Skip to main content

दर्शनमात्रे मनकामना पूर्ती

लेखक nishapari यांनी मंगळवार, 03/09/2019 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती आलेले आहेत , घरोघरी आरत्या ऐकू येत आहेत ... वेळेनुसार देवांकडे काही मागणी करणे हा आस्तिकांचा स्वभाव आहे , काही गोष्टी मिळतात , काही नाही ... त्यात देवाचा किती सहभाग असतो हे तोच जाणे .... पण एकूणच देवाकडे विशेषतः घरी आणलेल्या गणपती कडे एखादी गोष्ट मनापासून मागावी आणि ती मिळू नये असं झाल्यावर देवाकडे काही मागण्यावरून लोकांचं मन उडतं असं होतं का ? आरत्या किती लोक शब्दांकडे लक्ष देऊन म्हणतात , त्यावर विचार करतात माहीत नाही त्यामुळे दर्शनमात्रे मनकामना पूर्ती ह्याचा विचार नसेलही केला कुणी .....

गणेश पूजा... सन १९७२ बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!!

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 02/09/2019 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश पूजा... सन १९७२ बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!! भाग १ हवाईदलातील माझ्या आठवणी... १९७१साली बांगलादेशच्या लढाईची सांगता भारत विजयी होऊन झाल्याने आनंदी वातावरणात गणेशाचे आगमन झाले होते. हवाईदलातील चंदिगढ स्टेशनमध्ये मला पहिल्या पोस्टींगवर रुजू होऊन ५-६ आठवडे झाले होते. तेंव्हा सेक्टर १९ मधील एका मंदिरात सिव्हिलियन्स सोबत हवाईदलातील एयरमन गणेशोत्सव साजरा करत असत. त्यावेळेस झालेली विसर्जनाची मिरवणूक आजही लक्षात राहिली आहे. कल्पना करा, गणेशाच्या मोठ्या मोठ्या १०० च्या वर मूर्ती हार-माला घालून आर्मीच्या ट्रकवर सजवून निघालेल्या आहेत.

शतशब्द कथा!

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 02/09/2019 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
हो, मी खोटं बोलते. काय करणार, पांढऱ्या वस्त्रावर काळे आवरण घालण्याची आमची प्रथाच आहे. कोर्टातून बाहेर निघाल्यावर नेहा भेटली. नोटा मोजून घ्यायची गरज नव्हती कारण दिलेल पाकिट जड होतं आणि नेहा प्रामाणिक! अजूनही आठवते आहे..... समीरच प्रेत....तिचे रक्ताने माखलेले हात.... खूनाचा आरोप.... अटक झाली तेव्हा केवढी सैरभैर झाली ती! मी केस घेतली. शेवटी फॅमिली फ्रेंड. कोर्टाला पटले - कुंडीवर डोके आपटून अपघाती मृत्यू. रक्ताच्या थारोळ्यातल्या प्रेताला तिने हलवून पाहिले. नवरा कसाही असला, तरी त्यांच्या बायका त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतातच. आता हेच बघा ना.... छोट्याश्या भांडणाचं निमित्त.

आवंढा

लेखक मिलिंद जोशी यांनी सोमवार, 02/09/2019 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक मित्र आहे. तो चित्रपट, टीव्ही सिरीयल यासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतो. मधून अधून काही चित्रपटात, टीव्ही सिरीयल मध्ये छोट्या भूमिका देखील करतो. पण ते फक्त हौस म्हणून. मुख्य काम मात्र डायरेक्टरला असिस्ट करण्याचेच. परवा त्याची आणि माझी बऱ्याच दिवसानंतर भेट झाली. खरं तर तो असिस्टंट डायरेक्टर आहे म्हणजे काय हेच मला नीट समजत नव्हते. मग त्याला विचारलेच. “यार... तू असिस्टंट डायरेक्टर आहे म्हणजे नक्की काय करतोस? कित्येक वेळेस तर तू टीव्हीवर दिसतोस पण तुझे नाव मात्र कोणत्याच यादीत दिसत नाही. असे कसे?” मी भाबडेपणाने प्रश्न विचारला. “अरे काही नाही रे...

पर्वतांतली मध्यरात्र

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 02/09/2019 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
चमचमणारं स्फटिकरत्न आकाश माझ्या खिडकीतून आत पसरलंय माझ्या खोलीतल्या अंधाराचा बाडबिस्तरा बाजूला सारून सूचिपर्णी वृक्ष उंच गेलेत, अनादी काळापासून तसेच स्तब्ध बर्फ, वादळं, पाऊस, या सगळ्या महाभूतांशी नजर भिडवून माझी एकटी कुटी कडेलोटाच्या टोकावर तोल सावरून उभी आहे जणू गगनचुंबी इमारतीच्या माथ्यावरचं माझं पर्सनल पेंटहाऊस! अथांग दरीपलिकडे, अंधुक, गूढ क्षितिजावर आहेत अजूनही उत्तुंग शिखरं युगानुयुगे बर्फाचा तोच आरसा चंद्राला एकटक दाखवताहेत दूरवरून येतंय आर्त, सामूहिक, अखंड शृगालरुदन निसर्गाचे एकनिष्ठ गस्तकरीच ते कसं कोण जाणे, माझ्या मेंदूला दिलासा देतायत की बाबा, तू एकटा नाहीयेस .. .. आणि एकाकी

आर्टिकल 15

लेखक nishapari यांनी सोमवार, 02/09/2019 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
आर्टिकल 15 चा प्लॉट 2014 साली उत्तरप्रदेशातल्या एका गावात झालेल्या तीन मुलींच्या गॅंग रेपवर आधारित आहे. डेली लेबरवर काम करणाऱ्या तीन 15 वर्षांच्या मुली मालकाकडे तीन रुपये वाढवून मागतात आणि त्याने नकार दिल्यावरही अडून बसतात. गँगरेप करून ´त्यांच्या´ समाजाला धडा मिळावा म्हणून त्या मुलींपैकी दोन मुलींचा बलात्कार करून त्यांना जीवे मारून झाडाला लटकावलं जातं , तिसरी निसटण्यात यशस्वी होते . केस बंद करण्यासाठी त्या मुलींच्या वडिलांनाच त्यात गोवण्याचा प्रयत्न सुरू असतो .

तारिफ

लेखक मिलिंद जोशी यांनी सोमवार, 02/09/2019 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोकांना इतरांची प्रशंसा ( म्हणजे तारीफ हो... ) करण्याची खूप चांगली सवय असते. अगदी हृदयाच्या तळापासून ते समोरच्या माणसाची प्रशंसा करतात. मलाही खूप आवडते, लोकांनी माझी प्रशंसा केलेली. अगदी स्पेशल वाटतं दिवसभर. पण काही वेळेस अशा व्यक्ती आपली प्रशंसा करताना आपल्याला असली एकेक बिरुदे चिकटवतात की त्यावर हसावे की रडावे अशा प्रश्न पडतो. गोष्ट तशी बरीच जुनी आहे... माझ्या कॉलेज जीवनातली. पण अजूनही अगदी जशीच्या तशी आठवते आहे. त्या काळी मी क्रिकेट खेळायचो... म्हणजे अजूनही खेळतो म्हणा. पण आताच्या खेळण्यात आणि त्या वेळेसच्या खेळण्यात खूप फरक पडला आहे.

पहाट

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 02/09/2019 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
सांज सकाळी निळ्या आभाळी कुठून येतो पंखांना आवेग... कृष्णसावळ्या चित्रकथेतून कसा विहरतो जडावलेला मेघ! लज्जाभरल्या गालावरती कशी उमटते गोड गुलाबी लाली... घरट्यामधल्या त्या पिल्लांना कोण सांगतो उठा, पहाट झाली!

मनिषा (भाग २)

लेखक तमराज किल्विष यांनी सोमवार, 02/09/2019 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी पत्र तर पाठवलं, पण पुढं काय होणार हे कळणार कसं याच विचारात होतो. योगायोगाने एका आठवड्यानंतर मनिषाच आमच्या घरी आली. काहीतरी काम होते. सायकलवरून आली होती. आईकडे तिचं काम होते. ती काहीच बोलली नाही पण डोळ्यांनी खूप काही बोलली. माझी धडधड एकदाची थांबली. तिच्या कडून ग्रीन सिग्नल मिळाला यात मी खूपच खुश झालो होतो. परत एक पत्र पाठवले. दरम्यान माझं कॉलेज संपून एका कंपनीत जॉईन झालो होतो. आता मी माझा पत्ता दिला होता. नंतर मला तिने पत्राचं उत्तर दिले. एक ग्रिटींग कार्ड व चार पाच ओळींचं पत्र त्यात होतं. ' मला तुमची खूप आठवण येते' असं लिहिलं होतं. मग पत्रातून बोलणं सुरु झालं.