Skip to main content

चुलीवरच्या मिसळीची पाककृती

लेखक निनाद यांनी गुरुवार, 09/01/2020 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
चुलीवरच्या मिसळीची पाककृती "तुम्च्या मिसळीची पाककृती आमाला पायजेल" अशी विचारणा आल्याने ही कृती देत आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने यात बदल करून घ्यावेत. --- गरम असा दिवस पाहून ठेवावा. मग सर्वात आधी दुकानात जाऊन आवडती बियर बाटल्यांची एक थंडगार केस आणावी. आपल्या आवडीचे धम्माल मित्र-मैत्रिण लोक घरी बोलवावेत. मस्त बियर पीत गप्पा हाणता हाणता अगदी रंगात आल्या की, 'चला चुलीवरची मिसळ करायची का?' असे पिल्लू सोडावे. ही कल्पना बहुदा सर्वांना आवडतेच! मग चूल पेटवण्याचे प्रयत्न सुरू करावेत. या वेळा पर्यंत सर्वांची 'किमान बियर पातळी' गाठलेली असेल तर उत्तम असते.

कूर्ग डायरीज ३

लेखक अभिरुप यांनी बुधवार, 08/01/2020 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
कूर्ग डायरीज ३ प्रस्थान आम्ही ज्या मोसमात फिरायला जात होतो हा मोसम खूप गर्दीचा असणार होता कारण नवीन वर्ष येऊ घातले होते. या गर्दीचा वैचार करून आमची सहल आम्हाला पार पाडायची होती. त्यामुळे निश्चितच एक प्रकारचं दडपण मनावर होतं . पण मुलींच्या आणि आमच्या सुट्ट्या याच काळात असल्याने परिस्थितीचा स्वीकार करणे क्रमप्राप्त होते. बेंगळुरू ते मदीक्केरी हे अंतर सुमारे २७५ ते ३०० किमी आहे. त्यामुळे प्रवासाचे ६ तास लागणार हे नक्की होते.

सेल्फिश

लेखक प्रमोद पानसे यांनी बुधवार, 08/01/2020 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला वारंवार कल्पना देउन आणी सावध करुनही काहिही फरक पडत नव्हता सुमती !! " आज पुन्हा एकदा ईगलमधे फृटज्युस च्या जागी बिअर आॕर्डर करणाऱ्या सुमतीसमोर मी घसा कोरडा करत होतो. सुमती .. माझ्याच कंपनीमधे ट्रेनी इंजिनियर म्हणुन अपॉईंट झालेली .येउन सात महिने लोटलेले.फ्रेश इंजिनियर होती.विस एकविस वर्षाच्या सुमतीचं जॉईन झाल्यावर एक महिन्यातच माझ्या डिपार्टमेंटला पोस्टींग झालं.आणी तीला प्रॉडक्शन प्लॕनिंगचे धडे देता देता कंपनीच्या वातावरणाचे ,आजुबाजूला वावरणार्या लोकांच्या मेंटलीटीचे धडे देणं गरजेचं वाटू लागलं.

महाराष्ट्राचा गवगवा वाढत आहे

लेखक माहितगार यांनी बुधवार, 08/01/2020 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी मागे एक महाराष्ट्रीय स्त्री जेव्हा देशाची लाज काढते ? :( नावाचा लेख लिहिला. इंटरेस्टींगली संदर्भाचा व्हिडीओ कदाचित माजी पाकिस्तानी राजदूतांनी चुक उमगल्या नंतर कधितरी हळूवार डिलीट केला त्यामुळे त्या लेखात पोक्ळी निर्माण झाली होती. त्याच महाराष्ट्रीयन स्त्री लेखिकेस स्वदेश विरोधाचे काम सध्या कसे चालू आहे हे माहित नाही पण केवळ स्वदेश विरोध पुरेसा नसतो त्याचा गवगवाही झाला पाहिजे तर गवगवा चालू ठेवणारे आणखी नव्या मराठी कथालेखिकेचे नाव पुढे आले आहे. तर सदर मराठी लेखिका हिवाळ्याची गार हवा खाण्यासाठी बाहेर निघते.

हातचं राखून

लेखक Rohini Mansukh यांनी बुधवार, 08/01/2020 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
दात नाही यावे दिसून हसतो आम्ही हातचं राखून सर्वांपासून लपून छपून रडतो आम्ही हातचं राखून वजनावर डोळा ठेऊन जेवतो आम्ही हातचं राखून पहाटेचा गजर लावून झोपतो आम्ही हातचं राखून करत नाही मनापासून मदत करतो हातचं राखून मित्रांनाही तोलून मोलून मैत्री करतो हातचं राखून भावनांना आवर घालून जगतोच आम्ही हातचं राखून - सौ. रोहिणी विक्रम मनसुख
काव्यरस

हतबल

लेखक शब्दसखी यांनी मंगळवार, 07/01/2020 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर टक्क जागा आहे मी. घरच्यांना वाटतंय की झोपलोय मी अजून, पण जागा आहे मी. डोक्यावरचा पंखा मंद फिरतोय. तोही सहन नाही होत आहे मला. पण उठून बंद नाही करू शकत मी. हतबल आहे मी.

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-८ } गोल्ड रश & रिसेट ?

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 07/01/2020 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षात जागतिक स्तरावर जॉब लॉस आणि स्लो-डाउन पहावयास मिळाले असुन, चालु वर्षाची सुरुवात अमेरिकेने इराणच्या सुलेमानी यांना ठार करुन केलेली आहे ! मिडल इस्ट आणि तेल याकडे आता पहावे लागेल, तसेच जरी जालावर तज्ञ मंडळी इराण अमेरिका थेट युद्ध करण्याची शक्यता कमी आहे असे सांगत असले तरी वेळ आल्यास इराण Strait of Hormuz ब्लॉक करण्याचा न्यूक्लिअर पर्याय वापरेल का ? P1 हा मार्ग अत्यंत चिंचोळा मार्ग असुन रुंदीला फक्त २१ मैल आहे, या

उभे गाढव मुकाबला

लेखक विअर्ड विक्स यांनी मंगळवार, 07/01/2020 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून आपणास हा लेख जलिकट्टी व तत्सम चुरसदार खेळाची माहितीपट आहे अशी अपेक्षा असेल तर आपला अपेक्षाभंग होऊ शकतो. सहसा अशी वाक्ये तळटीप म्हणून वापरतात परंतु लेखाच्या सुरवातीलाच असे वाक्य टाकण्याचे 1च कारण !वाचकसंख्या वाढवण्यासाठी थोडा "धुरळा " उडवायचा होता. धुरळा हा समीर विद्वंस दिग्दर्शित चित्रपट ३ जानेवारीला प्रदर्शित झाला .२०-२०च्या जमान्यात नव-वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटाने झाली. चित्रपट पाहिला नि आवडला सुद्धा. धुरळा चित्रपटाची स्टारकास्ट तगडी आहे.

माझं हॉटेलिंग..

लेखक आजी यांनी मंगळवार, 07/01/2020 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझं लहानपण सांगलीत गेलं. बापटबाल आणि पटवर्धन हायस्कूल ह्या माझ्या शाळा. माझं कुटुंब साधं, बाळबोध. अशा घरात बाहेरचं खाणं ही अशक्यप्राय गोष्ट होती.तरीही मी हॉटेलात जाण्याचा पराक्रम केला. मी मॅट्रिकला असतानाची गोष्ट! त्यावेळी सांगली गाव आजच्याइतकं विस्तारलेलं आणि पुढारलेलं नव्हतं. गजानन मिल, काळी खण, प्रताप टॉकीज हे गावाच्या बाहेर आहेत असे वाटे. हरभट रोड, कापडपेठ किंवा मेन रोड, गणपती पेठ आणि गाव भाग हेच मुख्य गाव. राममंदिर,ओव्हरसिअर कॉलनी हे भाग आजच्याइतके गजबजलेले नव्हते.

कूर्ग डायरीज २

लेखक अभिरुप यांनी मंगळवार, 07/01/2020 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वतयारी हॉटेल बुकिंग आणि विमान तिकिटांचे आरक्षण अगोदरच झाल्यामुळे जीव तसा निर्धास्तच होता. तत्पूर्वी कूर्ग बद्दल खूप जणांकडून माहिती घेतली होती. आंतरजालावरून सुद्धा खूप माहिती मिळाली. कूर्ग हे मुळात एक थंड हवेचे ठिकाण , अगदी आपल्या महाबळेश्वर प्रमाणे . पण कूर्ग मध्ये महाबळेश्वर सारखी स्ट्रॉबेरी नाही पिकत बरं का. तिथले मुख्य आकर्षण म्हणजे कॉफिचे मळे . कूर्गचा बहुसंख्य भाग हा कॉफी आणि मिरी किंवा वेलची अश्या मसाल्याच्या पिकांनी व्यापलेला आहे. कूर्गची कॉफि जशी प्रसिद्ध तसेच तिथले संत्र सुद्धा प्रसिद्ध आहे.