इमिग्रेशन - टेक ऑफ - बाय बाय मुंबई
झालं तर मग, धास धुस, घाबरत घाबरत एकदाचे एअरपोर्ट मध्ये घुसलो. कुठे काय असते, कुठे नाही, काहीच कळायला मार्ग नाही, मार्गदर्शक होते, ते निघायच्या आधी यू ट्यूब वर बघितलेले काही व्हिडिओज फक्त!
तिकिटावर आलेले गेट नंबर म्हणजे तरी काय असते याचाच पत्ता नाही, तिकिटावर होते गेट नंबर ४०, आम्ही आपलं बाहेरच हुडकून बेजार बाबा गेट नंबर कुठाय नेमकी, शेवटी तिथल्या पोलीस कर्मचाऱ्याला विचारल, तेव्हा कुठं कळलं की, ट्रमिनल च्यां आत मध्ये गेल्यावर, जिथून विमान उड्डाण करत, ती जागा म्हणजे गेट नंबर!
हुश्श!
पटकन ऐरलाईन काऊंटर वरून बोर्डिंग पास घेतला, आणि मनातल्या मनात तिथल्या व्यक्तीला(आणि पूर्ण मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ला) सांगितलं की, बाबा आलोय आम्ही, आणि आता आमचं विमान येऊ द्या मलेशिया च!!
ईमिग्रेशन ला बराच वेळ बाकी होता, तोपर्यंत बॅग चे सिक्युरीटी चेक करून ट्रमीनल - २ आतमधून यथेच्छ न्ह्याहलले. काय ते अवाढव्य रूप, काय ती व्हीं आय पी स्वच्छता! हे भले भले डिस्प्ले लावलेले, आमचं विमान येतय ना वेळेत याची खात्री त्या डिस्प्ले वर करून घेतली. ड्युटी फ्री, रेसटॉरंट्स, एक्सचेंज काऊंटर, मदत हवी का केंद्र, याचं भरपूर अध्ययन केलं.
कुणी बाहेरचे सिम कार्ड विकत होत, तर कुणी ट्रॅव्हल इन्शुरन्स!
आम्ही माहिती काढली होती, तिथं गेल्यावर ट्रॅव्हल सिम कार्ड भेटत, त्यामुळे लक्ष नाही दिले.
२ तास आधी म्हणल घाई नको, म्हणून पटकन इमिग्रेषण करून घेतलं, वाटल आता ह्यो बुवा काय काय विचारतो काय माहित फाड फाड, कशाला चालला न कुठे न कशासाठी! इथ तर उल्टच सगळ, चक्क मराठीतून चौकशी झाली, ती फक्त, जन्म गाव कुठलं आणि परत कधी येणारे भारतात!
मी अवाकच!
सगळी भीती एका क्षणातच निघून गेली.. म्हणलं हे तर फारच सोपं दिसतंय गड्या! आपणच ट्रीप अरेंज केली, त्यामुळे, आता विश्वास आणखी वाढला की, आपण आपलं टार्गेट टू क्वालालंपूर फिरून येणे अगदी सहज करणार!
ऑफिसर एकदम साधे आणि टेंशनहो केलं!!
आता फक्त वाट होती ती, कधी एकदा त्या गेट नंबर ४० च्या बाहेर आमचं विमान दिसतय आणि आम्ही कधी एकदा त्यात बसतोय!
तोपर्यंत अख्खा T-२ चे फोटो काढ, व्हिडिओ काढ, सगळ करून घेतलं!
तोंड धुतलं, आवरा आवर केली, आणि सज्ज झालो, विमानात बसायला!
दे दणादण!! एअरलाईं क्रू कडून स्वागत झालं, आपली आपली सिट पकडली, थोडी घबरट कमी होईना, धाकधूक वाढली आता. आता पुढे काय होतय आणि काय माहित.. हे देवाचा धावा केला! बाबारे नीट विमान उडू दे, तिकड नीट होऊ दे, आणि नीट वापस येऊ दे आम्हा दोघांना!
आनौन्स्मेंट झाली, सिट बेल्ट लावले, आणि जय हरी करत एकदाच विमान टेक ऑफ झाले!
काय ती मुंबई, अबब!!!
विमान रात्रीचे असल्यामुळे, टेक ऑफ झाल्यावर, मुंबईचे अती विहंगम ते दृश्य!! नुसती दिवाळी ला आकाशात आतशबजी, तशी आता खाली मुंबईत दिसत होती, बघता बघता विमानाने दिशा बदलली, आणि १० मिनटात झगमगती मुंबई गायब झाली....
.... टू बी कण्टिण्यू इन भाग - ३....
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त. माझा पहिला विमान प्रवास
मस्त. माझा पहिला विमान प्रवास आठवला. पण मी सराईतासारखा वागलो होतो. जसा रोजच विमानाने हिंडतो.
:,-):,-)कुठे होता पहिला परदेश
In reply to मस्त. माझा पहिला विमान प्रवास by तमराज किल्विष
:,-):,-)कुठे होता पहिला परदेश दौरा?
पहिला विमान प्रवास भारतातच
पहिला विमान प्रवास भारतातच मुंबई ते दिल्ली असा केला होता. :-)
मस्तच !
In reply to पहिला विमान प्रवास भारतातच by तमराज किल्विष
मस्तच !
नवी नवलाईच वर्णन सुंदर ...
नवी नवलाईच वर्णन सुंदर ...
मनापासून धन्यवाद!! आपल्या
In reply to नवी नवलाईच वर्णन सुंदर ... by रायनची आई
मनापासून धन्यवाद!! आपल्या छोट्याशा कमेंट्स, खूप कौतुक करत आहेत!
झक्कास
पुढचा भाग लवकर येउद्या
येणारच! अशाच कमेंट्स येऊ द्या
In reply to झक्कास by भंकस बाबा
येणारच! अशाच कमेंट्स येऊ द्या, लवकर लवकर टाकेल.. धन्यवाद कौतुक केल्याबद्दल!
छान चाललीय लेखमला
पु.भा.प्र.
अरे व्वा...
आधि माहिती असतं तर एक कट्टा केला असता की कौलालंपूरात!
- (मलेशियावासी) सोकाजी
कुठे आहात सध्या? क्वालालंपूर
In reply to अरे व्वा... by सोत्रि
कुठे आहात सध्या? क्वालालंपूर का?