Skip to main content

आयकार्ड

लेखक मिलिंद जोशी यांनी गुरुवार, 05/09/2019 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
काल टीव्हीवर कुठलासा चित्रपट पहात होतो. चालू असलेल्या सीन मध्ये साध्या वेशात असलेला नायक दोन हवलदार घेऊन नायिकेच्या घरी जातो आणि आपण पोलीस असल्याचे सांगतो. तो साध्या वेशात असल्यामुळे अर्थातच नायिकेचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. ती त्याला त्याचे आयकार्ड मागते. त्याच्या चेहऱ्यावर आधी ‘आपल्याला आयकार्ड विचारणारी ही कोण?’ असे काहीसे भाव उमटतात, पण काही क्षणातच त्याचा चेहरा हसरा बनतो. तो आपल्या खिशातून आयकार्ड काढतो आणि अगदी फिल्मी स्टाईल मध्ये नायिकेसमोर धरतो. प्रसंग अगदी साधा.

मुझे नींद न आएssss

लेखक आजी यांनी गुरुवार, 05/09/2019 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
निद्रादेवी साधारणपणे मला प्रसन्न असली तरी क्वचित तिची अशीही एक वेगळीच तऱ्हा दिसते.. त्या दिवशी सगळं नेहमीप्रमाणे घडलं होतंं. रात्री माझं जेवण वेळेवर झालं होतं. मुलाशी,सुनेशी,नातवाशी गप्पा झाल्या होत्या. टीव्हीवरच्या माझ्या आवडत्या मालिका बघून झाल्या होत्या. मी नेहमीप्रमाणे माझ्या गादीवर आडवी झाले होते. एफ एम गोल्ड वरची लता,रफीची जुनी गाणी ऐकून झाली होती. आता झोपावं असा विचार करुन मी रेडिओ बंद केला. अंगावर पांघरुण घेत एसी सुरु केला. आता झोप येणं स्वाभाविकपणे अपेक्षितच होतं. अर्धा तास झाला, झोप नाही. मग एक तास झाला, पण झोप काही येईना. का बरं झोप येत नाहीये?

भाग १ जब वी मेट - नाशिकाचा अत्तरवाला -कुठे कुठे शोधले नाही तुम्हांस!

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 05/09/2019 10:47 या दिवशी प्रकाशित केले.

भाग १ जब वी मेट

काही दिवसापुर्वी म. टा. मधे जब वी मेट या सदरासाठी काही जीवनात घडलेल्या आठवणी लिहा म्हणून म्हटले गेले होेते. तो लेख पाठवून आता महिना झाला. कदाचित ते छापतील असे नाही असे वाटून इथे सादर करत आहे. 1 अचानक भेटीनंतर त्या एकमेकांचे जीवन कसे बदलले.

आमची मलेशिया भ्रमंती - क्वालालंपूर (भाग - २)

लेखक वैभव.पुणे यांनी बुधवार, 04/09/2019 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
इमिग्रेशन - टेक ऑफ - बाय बाय मुंबई
झालं तर मग, धास धुस, घाबरत घाबरत एकदाचे एअरपोर्ट मध्ये घुसलो.