Skip to main content

कोरोना गीत

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 04/04/2020 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
कोरोना गीत पुरोगामी प्रतिगामी आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक भक्त द्वेष्टे आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक सश्रद्ध अश्रद्ध आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक ईश्वर अल्ला आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक फेकु पप्पू आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक भारत पाक आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक इटली चीन आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक अम्रिका युरोप आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक मंदीर मस्जिद आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक गरीब श्रीमंत आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक हिंदु मुस्लिम आम्ह

हसता हसता जगणे शिका, हसण्याची सवय बनवा.

लेखक कबिर यांनी शनिवार, 04/04/2020 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
चेहऱ्यावरील हास्य सर्व तणावाना दूर करते. हसरा चेहरा सर्वाना आकर्षित करतो. अनोळखी व्यक्तीबरोबर हास्याद्वारे मैत्रीचे तार जुळतात. चेहऱ्यावरील हास्य दुसर्यांना आनंद देतेच पण स्वतःला एक आंतरिक प्रसन्नतेचा अनुभव देते. तन मनाला ऊर्जा प्रदान करते. जी व्यक्ती हसत हसत प्रत्येक समस्येवर मार्ग काढते ती व्यक्ती जीवनात सफलता प्राप्त करतात. हास्य एक व्यायामासारखे आहे, त्यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढते. लहान बाळ जन्मतःच रडतो. चार पाच हप्त्याने स्मितहास्य करतो. चार पाच महिन्यांनी हसायला लागतो. लहान बाळाचे हास्य निरागस असते. खरे प्रेमयुक्त हास्याचा अभ्यास केल्यास संपूर्ण जीवनात साकारात्मक बदल दिसतात.

स्टफ्ड (कोकी) पराठा

लेखक गणपा यांनी शनिवार, 04/04/2020 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, कशी चालली आहे सक्तीची रजा? काय म्हणता? लाॅकडाऊन लाॅकडाऊन खेळुन कंटाळा आलाय? त्याच त्या बातम्या, सोमिवरची वांझोटी चर्चा, चॅलेंजेसनी डोकं उठलंय? चेंज हवाय? या की मग एक सोप्पा पदार्थ शिकवतो. अगदी कमी जिन्नस वापरून होणारा चमचमीत सिंधी कोकी पराठा करूयात. तसा हा पदार्थ न्याहरीसाठी खाल्ला जातो. एक प्रकारचं कणकेचं थालीपिठच म्हणाना.

लॉकडाऊन : अकरावा दिवस .

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 04/04/2020 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
काय चुकले ...व आता पुढे काय .......? नमस्कार मिपाकर , काय घरीच बसून आहात ना... की बाहेर उगीच कोणी फिरताहेत हे पाहाण्यासाठी तुम्ही देखील उगीच बाहेर पडत आहात? काय आहे नदीला पूर आला तरी रंजन म्हणून " पाणी बघायला " येता का असे विचारणारा " मानव" हा मोठा विचारी पण विचित्र प्राणी पृथवीतलावर आहे ! असो. घरातच रहा. कण्टाळा आला तरी जो वर व्हायरस ला कण्टाळा येत नाही अगदी तोवर ! आजचा विचार गाभा म्हणू रोगराई व कायद्याने निर्माण होणार्या समस्या . १२ मार्च रोजी मी पुण्यास गेलो होतो आकुर्डी वरून . तेन्व्हा पुण्यात बरेच लोक रूमाल ,मास्क जे जमेल ते लावून वावरत होते.

अनय

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 03/04/2020 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
अनय "नको जाऊस राधे! माझ्यासाठी नाही म्हणत ग मी... तुझ्यासाठीच सांगतो आहे.... नको जाऊस त्याला निरोप द्यायला." "निरोप द्यायला जाते आहे; हे कोणी सांगितलं तुला अनय? थांबवायला जाते आहे मी." "तुला वाटतं तो तुझं ऐकेल?" "तुला वाटतं नाही ऐकणार न? बघू, कोण बरोबर ठरतं." असं म्हणून राधा धावत घराबाहेर पडली. तिला लवकरात लवकर वेस गाठायची होती. तिचा शाम गोकुळ सोडून निघाला होता. आताच आलेल्या नंदिनीने तिला तसं सांगितलं होतं. खरतर राधेचा यावर विश्वास नव्हता बसला. पण नंदिनी ही राधेची एकुलती एक मैत्रीण होती जी राधेचं मन समजू शकत होती. त्यामुळे ती काहीतरी खोटं सांगेल असं राधेला वाटत नव्हतं.....

मॅच-फिक्सिंग

लेखक कुमार जावडेकर यांनी शुक्रवार, 03/04/2020 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
(क्रिकेटमधलं मॅच फिक्सिंग जेव्हा २००० साली दिल्ली पोलिसांना दिलेल्या हॅन्सी क्रोनिएच्या कबुलीतून जाहीर झालं, त्यावेळी - १२ एप्रिल २००० या दिवशी - मी ही कथा लिहिली होती 'लोकमत. पुणे'मध्ये .) गुलमोहर सोसायटीच्या कमानीतून मी कमीत कमी वेगानं आत गाडी वळवली, जवळ-जवळ थांबलोच म्हणा ना. असं केलं ना की तिथे खेळणाऱ्या मुलांचं लक्ष वेधलं जातं (गाडीचा हॉर्न न वाजवताही. हे महत्त्वाचं. फक्त आपल्यात थांबायची तयारी हवी.).... बोलर आपण लांबच लांब आपला रन-अप धुंडाळत जातो. मिड-ऑफचा लाँग-ऑफ होतो आणि फॉरवर्ड शॉर्टलेगचा बॅकवर्ड. जेव्हा जेव्हा एखादी गाडी आत वळते, तेव्हा तेव्हा असंच फील्ड सेटिंग बदलतं.

रामनवमी

लेखक श्रीगणेशा यांनी शुक्रवार, 03/04/2020 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
आन्हिकं आटोपून उत्सवाच्या तयारीसाठी लगबग सुरु व्हायची. सर्वात प्रथम मंजन. मारुती मंदिराशेजारील नळावरून पिण्याचं पाणी आणलं जायचं. एकट्याला उचलणं अवघड, अशी देवांच्या मूर्ती ठेवलेली परात गाभाऱ्यातून मठात आणली जायची. लिंबू आणि रांगोळीच्या मिश्रणाने घासून-पुसून सर्व मूर्ती उजळून निघायच्या. वर्षानुवर्षे स्थितप्रज्ञ असलेली गणपतीची मूर्ती शेंदुराच्या लेपात अजूनच तेजस्वी दिसायची. श्रीकृष्णाची मूर्ती अगदी सुबक, सर्वात ऊंच आणि स्वच्छ करायला अगदी सोपी. बालाजीची मूर्ती त्यापेक्षा थोडी अवघड. नृसिंहाची मूर्ती मात्र सर्वात कठीण आणि जडही. तुलनेने लहान मूर्तींची संख्या खूप.

क्वारंटाईनमधले प्रेम

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 03/04/2020 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजातील एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेल्या एका युगुलाची 'विलगीकरणाने' होणारी घालमेल मांडायचा प्रयत्न... ती : जीवघेणे हट्ट तुझे वाऱ्यासंगे पळायचे अबोल्याचे मास्क सोडून क्वारंटाईन मोडायचे ।। मन किती जिद्दी तुझे सोशल डिस्टंसिंग झुगारायचे अत्यावश्यक निमित्ताने आमच्या हृदयात घुसायचे।। नातं किती घट्ट तुझे श्वासांनाही बांधायचे आठवणींची गर्दी करून क्वारंटाईन मोडायचे।। किती रे निगरगट्ट तू? कधीही आरश्यात यायचे माझे डोळे कन्फर्मड् बघून क्वारंटाईन मोडायचे तो : आयुष्य असं किती गं आपलं त्याचे नियम किती मानायचे? विचारांनाही क्वारंटाईन केलं तर प्रेम कसे करायचे ?।। मठ्ठ वाटते काळजी सारी घाबरत घा