो प्रश्नांची उत्तरं नसतो देत." कंसाला नशा चढली होती. "महाराज, आठव्या पुत्रापासून भिती होती. मग आधीचे पुत्र का....?" कंसाने त्याच्या कडे पाहिलं.

अंधानुकरण

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 10/08/2019 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
"अंधानुकरण" काही वर्षांपूर्वी पाहिलेला एक व्हिडिओ आज पुन्हा बघायला मिळाला, हेच निमित्त. आंधळा माणूस इंग्रजीमध्ये क्रिकेट समालोचन करतो, एवढंच नव्हे तर गर्दीचा आवाज हुबेहूब काढतो. सरावलेला समालोचक असावा अशी शब्दफेकीची शैली. " हे कसं जमवलं? " असं विचारलं असता म्हणतो की रेडिओ व टिव्ही ऐकून ऐकूनच शिकलो, इंग्रजी येत नाही त्यामुळे चूका होण्याची शक्यता आहे. हे सांगताना थोडासा ओशाळल्यासारखा हसतो. असंच एकदा एका सभेनंतर पांढरी काठी टेकवत टेकवत जाणाऱ्या व्यक्तीला पाहिले. त्याच्या अंगाखांद्यावरून सुटलेल्या सभेची गर्दी ओसांडत होती.