Skip to main content

मोगँबो - ६

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 01/04/2020 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
काहितरी करायलाच हवे, त्या खोलीला एक खिडकी होती . ती उघडायचा प्रयत्न केला. पण एकदम ज्याम होती. कधी उघडलीच नसावी. त्या खोलीत एक पलंग त्यावर मळकट चादर आणि एक बाथरूम होते. मला बसायला एक तोडकी मोडकी खुर्ची. तो माणूस यायच्या आत इथून पळून जायला हवे. खिडकी उघडतच नव्हती इथून बाहेर जायचा काहीतरी मार्ग शोधायलाच हवा. मी दारापाशीच उभी राहिले..
मागील दुवा : http://misalpav.com/node/46314 किती वेळ गेला असेल माहीत नाही. मी तशीच दाराच्या जवळ उभी राहिले. जिन्यावर कोणाची तरी पावले वाजली. दाराची कडी उघडल्याचा आवाज. हाच एक क्षण हीच एक संधी.

बास्टऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽर्ड

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 31/03/2020 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
जण्या ( एक वहीतले पान दाखवत ): गुरुजी, गुरुजी ! बास्टऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽर्ड त्याच्यातला आदेशात्मक व्याकरणाभिमानी शिक्षक जोरात किंचाळला मग स्वतःच्याच रागास गिळत समजावणीच्या स्वरात तुला नाही रे, तुझ्या अमूर्त अबोध कलेला म्हणालोय जिची एकही रेषा सरळ नाही जिचे एकही वळण बरोबर नाही सहपाठी मुरक्या मारत कुत्सितपणे जण्याला हसू लागले तोंड पाडण्याएवजी जण्याबी तोंडवर करुन हसू लागला जण्या मूर्खा गाढवा लाज नाही वाटत वर तोंड वर करुन हसतोस जण्या : त्यो अमूर्त चुकलेलं चित्तर बास्टर्ड म्हजी काडणारा स्लट!

.. तम दाहक लहरी होते!

लेखक राघव यांनी मंगळवार, 31/03/2020 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
डोहातील गर्ता जर्द.. ते डोळे जहरी होते! खग निष्पाप जरी तो.. ते व्याधच कहरी होते! गावातील नाती तुटती.. ते कपडे शहरी होते... स्वातंत्र्य कुणाला येथे? [मन स्वतःच प्रहरी होते..] पणतीची वातीवर भिस्त! तम दाहक लहरी होते! -- तृष्णांची मनात वस्ती.. अन् मुखात श्रीहरी होते.. राघव

सोशल डिस्टन्सिंग

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 31/03/2020 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
सोशल डिस्टंन्सिंग एकदा टिळक स्मारकला वसंत व्याखानमालेला गेलो होतो. व्याखान आमच्या मित्राचच. सुरवातीला मी, व्याखाते व आमची एक मैत्रिण असे अनौपचारिक गप्पा संयोजकांशी झाल्या. ऑडिटोरियम मधे गर्दी भरपूर झाली होती. सुरवातीच्या रांगा राखीव होत्या. मैत्रिण तिथे पर्स शेजारच्या खुर्चीवर ठेवून बसली मी तिथे शेजारी बसावे अशा सहजप्रवृत्तीने गेलो. तिने नाईलाजाने पर्स मांडीवर घेतली असावी.( हा आपला अंदाज) काही काळा नंतर तिचे बहुतेक लक्ष लागेना. मग तिने माझ्या उजव्या बाजूला पर्स ठेवून पर्सच्या शेजारी बसली. मगच तिचे लक्ष व्याखानात लागले. मी मनातल्या मनात हसलो. कारण मला एक किस्सा आठवला होता.

रिक्षा आणि सरकार!

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 31/03/2020 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वत्र कोरोनाच्या चर्चा सुरू असतानाही काल एका वेगळ्याच, अनपेक्षित व त्यामुळे धक्कादायक असलेल्या एका बातमीने लोकांची झोप उडाली. खरे तर अशा घटना कुठेकुठे अधूनमधून होत असतात, पण या घटनेची मात्र जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांच्या भुवया उंचावल्या, संशयाचे वारेही वेग घेऊ लागले. नेमके याच काळात, जेव्हा सारे लक्ष एखाद्या संकटाचा सामना करण्यावर केंद्रित झालेले असतानाच असे कसे घडले असेही अनेकांना वाटून गेले. त्यावरही कडी म्हणजे, या घटनेत नेमके काय नष्ट झाले असा, जुन्या घटनेत अधोरेखित झालेलाच सवाल पुन्हा एकदा पुढे आला.

लॉकडाऊन : सातवा दिवस

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 31/03/2020 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार आणि सुसकाळ मिपा मित्र मैत्रिणी सखे सुहृद हो ! बाहेर ऊन आणि कोरोनाविषाणू मी मी, तू तू, तुम्ही तुम्ही म्हणताहेत आणि आत आम्ही आपापल्या वर्तुळात सुखेनैव पण जरासे भेदरलेले , लक्ष्मणरेषा सांभाळत बसलो आहोत. आज लॉकडाउनचा सातवा दिवस ! आपण म्हणजे जगाचं केंद्र आहोत असं वाटू लागलंय. कारण जगामध्ये घटना इतक्या वेगाने घडताहेत आणि आपण एकाच जागी ठप्प ! अर्थात, वर्क फ्रॉम होम सोबतच बरेच दिवस तुंबलेले होम-वर्कसुद्धा सुरू असल्यामुळे वेळ जात नाही ही बातच नस्से ! काही काही सोप्या पाकृ (उपलब्ध आयटेम्स मध्ये) प्रयोगावून घेतल्या. विशेष म्हणजे टेस्टीही झाल्या.

कर्फ्यू , कॉफी आणि बरंच काही......

लेखक सरनौबत यांनी मंगळवार, 31/03/2020 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
कर्फ्यू, कॉफी आणि बरंच काही...... २२ मार्चला मोदीजींनी एक दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला. फक्त एक दिवस देखील बाहेर न पडता घरीच राहायचे ही कल्पना अनेकांना अशक्य वाटू लागली. ह्या एका दिवसात घरी पासून काय करत येईल ह्याचे मेसेजेस यायला लागले. हा शिंचा कोरोना लवकर आटोक्यात येणार नाही असे दिसताच '"न भूतो न भविष्यती" असा चक्क २१ दिवसांचा लॉकडाऊन २५ मार्चपासून भारतभर जाहीर झाला. समर्थांच्या "जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे, सकळ जन" उक्तीनुसार लोकांनी व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड करण्याचा धडाका लावला.

मॅकरोनी पास्ता

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 30/03/2020 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
आता परवाच आमच्या इथल्या जवळच्या सुपरमार्केटमध्ये किरकोळ किराणा आलायला गेलो होतो. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंचे दुकान असल्यामुळे दुकान अर्थातच उघडे होते, सकाळी लवकर गेलो असल्याने गर्दीही नव्हती. गरजेच्या वस्तू घेता घेताच नजर मॅकरोनीवर पडली आणि इतर सामानासहित ती देखिल घेऊन आलो. आज अचानक पास्ता खायची लहर आली.

मोगँबो - ५

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 30/03/2020 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
तिथल्या माणसानेअगोदर मला जवळजवळ हाकलूनच दिले. बराच वेळ थांबल्यावर त्याला माझी दया आली असावी. त्याने आतल्या एका माणसाला विचारले आतल्या माणसाने परळ च्या पोस्ट ऑफिसात विचारा परळचे पोस्ट ऑफिस उद्या सकाळी उघडेल म्हणून सांगीतले. मी पुन्हा दादर स्टेशनवर आले. त्याच प्लॅटफॉर्मवर रंजन ताईची वाट पहात राहिले. रंजन ताई जीना उतरत कोणाबरोबर तरी येत होती.
रंजन ताईने मला हात केला. मीही केला. तीच्या सोबत असलेल्या दाट कुरळे केस , असलेल्या त्या काळ्या कुळकुळीत माणसाशी ती कसल्याशा कानडी भाषेत बोलत होती. तो माझ्या कडे बघत मान हलवत होता. रंजन ताईने मग माझ्याशी ओळख करून दिली.

बिन चेहेऱ्याचा शत्रू - स्पॅनिश फ्ल्यू- १९१८

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 30/03/2020 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
बिन चेहेऱ्याचा शत्रू - स्पॅनिश फ्ल्यू- १९१८ Simple, Free Image and File Hosting at MediaFire सप्टे१९१८, पहिलं महायुद्ध अजूनही चालूच आहे. जर्मनीची शेवटची निकराची लढाई-‘कैसरश्लाख्त’ फसली आहे आणि आता दोस्त सैन्य विशेषत: नव्या दमाचे अमेरिकन सैन्य निर्णायक विजयाकडे हळू हळू पण निश्चित वाटचाल करत आहेत.