कोरोना आणि काळीज
तर त्याचं कसंय खंडेराव,
आमची नोकरी येते अत्यावश्यक सेवेमध्ये..
त्यामुळे लॉकडाऊन सुरू असतानाही रोज अर्धा दिवस तरी ऑफिस असतंच..
पण दुःख त्याचं नाहीये,
तीन साडेतीनला घरी आल्यावर आधी आंघोळ करायची. त्यानंतरच भाकर मिळते गिळायला...
दुःख ह्याचंही नाहीये..
कोरोना स्पेशल म्हणून बायकोनी माझे दोन जोडी कपडे वेगळे काढून ठेवलेत. अंघोळ करताना स्वतःच्या हाताने धुवायचे. अन सकाळी इस्तरी करून घालायचे...
सकाळीच इस्तरी केलेलं शर्टपॅन्ट दुपारी धुताना काळजात कसं चर्रर्र चर्रर्र होत असतं ते तुम्हाला नाही कळणार खंडेराव!!
अनफेअर चेस !
या वर्षीच्या बुद्धिबळ स्पर्धेत काहीही करून त्याला हरवायचंच असं सर्वांनी ठरवलं. बुद्धिबळ त्याच्यासाठी फक्त तर्काचा खेळ होता, इज्जतीचा नाही. प्रतिस्पर्ध्याच्या सुरेख चालीला सुद्धा तो दाद द्यायचा. त्याच्या चाली निर्विवाद होत कारण फोकस कायम प्रश्नावर असे, स्वतःवर नाही.
सामन्यात दहाव्या चालीनंतर प्रतिस्पर्धी एक मोहरा गमावून बसला आणि सतराव्या चालीनंतर इतकी कोंडी झाली की डाव हरण्याकडे झुकू लागला. अचानक चेसक्लॉक बंद पडलं ! पंचांनी सामना रद्द केला.
निर्वाणीच्या क्षणी करायची ही खेळी पूर्वनियोजित होती, हे फक्त त्याच्या लक्षात आलं.
तीन वर्षांनी पुन्हा स्पर्धा ठरली.
तो आला, त्यानं चेसक्लॉककडे पाहिलं.
लेखनक्रिया : लिहून की बोलून ?
सध्याच्या टाळेबंदीच्या काळात आपण घरकामे आणि विविध छंद यात मन रमवित आहोत. बरेच जण या निमित्ताने एखादी नवीन कला देखील शिकत आहेत. यातून स्फूर्ती घेऊन मी देखील एक कला शिकत आहे. ती शिकत असतानाच हा लेख लिहीत आहे. काही अंदाज येतोय का या कलेबद्दल ?
ठीक आहे. आता सांगतोच.
ही कला म्हणजेच संगणकावर हाताने टंकन न करता आपल्या बोलण्याद्वारे हे टंकन करीत आहे. बरेच दिवसांपासून याबद्दल ऐकत होतो. या पद्धतीत आपल्या हातांना आराम मिळणार असतो, म्हणून याचे आकर्षण होते. काही काळापूर्वी असे ऐकले होते की, मराठी लेखनाच्या बाबतीत ही सुविधा इंग्लिश इतकी अजून प्रगत झालेली नाही.
लॉकडाऊन: सत्ताविसावा दिवस
नमस्कार मिपाकर
कुणीही कधी विचार केला नसेल अश्या परिस्थितीत आपण सर्वजण अडकलो आहे
जर कुणी आपल्याला असे थांबा म्हटले असते तर आपन कधीच थांबलो नसतो पन ते निसर्गाने किंवा मानव निर्मित उपद्रव्या मुळे सर्व जग थोडा वेळ का थांबलो आहे. काही काळ असेना सर्व जण स्वतच्या कुटुंबासोबत किंवा स्वतःसोबत वेळ घालवत आहेत.
काही दिवसापूर्वी प्रशांत चा फोन आला कि लॉक डाउन वरती माझे अनुभव लिहण्याची विनंती केला म्हणून हा छोटासा प्रयत्न करत आहे.
फेब्रुवारी मध्ये ऑफिस च्या कामासाठी अमेरिकेला जायचे होते. चीनमध्ये कोरोनाने विषाणूने ऊहान शहराला विळखा घातला होतो.
धाड
मे महिन्याचा शेवटचा आठवडा असावा. चिमुलवाड्यावर बहुतेक सर्वच घरांत बायका आपल्या कोवळ्या पोरांकडून ''ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा" बोबड्या आवाजात वदवून घेत होत्या. मॉन्सून पूर्व कामांच्या नावाखाली दिवसातून कमीत कमी ४-५ वेळा लाईट जाण्याचे प्रकार सुरु होते. भरलेले गटार समजून उसपण्याच्या नावाखाली खोदलेल्या चरित १ -२ दारुड्यांनी आपापले पाय मोडून घेतले होते ! "उनासाठी खूप झाला, आता पावसासाठी लवकरच ह्या छत्र्यांचा वापर होउदे रे देवा"- अशी प्रार्थनाच बहुतेक लोक करीत असावे. बाकी मागच्या वर्षीच्या गरमीपेक्षा ह्या वर्षीची गर्मी जरा जास्तच आहे असे प्रत्येकाला वाटत होते.
पुन्हा एकदा रामायण
रामायणाचं पुनर्प्रक्षेपण आज संपलं. पुन्हा एकदा इतिहास घडवुन.
२०१५ मध्ये चालु झालेल्या मालिकांच्या लोकप्रियता मोजण्याच्या पद्धतीनुसार रामायण तेव्हापासुन आजपर्यंत सर्वात जास्त लोकांकडुन पाहिली गेलेली मालिका ठरली. ३३ वर्षांपूर्वीचा हाच इतिहास पुन्हा एकदा घडवत.
नाक मुरडणाऱ्यांनी तेव्हाही नाकं मुरडली आणि आताही. तेव्हा म्हणे केबल नसल्यामुळे, एकच वाहिनी आणि पर्याय नसल्यामुळे जे दाखवतील ते लोकप्रिय व्हायचं. आणि आता लोकांना घरात बसुन दुसरं काम नाही, त्यामुळे पुन्हा.
लॉकडाऊन: सव्वीसावा दिवस
img {
padding: 8px;
border: 1px solid #ccc;
margin-top: 10px;
margin-bottom: 10px:
margin-left: auto;
margin-right: auto;
}
p {
text-align: justify;
}
भारताचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी पहिल्यांदा केवळ 22 मार्चला एक दिवस घरात बसण्याचे आवाहन केले. त्याचवेळी त्यांनी संध्याकाळी पाच वाजता घंटा, टाळ्या वाजवून करोना विषाणूशी दोन हात करणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवेकरऱ्यांचे कौतुक करण्यास सांगितले. आम्ही आणि आमच्या सोसायटी मधील सर्वांनीच अगदी उत्साहाने घंटा वाजवून ती काही मिनिटं साजरी केली.
माम्मा मियाचे गणित : (गणित असले तरी) न बिचकता वाचण्यासारखे, पण घाबरवणारे
(आधीचा संदर्भ: https://misalpav.com/node/46429)
जर १९ फेब्रुवारी २०२० च्या दिवशी आणि थोडे त्या आधी व थोडे त्या नंतर मिलानमधल्या सान सिरो स्टेडियममध्ये एकत्र जमलेल्या आणि त्यानंतर सर्वदूर पांगलेल्या या ४०,००० - ५०,००० फुटबॉलवेड्यांच्या उन्मादाचा परिणाम गणिती दृष्टीनें अभ्यासायचा असेल तर?
जरी हे कधी तरी कोणीतरी एखाद्या शोधप्रबंधात मांडेलच तरी त्यासाठी विचार करताना लक्षांत आले- माझ्या स्वतःच्याच गणिती कल्पना (mathematical fundamentals) पुसटल्या आहेत.
मिसळपाव