श्रद्धांजली - ऋषि कपूर
काल इरफान गेला आणि आज सकाळी झोपेतून डोळे उघडेपर्यंत ऋषि कपूरच्या जाण्याची बातमी पुढ्यात उभी होती. आधीच करोनाच्या थैमानाने लोकांचा जीव अगदी मेटाकूटीला आला आहे. आणि त्यातून लागोपाठच्या दोन दिवसांत, दोन उत्तम अभिनेत्यांनी सोडून जाणे लोकांसाठी नक्कीच त्रासदायक ठरत आहे. मेरा नाम जोकरपासून ते अगदी अलीकडच्या द बाॅडीपर्यंत ऋषि कपूरची फिल्मी कारकिर्द, त्याच्या पिढीतल्या इतर कपूर्सपेक्षा नक्कीच उजवी होती.
व्यक्तीशः माझ्यासाठी ऋषि कपूर हा त्याच्या पुर्वार्धापेक्षा उत्तरार्धात अभिनेता म्हणून जितका समोर येत गेला तितकाच तो आवडत गेला.
मिसळपाव