The बाल्कनी
का कुणास ठाऊक पण नभ दाटून आले होते आणि
वारा तुफान वहात होता.
आभाळाच्या छताखाली एक कागद उंचच उंच उडत होता.
मी त्याच्याकडे बराच वेळ पाहत बसलो. मग शेवटी कंटाळलो.
नंतर बऱ्याच वेळाने पुन्हा बाहेर आलो. एक कुत्र्याचं लहानसं पिल्लू रस्त्यावर मनसोक्त बागडत होतो. मी बराच वेळ पाहत बसलो. पण शेवटी कंटाळलो.
तसा फारसा वेळही जात नव्हता. आणि मी आळसावलो होतो.
गेल्या दोन दिवसांत काहीच न लिहीता आल्याने पुरता वैतागलो होतो.
नंतर बऱ्याच वेळाने पुन्हा बाहेर आलो. बाल्कनीत एक कागद पडला होता. चांगला होता कोरा करकरीत. आता हाच वापरू म्हणून मी तो उचलला.
मिसळपाव
