Skip to main content

होसूर: एक उनाड रविवार (उत्तरार्ध)

लेखक चौथा कोनाडा यांनी रविवार, 12/04/2020 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा धागा: होसूर: एक उनाड रविवार (पुर्वार्ध) पुर्वसुत्रः ….. तिथून गावात जाण्यासाठी शेअररिक्षा मिळाली. त्यात बसून बाजारपेठेत पोहोचलो. आता भूकची वेळ झाली होती. एक साधं पण छानसं हॉटेल पाहून आत शिरलो ….. पुढे ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- हॉटेलात मेन्यूकार्ड बघून स्पेशल थाळी ऑर्डर केली.

घरात असलेलया गोष्टींपासून खायला बनवा

लेखक चौकस२१२ यांनी शनिवार, 11/04/2020 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
घरात असलेलया गोष्टींपासून खायला बनवा हि परिस्थिती सध्या असल्यामुळे आम्लेट आणि नूडल्स या तर नेहमीच्याच गोष्टी ... आज जरा "इधर का माल उधार करावा " म्हणले "बेक्ड नुडल आम्लेट !" साहित्य: घरात असतील त्या भाज्या आणि काही मांसाहारी खिमा असेल तर ( मी गाजर, पातीचा कांदा आणि पर्वाची झुकिनी वापरली आणि मास म्हणून नुकत्याच केलेली ग्योझे चे तुकडे करवून परतवून घेतले, यात झिंगे / पातीचा कांदा हे सारण होते ) - आपल्या आवडीच्या झटपट नुडल वापराव्यात .. ( मी आज कोरियन पद्धतीच्या सी फूड चवीच्या नुडल वापरल्या..

मठ

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 11/04/2020 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
ना गुणी गुणीनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी । गुणीच गुणरागीच विरलः सरलो जन: ॥ अर्थ- गुण नसलेल्याला गुणी माणसाची परिक्षा होत नाही, जो स्वत: गुणी आहे तो दुसर्‍या गुणी माणसाचा मत्सर करतो. स्वत: गुणी असुनही दुसर्‍याच्या गुणावर प्रेम करणारा सरळ मनाचा माणूस विरळाच असतो. एकदा सामाजिक, मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्तीस भेटायला गेलो. बोलता बोलता स्त्रीवादाचा विषय निघाला. मी मिळून सार्‍या जणींच कौतुक केल. विद्या बाळ, गीताली व इतर अशा या क्षेत्रात काम करणार्‍या लोकांविषयी आदर व्यक्त केला. बाई मनातून खवळल्या पण मोठ्या संयमाने पण तुच्छतेने मी त्यांच्यापैकी नाही असे निक्षून सांगितले.

हैदोस [18+]

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 11/04/2020 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
बी.डी. चाळीच्या कोपऱ्यावरची शेवटची खोली आहे तिथे वारा खूप थंडगार सुटतो. म्हणूनच मालकाने आम्हांस तीच खोली देऊ केली. आणि विशेष म्हणजे भाडेही कमी घेतले. त्यांचे आभारच मानायला हवेत. तसंही त्या बाजूला जरा अंधारच असायचा. सार्वजनिक नळावरून भल्या सकाळी घमेली आणि भगुनी पाण्याने भरून ठेवणे हाच आमचा रोज सकाळचा दिनक्रम असायचा. कारकून असलो तरी सरकारी नोकरीत असल्याने 'आराम' सदासर्वकाळ ठरलेला असायचा. मोजून दोन अडीच तास कचेरीत जाऊन खुर्ची गरम करण्याखेरीज अन्य काम नसल्याने मन विटाळून गेले होते. तसे दिवसभर चौपाटीवर भटकण्यातही मजा राहिली नव्हती. तर त्या दिवशी भुर्जीचं पार्सल आणून खोलीवर निवांत आस्वाद घेत होतो.

धात्री

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 11/04/2020 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
(मृत्युंजय मधल्या धात्रीच्या उल्लेखातून मला सुचलेली ही संपूर्ण काल्पनिक कथा तुमच्या समोर मांडते आहे. 'धात्री' ही महाभारतातील तसं म्हंटल तर खूप महत्वाची व्यक्तिरेखा. पण काहीशी दुर्लक्षित!) धात्री माझे पती अधिराज मला लग्न करून शूरसेन महाराजांच्या मथुरा नगरीमध्ये घेऊन आले त्यावेळी मी केवळ बारा-चौदा वर्षांची होते. गावाची वेस ओलांडतानाच मला माझ्या मातेने जवळ घेऊन कानात सांगितले होते;"धात्री, पुत्री, आज मी तुला तुझ्या नावाचा अर्थ सांगते.

लॉकडाऊनच्या दिवसांमधलं गीतरामायण

लेखक अबोलघेवडा यांनी शनिवार, 11/04/2020 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
गदिमांनी रचलेलं आणि बाबूजींनी गायलेलं गीतरामायण हे काव्य अवीटातलं अवीटच. दुर्दैवाने बाबूजी प्रत्यक्ष स्वतः गात असताना गीतरामायण ऐकण्याचं भाग्य कधी लाभलं नाही मला. पण नंतर एकदा श्रीधरजींच्या मुखातून ऐकण्याचा योग आला आणि त्यांच्याही सुमधुर आवाजाने त्यावेळी मी तृप्त झालो होतो . तुम्हाला सांगतो त्या कार्यक्रमामध्ये मी अक्षरशः रडत होतो. वास्तविक आपण मोठी माणसं अशावेळी स्वतःला सावरायचा प्रयत्न करतो. पण एका क्षणानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता स्वतःला सावरणं निव्वळ अशक्य आहे. तसंच आजूबाजूला नजर टाकली आणि लक्षात आलं की इतरही बरेच जण रडतातच आहेत. मग म्हटलं कशाला उगाच स्वतःला सावरा?

लॉकडाऊन: अठरावा दिवस

लेखक amol gawali यांनी शनिवार, 11/04/2020 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ... मिपाकर !! न भूतो न भविष्यती ...प्रसंग म्हणजे लॉकडाउन....अगदी कल्पनातीत. मी त्यादिवशी नेहमी प्रमाणे ऑफिस मध्ये होतो ( मुंबई मध्ये ) . "लॉकडाउन " ची चिन्हे दिसत होती . मनात अगणित प्रश्न फेर धरून नाचायला लागले. मी तसाच ऑफीस मधून निघालो . घरी कस पोहचायच हा " यक्ष " प्रश्न होता . गावाकडून सारखे फोन येत होते , घरी येण्यासंबधी सारखा आग्रह होत होता . वर्क फ्रॉम होम ची इच्छा होती पण , मला स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे मुंबईत रहायचं कस ? सर्व बंद होत. रोजच्या खाण्या पिण्याचा ही प्रश्न होता. औरंगाबादला येण्याविषयी आग्रह होत होता .

गोव्याहून पत्र

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी शुक्रवार, 10/04/2020 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
अ.प्र. जोशी चिमुलवाडा, गाव सावरगाव गोवा प्रति, सर्व वाचकांस २ -४ -२०२० विषय: थेट चिमुलवाड्यावरून कित्ती तरी दिवस सरकाराग्रहास्तव घरीच असल्याने आणि एन तेन प्रकारेन सगळ्याच बाजूंनी कोरोना कम कोविड नाईन्टीन आणि इतर बातम्या ऐकून वाचून एवढा वीट आला आहे कि "चिमुलवाडा आणि कोरोना" असे शीर्षक खोडून तुम्ही वाचलेत तसे पत्र छापले आहे. चिमुलवाड्यावरील लोकडोवनचे ३ दिवस झाले आहेत. तर, वाड्यावरील जनतेच्या एकूण स्तिथीचा आढावा ह्या लेखातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी ह्या महामारीमुळे नाही म्हटले तरी असे एक मरगळीचे वातावरण तयार झालेले आहे.

सामना

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी शुक्रवार, 10/04/2020 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्याचे अखेरचे दिवस. शनिवारची रात्र. ९:३० वाजून गेले असावे. बाहेर बारीक पाऊस लागलेला, त्यामुळे नेहमीपेक्षा जास्तच सामसूम. रस्ते सगळे ओलेकच्च झालेले. कुठच्या तरी सरकारी योजनेखाला लावलेल्या खांबावरील दिव्यांचा अंधुक उजेड चिमुलवाड्यावरच्या पायवाटेवर पडला होता. त्या उजेडात पावसाची बारीक भुरभुर देखील चांगली ठसठशीत वाटत होती. धुपकरांच्या सालात चिमुलवाड्यावरील सगळ्या पुरुष मंडळींचा अड्डा बसला होता. टीव्हीवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगला होता. ऑस्ट्रेलिया वाल्यानी आधी फलंदाजी करून २० षटकांत २१८ धावा कुठल्या होत्या. भारताची फलंदाजी व्हायची होती.

मोसंबी नारंगी - एक वेगळा नाट्यानुभव

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 09/04/2020 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी महिन्यात मोसंबी नारंगी या हिंदी नाटकाचा हेदराबादमधे प्रयोग बघितला. मराठी माणूस मोहित टाकळकरने नाटकाचे दिग्दर्शन केले होते म्हणून नाटक बघायचे ठरविले. मोहित टाकळकरच्या नाटकांबद्दल बऱ्याचदा वाचले होते तेंव्हा ती उत्सुकता देखील होती. त्याच बरोबर ती नाटके डोक्यावरुन जातात ती भिती सुद्धा होती. माझ्या सुदैवाने माझी नाटकाच्या दिग्दर्शका सोबत तेथे भेट सुद्धा झाली. तसेच व्योमकेश बक्षी फेम रजत कपूर हे देखील एक आकर्षण होतेच. नाटक उशीरा सुरु झाले. आयोजकांनी मग तिथल्या कँटिनमधे फुकटात चहा दिला. इटरनेशनल एअरलाइन्सचे विमान उशीरा सुटल्यासारखे वाटले. ते पण असेच एअरपोर्टवर लाँजमधे जेवायला देतात.