Skip to main content

लॉकडाऊनः चौतिसावा दिवस

लेखक पिंगू यांनी सोमवार, 27/04/2020 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
मार्च महिना म्हणजे आमच्या धावाधावीचा महिना. त्यात २२ तारखेपर्यंत बरीच धावाधाव केली आणि मग २३ ला लागला जनता कर्फ्यु. त्यानंतर लगेच लॉकडाऊन प्रकरण सुरु झाले आणि सगळीच कामे थांबली. दोन तीन दिवस जी कामे बाकी होती आणि ऑनलाईन करता येण्याजोगी कामे होती ती पार पाडली. मग काही दिवस वाचनाचा मनसोक्त आनंद घेतला पण मार्च संपतांना जो वैताग आला तो कशाने जाणार हा विचारच पडला होता. तेव्हा मदतीला एक मित्र धावून आला. त्याला त्याच्या शेतावर अनेक प्रयोग करायचे होते आणि त्यालापण एका सोबतीची गरजच होती.

मोदक आणि पातोळे.

लेखक सेफ्टीपिन यांनी रविवार, 26/04/2020 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
'लॉकडाउनच्या' या परिस्थितीत जिथे साधी भाजी बाजारात मिळणं आणि ती घरी घेऊन येणं सुद्धा अवघड झालं आहे तिथे रोज जेवणात वेगळं काय बनवायचं हा यक्षप्रश्न सध्या प्रत्येक घर 'फेस' करतं आहे. हे काम कितीही आव्हानात्मक असलं तरीही एकदा का ठरवलं घराच्या बाहेर अगदी आवश्यक असल्याशिवाय अजिबात जायचं नाही की मग घरात जे सामान उपलब्ध आहे त्यातच वेगवेगळे ऑप्शन्स आपोआप सुचायला लागतात. पातोळे, दक्षिण कोकण किंवा गोव्याच्या मातीत बनणारा एक 'गोड गोड' पदार्थ तर उकडीचे मोदक हा खास कोकणातील पदार्थ. पातोळे बनवायचे म्हणजे हळदीची पाने अगदी मस्ट खरंतर आणि मोदकांसाठी तांदळाची पिठी.
Taxonomy upgrade extras

नरभक्षकाच्या मागावर ! - अंतिम भाग

लेखक रश्मिन यांनी रविवार, 26/04/2020 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ - अंतिम ----------------------------------------------------------------------------------- temple सुळेकुंटा देऊळ बाजूच्या विहिरीतून ओढलेल्या पाण्यान

पदार्थ जडरूप (मॅटर) असो वा ऊर्जारूप (एनर्जी), प्रकाश कायमच सोबतीला असतो.. (e = m. c^2)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 26/04/2020 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
(तसा मोजायला गेले तर १००वी ब्लॉगपोस्ट.. नंबर्स काही महत्वाचे नसतात..  ही पोस्ट आहे आईन्स्टाईन च्या e=m.c^२ विषयी..एकदम छोटुकलं सूत्र.. पण गवसणी ब्रह्माण्डाला.. अजूनही नाही पूर्ण कळत या शोधाची व्याप्ती.. इथे त्या शोधाची कहाणी, आईन्स्टाईन ने mass-energy equivalence चा प्रबंध १९०५ साली लिहून १९३८ साली तो जर्मनीत सिद्ध होईपर्यंतचा धावता आढावा, त्यातील अनेक नामवंत शास्त्रज्ञांचे योगदान आणि त्यावर आधारित अणुस्फोटाचा धावता मागोवा विक्रम वेताळांनी घेतला.. आपल्या गेल्या शतकाला कलाटणी देणारा हा शोध होता हे नक्कीच..

जालीय अस्तित्व अर्थात आयडी

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी रविवार, 26/04/2020 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर मिपा, मायबोली, उपक्रम, मनोगत, ऐसी अक्षरे या सारखे काही संवादी संकेतस्थळे असतात. या आभासी मंचावर अनेक लोक आपल्या विचारांची, भावनांची अभिव्यक्ती मांडत राहतात. विषय कुठलेही वर्ज्य नाहीत, व्यक्त होणे सुसंस्कृत असावे एवढीच अपेक्षा. सभासद लिहू वाचू शकतात. सभासद नसलेले फक्त वाचु शकतात. सभासदाचा बायोडेटा त्याच्या अकाउंटवर ठेवता येतो. काही लोक तो फक्त आपल्या आयडी पुरता मर्यादित ठेवतात. खर्‍या नावाने लिहिणारे, पारदर्शी माहिती ठेवणारे फार थोडे. स्त्री की पुरुष,वय,रहिवास,व्यवसाय नोकरी इत्यादी व्यावहारिक माहिती. काही लोक देतात काही नाही.पारदर्शक नसण्याची अनेक कारणे असू शकतात.

लॉकडाऊनः तेहेतिसावा दिवस

लेखक गणेशा यांनी रविवार, 26/04/2020 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : लॉकडाऊन चे धागे वाचलेही नव्हते, कारण मला वाटले होते लॉकडाऊन मध्ये रोज काय करायला पाहिजे, कसे सकाळी उठल्यावर व्यायाम केला पाहिजे, काय आहार ठेवला पाहिजे असले प्रबोधन पर धागे असतील आणि कोणी रोज काय काय केले हे ते रोज प्रतिसादात सांगत असतील, मी हे खाल्ले आणि मी असा योगा केला , मी असा सुर्यनमस्कार केला, मग कोणी म्हणात असेल असे नाही काय असे करावे. असे फलाना बोलत असतील असे वाटले. आपल्याला हे प्रबोधन करणार्‍या गोष्टींचा काय माहित पण आजकाल थोडा राग येतो. आज पैजार बुवा आणि माझी शँपेन यांचे धागे वरती होते, पळवत वाचले... चांगले होते एकदम.. मस्त, आवडले.

नरभक्षकाच्या मागावर ! - भाग ३

लेखक रश्मिन यांनी शनिवार, 25/04/2020 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ ----------------------------------------------------------------------------------- vaagh हळूहळू सर्व कॉल्स विरत गेले. ह्याचा अर्थ अलार्म कॉल्स देणाऱ्या प्राण्यांच्या परिसरातून निघून ती वाघीण आता जवळपास पोहोचली होती.