Skip to main content

अन रात झाली शाम्भवी

लेखक खिलजि यांनी बुधवार, 11/12/2019 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
अलवार त्याचा अस्त झाला अन रात झाली शाम्भवी चांदवा घेऊन तारे जणू सूर छेडे भैरवी कोण या हृदयात आले ? वाट शोधून ती नवी प्रहर भासे वेगळा जणू अंतःपुरा उगवे रवी गुंजते सुमधुर कर्णी नाद लावे भार्गवी श्वास गेले लोपुनी अन चित्त झाले पाशवी भेट होता लोचनांची आत फुटली पालवी बहरला तो प्रेमवृक्ष दृष्टी सृष्टी हिरवी ======================= सिद्धेश्वर विलास पाटणकर

जग सारे सुंदर व्हावे?

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 10/12/2019 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
जग सारे सुंदर व्हावे? ----------------------------------------------------------------------------------------------- आज शाळेचा पहिला दिवस होता. अंजली खुशीत होती. तिला मुलं आवडायची. ती एसटीमध्ये बसली होती. बसायला जागा मिळाली तसे तिने डोळे मिटले. तिच्या डोळ्यांपुढे निधीचा चेहरा होता. निधी, तिची मुलगी. नुकताच पहिला वाढदिवस झालेली. नाजूक अन गुटगुटीत. एसटी थांबली. ती शाळेत निघाली. स्टॅन्डपासून शाळा पंधरा- वीस मिनिटांच्या अंतरावर होती . ढग यायला लागलेले. पण पाऊस नव्हता. छोटीशी शाळा. पुढे पटांगण असलेली .छान होती. आज फुललेली.

विरह X शब्दकथा

लेखक पुनप्पा यांनी मंगळवार, 10/12/2019 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे तीन वाजले होते, तिच्या डोळ्यात झोप मात्र काही केल्या येत नव्हती. नवऱ्याची फ्लाईट 2 वाजता पोचणार होती अमेरिकेला, अजून का बरे फोन नाही आला. नक्कीच फ्लाईट डिले असणार कारण आपला नवरा आपल्यावर किती जास्त प्रेम करतो हे तिला माहीत होते. किती काळजी करतो आपण, काही नाही येईल नक्की फोन.तिने स्वतःलाच समजावले. विचार करत करत किती वेळ गेला तिलाही कळले नाही. अचानक 4 वाजता अलार्म वाजू लागला. बेडवरून उजव्या साईडला ती वळली तेवढ्यात तो कपडे घालत घालत म्हणाला- बाईसाहेब निघतो आता मी, दूध घालायला जायचा वखत झाला. आज रातच्याला फोन करा परत मूड असला तर.

हिपोक्रसी 1 - हुंडा

लेखक पुनप्पा यांनी मंगळवार, 10/12/2019 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ - कॅफेटेरिया ती - काय रे लग्नासाठी मुली बघतोयस ना. काही प्रगती होतेय का? तो - नाही ना. अजून काही नाही. ती (हसून) - हुंडा वगैरे मागत नाहींयस ना? तो - नाही. का विचारले असे? ती - मी हुंड्याच्या अगदी विरूद्ध आहे. मुलांकडचे लोकांना पैसा सोडून काही दिसत नाही का. माझे एथिक्स आहेत, त्यामुळे मी खूप स्थळे नाकारली. तो- बरोबर आहे. तुझे याच वर्षी लग्न झाले, तू नवरा कसा निवडलास? ती- माझे निकष आधीच स्पष्ट होते.

Indian Navy Ship रणवीर

लेखक bhagwatblog यांनी सोमवार, 09/12/2019 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणा पासून मला भारतीय सैन्य आणि नौदल बद्दल प्रचंड आकर्षण होत. मी लहानपणी सातारा सैनिक स्कुल साठी परीक्षा सुद्धा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी मी विशेष क्लासेस सुद्धा लावले होते. परंतु मी सातारा सैनिक स्कुल प्रवेश परीक्षा काही चांगल्या मार्काने पारित होऊ शकलो नाही. पण एखादा आर्मी/नौदल ऑफिसर भेटल्या नंतर त्यांचा पोशाख, चालण्यात एक प्रकारचा रूबाब, आणि बोलण्यात आत्मविश्वास बघून भारतीय नौदला बद्दल प्रचंड आदर आणि आकर्षण वाटते. मला भारतीय नौदला विषयी जाणून घ्यायला खूप आवडते. भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे.

राजा विक्रमादित्य

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 09/12/2019 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
उज्जैनचे प्रसिद्ध यांच्या भावाचे नाव राजा भर्तृहरी होते. एकेकाळी राजा भर्तृहरी यांना अत्यंत विद्वान, ज्ञानी राजा म्हणून ओळखले जायचे. परंतु दोन पत्नी असूनही ते पिंगला नावाच्या अतिसुंदर राजकन्येवर मोहित झाले. राजाने पिंगलाला तिसरी पत्नी बनवले. पिंगलाच्या रूपरंगावर आसक्त झालेला राजा विलासी झाला. राजा पिंगलाच्या तालावर नाचू लागला होता. याच गोष्टीचा फायदा घेत पिंगला व्यभिचारिणी(चारित्र्यहीन स्त्री) झाली. . ती घोडे सांभाळणार्‍या सेवकाच्या प्रेमात पडली. राजाला पिंगलाचे हे कृत्य माहिती नव्हते, कारण तो तिच्या प्रेमात आंधळा झाला होता.

विस्मरणात गेलेले किचन टुल..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 09/12/2019 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
. चिमटा हे स्वयंपाक गृहातले महत्वाचे टुल आहे.. हल्ली अनेक प्रकारचे चिमटे बाजारात मिळतात.. आमच्या लहान पणी असा चिमटा स्वयंपाक गृहात असायचा.. एका बाजुनी गरम पातेली सतेले आदी साठी होता तर दुसरी अर्ध गोलाकार बाजुनी "अर्धी कडची" उकळत्या द्रवांची मोठी पातली उचलण्यासाठी वापरली जाते. एका बाजूने चांगली पकड मिळते आणि उकळीच्या वाफा-यापासून हात लांब रहात असे.. असो.. अहा ते सुंदर दिन हरपले ..

सहल

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 09/12/2019 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुजी २०-२५ मुलाना घेऊन वन सहलिला निघाले असतात.. . वाटेत अचानक विजा कडकडु लागतात..सोसाट्याचा वारा सुटतो.पाऊस सुरु होतो .व मुले घाबरतात.८-९ वर्षाची असतात गुरुजीना बाजुलाच एक गुहा दिसते व ते मुलाना म्हणतात "मुलानो चला त्या गुहेत आपण पाऊस संपेपर्यंत निवारा घेऊ. मुले व गुरुजी दाटिवाटीने गुहेत आंग चोरुन उभे असतात..पण एक घटना घडते.. एक विजेचा लोळ गुहेच्या तोंडाजवळ येऊन आदळत असतो..मुले घाबरतात.. हा प्रकार सारखा चालु असतो.. गुरुजी विचार करतात अन मुलाना म्हणतात..मुलानो..आपल्यामधे असा एकजण आहे ज्याला मारण्या साठी विज सारखी गुहेच्या मुखाजवळ आदळत आहे....आपण असे करु समोर झाड आहे...आपल्या पैकि एक एक जण घाव

मिसळपाव

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 09/12/2019 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुका वर पट्टीचे पोस्ट पोस्टणारे हलवाया सारखे असतात जातीचा हलवाई एक घाणा बाहेर काढल्यावर गिऱ्हाइकांकड़े दुर्लक्ष करून पुन्हा तन्मयतेने पुढचा घाणा तळायला घेतोच. तस असते यांचे फेसबुक /मिसळपाव हा एखाद्या नदीच्या पाण्या सारखा प्रवाह आहे--आपल्या पोस्ट त्या पाण्या सोडल्या जाणा-या कागदी होड्या असतात.

(सूरनळीचे उपयोग)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 09/12/2019 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
एका कोपर्‍यात अंग फुगवून बसली होती सूरनळी टोकावरल्या डोळ्यांनी मला पाहत होती || माझ्याशी बोलायला लागली ती जेव्हा खरे नाही वाटले मला तेव्हा तुम्हालाही माहित आहे ही आहे थापेची गोळी || " अनेक गोष्टीं मधे उपयोग माझे जळी स्थ्ळी तरी तुम्ही का बोलतात घालून घे रे सूरनळी हेअर पीन ने कान कोराल तर त्याने सूजेल कानाची पळी || पूर्वी आदेशांना होता मोठा बाजार भाव साहेबांच्या मागे धावायचे सगळे रंक आणि राव आता मात्र न्याय आहे बळी तो कान पिळी || कधीही मी कामी येई सुटता कानी खाज कोणत्याही कागदाचा तुकडा शोधा सोडून लाज मोठ्या निगुतीने मग त्याची गुंडाळी वळी || उपयोग संपल्यावर तुम्ही मला कचर्‍यात टाकता चोळामोळ