Skip to main content

जिवनात तानतनाव येवु देवु नका

लेखक कबिर यांनी शुक्रवार, 03/04/2020 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत जात असणारा लहान बालक असो कि कांलेजमध्यें जाणारा किशोर असो जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत या तणावाचा प्रवेश झालेला आहेच. कोणतेही काम पूर्ण करण्याचा दबाव हळूहळू तणावाचे कारण बनते. कामाचा सराव असेल तर काम सहजपणे पूर्ण करता येउ शकते. तणावाची अनेक कारणे असतात. काम करूनहि परिणाम मिळणार कि नाही याबद्दल शंका असणे. यावर उपाय करण्यासाठी विचाराना सकारात्मक दिशा देउन सतत प्रयत्नरत राहून प्रामाणिकपणे कार्य पूर्ण करावे. जीवनात सतत व्यस्त राहावे म्हणजे निरर्थक विचार येणार नाहीत. मनावर कोणताही ताण न घेताही काम पूर्ण करता येऊ शकते. त्यासाठी वेळच्या वेळी व व्यवस्थित काम पूर्ण करावे.

ग्योझे (गोझे)

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 03/04/2020 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
ग्योझे (गोझे) अतिपूर्वेचं देशातील अजून एक पदार्थ... (भारतातील मोमो ... ) - उकडून दाखवल्याप्रमाणे किंवा थोड्या तेलात परतवून ( एकाच बाजू परतावी , झाकण ठेवावे म्हणजे शिजेल) - आतील साराने वेगवेगळी असतात , प्रॉन + लसूण, शाकाहारी, चिकन - सोबत सोया सॉस मध्ये तांबड्या मिर्चांचे तुकडे ( आज ताज नवहत्या म्हणून आलेले काप घातले) आणि आवडत असल्यास फिश सॉस घालावे - हिरवे दिसत आहे ती जपानी समुद्र शेवाळे..

गोष्ट

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 03/04/2020 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
सजीव-निर्जीव-सीमारेषेवरच्या अदृश्य अरिष्टानं अख्ख्या मानवजातीला मास्कवलं तेव्हाची अतर्क्य गोष्ट महासत्तांचे सूर्योदय हतबलांच्या झुंडींनी झाकोळून गेले तेव्हाची नामुष्कीची गोष्ट गगनविहारी गरुडांना पंख बांधून घरकोंबडा बनावं लागलं तेव्हाची घुसमटलेली गोष्ट कानठळी आवाजाची झिंग चढलेले दुखर्‍या शांततेने वेडेपिसे झाले तेव्हाची नि:शब्द गोष्ट विरत जाणार्‍या प्रदूषण धुरक्यातून परागंदा पक्षी बचावल्या झाडांवर परतले तेव्हाची किलबिलती गोष्ट झोप उडालेल्या डोळ्यांत भविष्याच्या दु:स्वप्नानं २४x३६५ ठाण मांडलं तेव्हाची अंधारी गोष्ट
काव्यरस

संन्यास

लेखक चलत मुसाफिर यांनी शुक्रवार, 03/04/2020 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
दिन मावळला, छाया दाटे क्लांत मनाला भीती वाटे दिवसभराचे रोकड संचित कमावले, की कधीच नव्हते? भवताली गर्दी ओसरते स्तब्ध एकटे पंखे, पलिते फडफड कोरी मेजावरली काय कुणा ती सांगु पाहते..? होते काही रेशिमधागे आले कुठुनी मागे मागे हातावरती विसावलेले होते का, की कधीच नव्हते..? सोबत होती तुझी सावली खट्याळ, मोहक, श्यामसावळी अखेरचा अंधार पसरता असेल का, की साथ सोडते? प्रवास आता मुक्कामाचा शोधायाचा मार्ग स्वतःचा सामानाचे ओझे टाळुन घेतो सोबत हास्य तुझे ते परतीचा रथ तयार आहे काळ सारथी वळुनी पाहे मिटू लागते किवाड, खिडकी पैलतिरी घर वाट पाहते..

निळाई......

लेखक किल्लेदार यांनी शुक्रवार, 03/04/2020 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
निळाई...... टोरोंटो च्या उत्तर-पश्चिमेस साधारण अडीचशे किमी वर ब्रूस पेनिन्सुला (द्वीपकल्प) आहे. द्वीपकल्प म्हणजे पाण्यात घुसलेला जमिनीचा सुळका. "लेक हुरॉन" या प्रचंड सरोवरात घुसलेल्या या निमुळत्या सुळक्याच्या टोकावर, टोबरमोरी हे अतिशय सुबक आणि आटोपशीर असे लहानसे गाव आहे. आजवर टोबरमोरीला जायचा तीन वेळा योग आला. सुदैवाने तीनही वेळा वेग-वेगळ्या ऋतूत बदलत जाणारी इथली निळाई डोळे भरून बघता आली.

चित्रपट परिचय : दी झोया फॅक्टर

लेखक मराठी कथालेखक यांनी गुरुवार, 02/04/2020 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मते लगान चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये एक नवे पर्व निर्माण झाले. या पुर्वी प्रेमकथा, प्रेम त्रिकोण , गुन्हेगारी, लॉस्ट अ‍ॅन्ड फाउन्ड ई मोजक्याच विषयांत अडकलेला व्यावसायिक चित्रपट अनेक विषयांना स्पर्श करु लागला. लगान प्रमाणेच काही चित्रपटांचा विषय एखादा खेळ होता. दी झोया फॅक्टर हा पण क्रिकेटवर बेतलेला चित्रपट आहे. क्रिकेट या खेळात खूपशी अनिश्चितता आहे. त्यामुळे गुणवत्तेबरोबरच "नशिबाची साथ" मिळणेही गरजेचे असे क्रिकेट रसिकांना व खेळाडुंना वाटू शकणे खूप स्वाभाविक आहे. तर या आत्मविश्वास विरुद्ध "नशिबाची साथ" या संघर्षावर हा चित्रपट बेतलेला आहे.

शेंगोळी

लेखक बबु यांनी गुरुवार, 02/04/2020 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
लॉक आऊटच्या दिवसात भाजीपाल्याची कमतरता असताना काय करायचे हा गृहिणींना पडणारा एक यक्षप्रश्न. आमच्या सौने आज हुलग्याची शेंगोळी करून तिच्या नियोजन कौशल्याची पावती दिली. शेंगोळी, बाजरीची भाकरी, पापड, कांदा, लसणाची चटणी हा मेनू म्हणजे शेतकरी कुटुंबातून आलेल्या चाकरमान्यांसाठी मेजवानीच असते. माझ्या लहानपणी ऐन उन्हाळ्यात बैलजोडीने नांगरट केली जायची, त्या दिवसांची आठवण येते. रहरखत्या उन्हात राबणाऱ्या घरधन्यासाठी कारभारीण जी न्याहारी घेऊन जायची त्यात शेंगोळी आवर्जून असत. प्रथिनांचा पुरवठा करणारे मोड आलेले हुलगे, मठ यांचाही समावेश जेवणात असे.

खऱ्या आनंदाचा साक्षात्कार

लेखक chittmanthan.OOO यांनी गुरुवार, 02/04/2020 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
भिडूलोक आपल्या प्रत्येकामध्ये एक भटक्या, एक जंगली दडलेला असतो ज्याची स्वतःची एक बकेट लिस्ट असते. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी स्वतःच अस्तित्व विसरावे असा एक तरी प्रवास करावा असं वाटतं असत. पण सांगू का आपली पहुंच खूप छोटी आहे...हो हो नक्कीच..तुम्ही जर "जिंदगी ना मिलेगी दोबारा" बघितला असेल तर एक दोन जागा परदेशातल्या असतील.तरीही जिथं तुमचं स्वप्न पूर्ण होत तिथं अलेक्झांडर सुपरट्राम्प चा संघर्ष चालू होतो( हे वाक्य अनन्या पांडे च चोरून मारलेल आहे तर तेवढं समजून घ्या.). तुम्ही म्हणाल हा अलेक्झांडर कोण? हा असा विचित्र माणूस आहे ज्याला पैसा, सत्ता सब कुछ मोहमाया वाटते.

बसंती पुलाव (पारंपारिक बांगला पाककृती)

लेखक वामन देशमुख यांनी गुरुवार, 02/04/2020 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
संचारबंदीमुळं सध्या घरून-काम (WFH) सुरू आहे. त्यानिमित्ताने ऑफिसचं काम करत करत पाकगृहात अन्नपूर्णेची आराधना करत आहे. आज पत्नीने नाश्त्याला दही वडे केले होते. अनेक दिवसांपासून मी बांगला बसंती पुलाव करण्याचा बेत ठरवला होता; रामनवमीच्या निमित्ताने आज तो तडीस नेला. त्याची पाककृती इथे देत आहे. प्रभू श्रीरामाचा नेवेद्य समजून मिपाकरांनी गोड मानून घ्यावा ही विनंती.