Skip to main content

मोगँबो - ८ ( अंतीम)

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 16/04/2020 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
सारंग जे काही म्हणत होता ते किती प्रॅक्टीकल होते ते यावेळेस तरी त्याला माहीत नव्हते पण ते करायचे होते हा ठाम निर्धार त्याच्या बोलण्यातून सरांनाही जाणवला. ज्योतीने ज्योत पेटवावी तसा तोच निर्धार प्रत्येकाच्या मनात आला होता. आजचा आणि उद्याचा दिवस हे महत्वाचे आहेत प्रत्येकजण मनातल्या मनात स्वतःला सांगत होता. आयुष्याला कलाटणी देणारे दोन दिवस.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46438 आजचा दिवस कसा जाणार आहे याचा विचारच मनात यायला वेळ नव्हता. दिवसात फक्त चोवीस तासच का असतात.

लॉकडाऊन: तेविसावा दिवस

लेखक वामन देशमुख यांनी गुरुवार, 16/04/2020 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
मी डिसेंबर पासून एका कंपनीचे काम External Consultant म्हणून करणं सुरू आहे. त्यांची २० मार्चपासून लॉकडाउनमुळं घरून काम करण्याची सूचना मिळाली. त्यांच्या ऑफिसात जायचो तेव्हा विशेष काही काम नसायचं.आता घरून काम करताना मात्र कितीतरी कसली-कसली कामं देताहेत. अर्थात, त्यातली कोणती करायची आणि कोणती टाळायची याचं गणित ज्याचं त्याला माहित असतंच! पूर्णवेळ नोकरी सोडून पाचेक वर्षे झाली तेव्हापासून वर्षातून आठेक महिने काम करतोय. एप्रिल-मे महिन्यात शक्यतो काम करण्याचं टाळतो, ते उद्दिष्ट आता (घरून काम करत असल्याने) एका अर्थाने पूर्ण होत आहे. सध्याची वर्क-ऑर्डर सप्टेंबर पर्यंतची आहे.

माझी आजी

लेखक ऋतु हिरवा यांनी बुधवार, 15/04/2020 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आजी....आईची आई ....कमलाबाई नारायण हरिश्चंद्रकर! उंच शेलाटा बांधा! नऊवारी साडी, लख्ख गोरी आणि घारे डोळे, मध्यम.....थोडे काळे, थोडे पांढरे अशा केसांचा बेताचा अंबाडा! लाल मोठ्ठे कुंकू लावलेले मी तिला क्वचितच पाहिले. आमच्या लहानपणीच आजोबा वारले त्यामुळे कुंकू न लावलेला तिचा चेहरा अधिकच गोरा दिसायचा. ती भायखळ्याला राहायची. लहानपणी मी तिथे जात असे. आजोबा वारल्यानंतर ती डोंबिवलीला मामाकडे राहायला आली. आम्ही लहान असताना ती आमच्याकडे डोंबिवलीला यायची. बरोबर एक पिशवी...त्यात तिचे कपडे, औषधे इत्यादी सामान असायचे. ती सतत उद्योगात असायची. रिकामे बसणे, आराम करणे तिच्या स्वभावात नव्हते.

तोंडाला पाणी सुटेल असा झणझणीत, मसालेदार चिकन रस्सा

लेखक आदित्य कोरडे यांनी बुधवार, 15/04/2020 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
तोंडाला पाणी सुटेल असा झणझणीत, मसालेदार चिकन रस्सा चिकन १/२ कि चिकन धुवून त्याला मीठ हळद आणि लिबू किंवा विनेगर १बुच लावून फ्रीज मध्ये ठेवावे.

बुचाचे झाड

लेखक भागो यांनी बुधवार, 15/04/2020 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या घराच्या दाराशी एक बुचाचे झाड आहे.हे झाड मी माझ्या लहानपणापासून बघत आहे. पावसाळ्याच्या शेवटी शेवटी अंगणात त्याच्या पांढऱ्याशुभ्र फुलांचा सडा पडलेला असे. आम्ही मुले ती फुले गोळा करून त्यांचा हार किंवा वेणी बनवत असू. पण काही दिवसापूर्वी एक गंमतच झाली. मी सकाळी उठून खिडकीबाहेर बघतो तर काय. बुचाच्या फुलांचे ते झाड गायब! माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. वाटले मी झोपेत तर नाहीना. असे कसे होऊ शकते .एवढे मोठे भर भक्कम झाड एवढासाही मागमूस न ठेवता नाहीसे होते म्हणजे काय ? मी स्वतः एक प्रथितयश लेखक आहे. तो देखील रहस्यकथांचा!

नवंविवाहित आणि जुनंविवाहित! (गप्पा)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 15/04/2020 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
एक नवविवाहित एका जुनंविवाहिताशी गप्पा मारतोय. नवं वि:-आता मी खूप आंनदात आहे. जुनं वि:- अजून काही दिवस तू 'असाच' आंनदात असणार नवं वि:- 'असाच' मंजे? जुनं वि:- 'असाच!' नवं वि:- मग नन्तर काय होईल? जुनं वि:- तू 'पाश्चात्तापदग्धवियोग' प्राप्त करवून घेशील नवं वि:- हा कोणता नवा योग जुनं वि:- छे रे छे! अरे बाळा,हा काळा बरोबर फुलत फुलत गेलेला योग आहे. नवं वि:- मंजे? जुनं वि:- अरे मुला,माझ्या गुलाबाच्या फुला, एक सांग ब्रे मला. तुला विवाहाच्या नवंमांडवा खालून पुढे सरून किती महिने झाले? नवं वि:-दोन! जुनं वि:- हां..म्हणूनच तुला येत नाही(अजून) फोन ...