Skip to main content

घरात असलेलया गोष्टींपासून खायला बनवा

लेखक चौकस२१२ यांनी शनिवार, 11/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.
घरात असलेलया गोष्टींपासून खायला बनवा हि परिस्थिती सध्या असल्यामुळे आम्लेट आणि नूडल्स या तर नेहमीच्याच गोष्टी ... आज जरा "इधर का माल उधार करावा " म्हणले "बेक्ड नुडल आम्लेट !" साहित्य: घरात असतील त्या भाज्या आणि काही मांसाहारी खिमा असेल तर ( मी गाजर, पातीचा कांदा आणि पर्वाची झुकिनी वापरली आणि मास म्हणून नुकत्याच केलेली ग्योझे चे तुकडे करवून परतवून घेतले, यात झिंगे / पातीचा कांदा हे सारण होते ) - आपल्या आवडीच्या झटपट नुडल वापराव्यात .. ( मी आज कोरियन पद्धतीच्या सी फूड चवीच्या नुडल वापरल्या.. कोरियन पदार्थ हे साधारण चांगले तिखट असतात आणि त्यांची तांबड्यामिरची ची पूड चांगली झणझणीत असते ) कृती: - नूडल्स करून घयव्यात , त्यात वरील परतलेल्या भाज्या खिमा वैगरे घालावे .. आचेवरून उतरून कोमट होऊ दयावे -अंड्यात थोडे सोय सॉस घालून फेटून त्याची पोळी बनवावी , थोडी जाड असावी म्हणजे उलटायला सोपी जाईल - पोळी एकाबाजूने होत आली कि त्यावर वरील नूडल्स घालाव्यात व आचेवरून काढावे - हे अर्धे झालेले आम्लेट चे "जुगाड" ओव्हन मधील ग्रील खाली नुडल थोड्या तांबूस होई पर्यंत भाजून घ्यावे ( ओव्हन नसल्यास पसरट भांड्यात मध्ये पण भाजू शकता ) परतलेले "गोझ्याचे तुकडे IMG_7512[1] नुडल ची खिचडी.. सर्वात शेवटी कोरियन मसाला घातला आहे त्यात काळसर दिसती आहे ती केल्प हि वनस्पती IMG_7516[1] " अर्ध चमलेट आ " IMG_7528[1] नुडल आणि अंडे यांचे अधमुरे "ओपन सँडविच " IMG_7518[1] IMG_7529[1] IMG_7530[1] खालील प्लेटकृतीत जी बाजूला भुरभुरलेले दिसते आहे ती कोरडी जपानी तिखट आणि तीळ यांची खुमासदार चटणी "शीचीमी " IMG_7531[1]

वाचने 4064
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

नाही बेबी स्पिनॅच आहेत