Skip to main content

कारभारीण

लेखक हजारो ख्वाईशे ऐसी यांनी सोमवार, 30/09/2019 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शकतो याचं नेहमीच कोडं पडायचं तिला. सगळेच त्याच्या प्रेमात. अर्थात गाऱ्हाणे सांगणारेही असंख्य. पण गाऱ्हाणेही त्यालाच सांगतात याचा अर्थ तो ते समजून घेऊन सोडवू शकतो म्हणूनच. त्याला भेटायला यायचं म्हणून एका तालात पावलं टाकणारे, त्याच्या नामाचा जयघोष करणारे वारीतले हजारो जीव बघितले कि उर दडपून जायचा एखाद्याचा. पण तो तो आहे. आपल्या अगणित लेकरांना पाठीशी घालणारा, त्यांच्या असंख्य चुका पदरात घेणारा आणि तरीही त्यांच्या प्रत्येक हाकेला ओ देणारा. द्वारकाधीश श्रीकृष्ण. आणि ती?

सह्याद्रीतले हिरे माणके

लेखक Yogesh Sawant यांनी सोमवार, 30/09/2019 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या पश्चिम भागात किनारपट्टीला समांतर पसरलेली जी डोंगररांग आहे तिला आजकाल Western Ghat असं म्हणतात. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमाभागापासून सुरु झालेली हि डोंगररांग महाराष्ट्राच्या पलीकडे गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोचते. पृथ्वीवरच्या सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी हि एक जागा आहे. त्यामुळे हे आहे एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज. काहींसाठी त्यांच्या घरापासून काही तासांच्या अंतरावर असलेला एक अमूल्य ठेवा. काहींसाठी वीकएंड पिकनिक स्पॉट. काहींसाठी महाराष्ट्राचा आणि त्यामुळे देशाचा जाज्वल्य इतिहास. हे सगळं तर आहेच.

१-जी

लेखक आजी यांनी सोमवार, 30/09/2019 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या नातवाच्या मते मी सेकंड, थर्ड वगैरे जनरेशनची नव्हे तर अगदीच फर्स्ट जनरेशनची आहे. म्हणजे १-G म्हणे. तो काय बोलतो त्याचं बरेचदा मला ज्ञान नसतं. तो माझ्या खोलीत येतो ते बिजनेस {मराठीत व्यापार डाव } खेळण्यासाठी. त्यात तो सरळ सरळ मला गंडवतो.

...आणि या मार्गानेही खरंच जग जवळ आले

लेखक सचिन यांनी सोमवार, 30/09/2019 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॉट्सअप च्या ग्रुपमधून नाव काढून टाकले आणि सोशल मीडियाचे भूत मानगुटीवरून उतरले मोबाईलच्या गुलामीतून जणू स्वातंत्र्य मिळाले "मान वर करून" आता जगता यायला लागले ह्याचा फॉरवर्ड त्याला, त्याचा फॉरवर्ड ह्याला भलभलत्या विषयांवरचे वादविवाद संपले दिवसाचे तास तर एवढे वाढलेत आता की लॉंग पेंडिंग पुस्तकांचे वाचन करता आले हॅप्पी गणेश चतुर्थी आणि हॅप्पी गुढी पाडवा ईद,ख्रिसमस, पोंगल, ओणम सकट सगळे सेल्फ्या काढण्या शिवाय सुद्धा साजरे व्हायला लागले बर्थ डे बिर्थ डे सारे मात्र लक्षात ठेवणे आले ! एच बी डी पोस्ट करण्यापेक्षा फोन सुरु केले "कॉन्टॅक्टस"शी बोलून जरा सेंटी बिंटीही वाटले आणि या मार्गानेही खरं

रचना आणि निर्मिती ( डिझाईन आणि उत्पादन )

लेखक चौकस२१२ यांनी सोमवार, 30/09/2019 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
रचना आणि निर्मिती ( डिझाईन आणि उत्पादन ) इंडस्ट्रियल डिझाईन किंवा प्रॉडक्ट डिझाईन इंजिनीरिंग , आणि त्याला सल्गना असलेले बहूउत्पादन या क्षेत्रात कोणास मार्गदर्शन/ माहिती पाहिजे असल्यास संपर्क साधावा

India Deserves Better - ३. शहरीकरण, अनधिकृत बांधकाम, समस्या आणि नियोजनाचा अभाव.

लेखक गणेशा यांनी सोमवार, 30/09/2019 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
शहरीकरणाच्या समस्ये वर बोलण्या आधी यावेळेस मी आधी थोड्या फार नियोजनाबद्दल बोलतो त्या नंतर समस्या आणि उदासिनता यावर बोलेन. शहरीकरणाची धोरणे यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय आर्थिक धोरण, क्षेत्रीय धोरण आणि शहराचे अंतर्गत व्यवस्थापन हे घटक महत्त्वाचे ठरतात. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे संहार आपण नुकतेच पाहिले आहेत, केरळ हे त्याचे ताजे उदाहरण, २०१५ मधील चेन्नई मधील पूर, पण या मधुन आपण काय शिकलो ? अनधिकृत मुद्याबद्दल मी नंतर बोलेणच पण घनत्व आणि अतिसंवेदनशिल भाग हे सुद्धा खुप जोखीम असलेले मुद्दे आहेतच. शहरीकरणाला चांगली बाजूही आहे. देशाचा आर्थिकविकास हा शहरीकरणावरही अवलंबून असतो.

नवता आणि परंपरा...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 29/09/2019 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रधनूच्या जवळपास सगळ्या रंगांचा सुरेख संगम साधत रंगविलेला केशसंभार, आधुनिक वेषभूषातत्वानुसार अंगाचा आवश्यकतेपुरता भाग झाकला जाईल एवढाच वस्त्रसंभार, हातात इंपोर्टेड पर्स आणि पायात हायहिल सॅंडल अशा मादक वेषातली ती सुंदरी आपल्या गाडीतून उतरली आणि पन्नासेक पावलांवर असलेल्या ब्यूटी पार्लरच्या दिशेने चालू लागली. आसपासचा रस्ता, काही क्षण थबकला! तिकडे कुठेच लक्ष न देता ती रूपगर्विता आपल्याच तोऱ्यात मादक पदन्यास टाकत रस्ता कापत होती... ...अन् अचानक तिच्यासमोरून एक भेदरलेलं मांजर रस्ता आडवा कापून पलीकडच्या बांधाआड गायब झालं! क्षणात तिच्या चालीची लय थबकली. ती जागच्या जागी उभी राहिली.

कळावे, लोभ असावा...

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 29/09/2019 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे ३५ वर्षांपूर्वीचा काळ. संगणकाशी माझा अद्याप परिचय झालेला नव्हता. मोबाईल फोन तर स्वप्नातही नव्हते. तेव्हा संदेशवहनासाठी दोन मुख्य साधनांचा वापर प्रचलित होता – एक स्थिर-फोन आणि दुसरे पत्र. फोनचे दर हे आजच्यासारखे किरकोळ नव्हते. त्यामुळे फोनचा वापर विचारपूर्वक आणि मर्यादित असे. परदेशी फोन तर फक्त अत्यावश्यक किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत केले जात. पत्रलेखन विविध कामांसाठी बरेच होई. जसे की व्यक्तिगत, कार्यालयीन, विविध आमंत्रणे, जाहिराती, पत्रमैत्री, इ. महाविद्यालयीन जीवनात मी माझ्या परगावी आणि परदेशात असलेल्या आप्तस्वकीयांना हटकून पत्रे लिहीत असे.