Skip to main content

त्सो मोरिरी : एक समृद्ध अनुभव

लेखक हर्मायनी यांनी गुरुवार, 15/08/2019 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षी २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात लेह लडाखला जाण्याचा योग आला. या अविस्मरणीय ट्रिप बद्दल सविस्तर लिहिण्याचा विचार आहे पण तूर्तास एक अशी घटना जी मनात कायम कोरलेली राहील.. शीत वाळवंट असलेल्या लडाखचे निसर्ग सौन्दर्य एकदम वेगळेच.. आधी कधीच न पाहिलेले.. राखाडी आणि तपकिरी रंगाच्या छटा बघताना निसर्गाच्या पॅलेट मधला मधला हिरवा रंग हरवलेलासा वाटला. एक प्रकारची गूढ शांतता, ठिकठिकाणी रचलेले दगडांचे मनोरे आणि बौद्ध धर्माचे मंत्र वाऱ्याद्वारे आसमंतात पसरवणाऱ्या रंगीत पताका संपूर्ण प्रवासात साथ देत राहिल्या.

गावची हवा...

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/08/2019 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे अहिराणी पट्ट्यात (आणि इतरत्रही) पूर्वी खूप झाडं होती. जंगलं होती. नद्यांच्या थड्यांवर आमराया होत्या. भरपूर पाण्यामुळे शेती बागायती होत्या. म्हणून गावातल्या हवेत कायम थंडावा असायचा. हवा शुध्द असायची. वाहनांची आताच्या इतकी प्रचंड संख्या नव्हती. प्रदुषण नव्हतं. घरं सिंमेटची नव्हती. मातीची होती. गावातल्या गल्ल्या मातीच्या. गावाच्या आजूबाजूच्या पांद्या मातीच्या. घराघरात रेडीओ, टीव्ही, फॅन नव्हते. कुठं कुठं रेडिओ येऊ लागले होते. गावात खूप झाडं नसली तरी गावाच्या आजूबाजूला आमराया असत. इतर झाडी असत. गावाला लागून असलेल्या पाट थळाच्या पिकांना कायम पाणी सुरू असायचं.

राखी.

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 15/08/2019 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखीतल्या सगळ्या मुलांना राखी बांधणारी छोट्टीशी बाला, काॅलेजमध्ये ज्याला टाळायचं त्यांनाच राखी बांधणारी मुग्धा. रक्षाबंधनाचे मेसेज फक्त कझिन्स ग्रुपमध्ये टाकणारी प्रगल्भा.. आणि तो सरसकट सगळ्यांनाच फाॅरवर्ड करणारी प्रौढा.. "तिच्या" या चारही रुपांना एकत्र ओवणारी तरीही अलगद विलगणारी पण खुलवणारी, ती राखी!

श्रीगणेश लेखमाला २०१९ - झलक तिसरी!

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 15/08/2019 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम, सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अनेक शुभेच्छा! एखाद्या रिकाम्या चित्रफलकावर चित्रकर्त्याने हलके हलके रंग भरावेत आणि बघता बघता चित्रफलकाचा नूरच बदलून जावा! आपल्या श्रीगणेश लेखमालेचंसुद्धा काहीसं तसंच झालंय बरं का, मंडळी.

भाषा सरिता इव

लेखक मायमराठी यांनी बुधवार, 14/08/2019 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
।। भाषा सरिता इव ।। भाषा नद्यांसारख्या असतात.संस्कृतीच्या अत्त्युच्च शिखरांवरून उगम पावतात. पृथ्वीच्या अंतरंगातील ज्वालामुखीच्या कणांकणांतून शुद्ध केलेली बीजं, खनिजांचा कणखरपणा, मातीतील जीवनरसांचा ओलावा, या आभाळाशी नातं जोडणाऱ्या दुर्दम्य इच्छाशक्तीची इंद्रधनुष्य फुलवंत अथक वाहत असते. दोन्ही तीरांना समृद्ध करत, साहित्याची नवनवीन बेटं तयार करत त्यांभोवती वळणं घेत घेत नवनवीन अर्थांना जन्म देत राहते. वाऱ्यावर हिंदकळणाऱ्या ऊर्मितरंगांना मनांमनांत उमटवंत आयुष्यभर साथ देते.

डिप्रेशन - भाग 2

लेखक nishapari यांनी बुधवार, 14/08/2019 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
डिप्रेशन विषयावर मायबोलीवर काढलेल्या धाग्यावर 2 - 3 प्रतिसाद लिहिले , तेच या धाग्यात इथे देत आहे .. डिप्रेशन असलेल्या व्यक्तीने आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींचा विचार करून , थोडक्यात आपल्या आयुष्याच्या पॉजिटिव्ह बाजूकडे पाहून - अनेकांच्या तुलनेत आपण किती सुदैवी आहेत हे पाहून आनंदी राहावं असं बहुधा अनेकांना वाटतं . साधारण याच विचारसरणीतून - " तुला काय कमी आहे ? घर - पैसाअडका आहे , देवाने धडधाकट शरीर दिलं आहे ...

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३०

लेखक मृणालिनी यांनी बुधवार, 14/08/2019 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
भीमाला शुद्ध आली तेव्हा तो नागलोकी होता तेही सैनिकांच्या पहाऱ्यात. "महाराज, हा आम्हाला सापडला तेव्हा मृच्छीत होता. गुप्तचर वगैरे असेल म्हणून याला रक्षक नागांनी दंश केला तर हा शुद्धीत आला." "दंश केल्यावर शुद्धीत आला?" "हो, महाराज." "याचा अर्थ त्याने आधीच विष प्राशन केले होते." "नाही, मी तर खीर खाल्ली होती." भीम म्हणाला. 'चेहऱ्यावरचे तेज पाहून तो कुणी सामान्य तर वाटत नाही.' नाग महाराजांनी भीमला विचारलं, "कोण आहेस तू?" "मी कुंतीपुत्र भीम. भीष्माचार्यांचा पौत्र." "कुंती? हस्तिनापुरातून आला आहेस?" "हो." नागमहाराजांनी भीमाला जवळ घेतलं. "आजोळी स्वागत आहे तुझं." "आजोळ?" "हो. मी तुझा मातामह आहे.

आसिंधू

लेखक मृणालिनी यांनी बुधवार, 14/08/2019 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
स्वार्थापायी त्यांनी देशाचे केले तुकडे नशिबी भूमातेच्या लिहिले केवळ दुखडे मानाचा तो भगवा.... नि हक्काची भूमाता आसिंधू अखंड आमुचा, आरक्त जाहला होता काळ्या मातीच्या पायी लाली रक्ताची होती.... ते दृष्य शवांचे होते, ती जमीन केशरी होती.... ना धीर सोडला आम्ही, ना त्यांनी केली पर्वा कष्ट उपसले कोणी, कोणाची झाली चर्चा! मातीत रुजवला त्यांनी पुन्हा नव्याने मत्सर पानोपानी लिहिले असत्य अधर्मी अक्षर! ना रंग आता तो आहे, ना गंध तिथे मातीला! नापाक अधर्मी हेतू नि कपट असे साथीला हातात कटोरा तरीही, धमकवती दुसऱ्याला अणू रेणूस धमकावे जणू लांघून मर्यादेला.... @मधुरा #14August
काव्यरस

प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ? (Beyond the 'Rainwater Harvesting')

लेखक सुनिल प्रसादे यांनी बुधवार, 14/08/2019 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ? (Beyond the 'Rainwater Harvesting') भाग - एक. -------------- 'रेनवॉटर हार्वेस्टिंग' ही इसवीसनपूर्व बारा हजार वर्षांचा इतिहास असलेली संकल्पना आहे. माणसं तेव्हापासून हे करत आली आहेत. 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'च्या आजपर्यंतच्या व्याख्येमध्ये पावसाचे जमिनीवर पडलेले पाणी गोळा करणे आणि ते साठवणे ह्या दोनच गोष्टींचा समावेश आहे. आपल्या देशातही आपण 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'ची कामं वेगवेगळ्या पद्धतींनी मागील अनेक वर्षे करत आलो आहोत. परंतु ते करत असताना आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे ह्याचा आपण फार गंभीरपणे विचार केला आहे असं दिसतं नाही.

कविता: बिबट्याचे मनोगत

लेखक bhagwatblog यांनी बुधवार, 14/08/2019 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
सिमेंटच्या जंगलात येण्याची नाही हौस भरपूर पर्यटनाची मज नाही सोस माणसा सोबत संघर्षात नाही मौज भरपेट भोजन सुद्धा मिळत नाही रोज सोसायटीत ओळखीचे कुणीच नाही म्हाडात तर घर सुद्धा घ्यायचे नाही नाशिक पाहण्यात तर मला रस नाही माणसं भेटण्याचा मला आनंद नाही हिंस्त्र तरी अन्न साखळीचा हिस्सा जंगल हिरावून तुम्हीच दिला घुस्सा वनक्षेत्र खालावले साखळी तुटली आत्ता मात्र भूख सुद्धा प्रखर वाढली शोधतो व्यक्तीला, जो प्रश्न सोडवेल शोधतो स्वतःला, जिथे उत्साह सापडेल शोधतो स्वप्नांना, तिथे आसरा भेटेल शोधतो जागेला, जिथे भोजन मिळेल नोंद: बिबट्याचे जंगल सोडून अन्ना साठी शहरात येण्याचे प्रमाण वाढले आहे.
काव्यरस