Skip to main content

प्रेम..

लेखक मन्या ऽ यांनी सोमवार, 01/06/2020 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम.. प्रेम म्हणजे अथांग सागर प्रेम म्हणजे वाळवंटातील मृगजळ ज्याने तहानलेल्याची तहान काहीकेल्या भागत नाही प्रेम म्हणजे विश्वास प्रेम म्हणजे आपुलकी जो वेळप्रसंगी माणुसकीला जागलेच असे नाही प्रेम म्हणजे अटी प्रेम म्हणजे बंधन जे माणसाला एक माणुस म्हणुन वागवत नाहीत मुक्तपणे जगु देत नाही तरीही हे प्रेम वाटे मजला हवेहवेसे ते प्रेम जे एकमेकांच्या अबोल गोड शब्दांचे एकमेंकाच्या साथीचे समोरच्याच्या मंद गुढ हास्यातले ते प्रेम जे आयुष्यात देवघरातल्या नंदादिपाप्रमाणे अखंड तेवणारे स्वतः जळून काळोख मिटवणारे -दिप्ती भगत (२०जून,२०१९)
काव्यरस

सुंदर हे जग!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/06/2020 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे ‘मुळात हे जग सुंदर आहेच. पण असे काही वाईट अनुभवही येतात, की वाटतं, आता आहे त्यापेक्षा हे जग कितीतरी पटीनं नक्कीच सुंदर असू शकेल!’ हे अवतरण माझ्या ‘पंख गळून गेले तरी’ या आत्मकथनातील आहे. लाच, भ्रष्टाचार, गरीबी, लाचारी, हिंसा, जातीभेद, वर्गभेद, लिंगभेद, धर्मभेद, रंगभेद, व्यंगभेद, प्रांतभेद, अहंकार, धार्मिक कलह, दुसर्‍याला कमी लेखणं, टवाळी, निंदा, नालस्ती, शोषण, अवास्तव स्तुती, खुशमस्करी, लांगुलचालन, मत्सर, व्देष, भाषाव्देष, पापाच्या कल्पना, लबाडी, लूट, भेसळ, नफाखोरी, कोणाच्या व्यंगांकडे पाहण्याचा दुषीत दृष्टीकोन आदी गोष्टींतून आपण बाहेर कधी पडायचं?

आख्यायिकांच्या गदारोळात तानसेन

लेखक पुष्कर यांनी सोमवार, 01/06/2020 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी माझी अशी समजूत होती की 'केतकी गुलाब जुहि' हे गाणं तानसेन आणि बैजू बावरा यांच्यामधील जुगलबंदी आहे. त्यात जो गायक "जिंकतो" असं दाखवलं आहे, त्याला मन्ना डेचा आवाज आहे आणि हरणारा आवाज भीमसेन जोशींचा, तेही शास्त्रीय मैफिलीत! व्हिडिओमध्ये ज्या क्षणाला तो नट खजील होऊन हार मान्य असल्याचा आविर्भाव आणतो, तिथे खरं तर भीमसेन जोशी वरचढ वाटत होते, आणि ह्याला अचानक खजील व्हायला काय झालं कळत नाही.

भेट .....

लेखक फिझा यांनी सोमवार, 01/06/2020 06:03 या दिवशी प्रकाशित केले.
भेट ..... सागर गोटे अन भातुकली आठवते का ग आता ? किनाऱ्यावर गोळा केलेले शिंपले असतील अजून पण ...... तुझ्या वहीतल्या पहिल्या पानावर माझे नाव लिहिताना किती खाडाखोड ? ...पहिल्याच ओळीत ! आणि नंतर, पान भरून लिहिलेलं ... ! जेव्हा पुन्हा भेटशील तेव्हा 'ती वही' घेऊन ये ..... पानावरची 'तारीख ' सोडली तर ... अजून काही जसंच्या तसं शिल्लक आहे का हे तपासून पाहूया ...... नसेल तर ......... तर ..... मला कसलेही प्रश्न नको विचारू ... ... ! तुझ्या मनातल्या प्रश्नांपेक्षा .... माझ्या डोळ्यांसमोर उभे असलेले प्रश्न ..... खूप मोठे असतील कदाचित .......

प्ले लिस्ट

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 31/05/2020 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
दररोज भेटणारी माणसं आणि प्ले लिस्टमधली गाणी यांच्यात मला कमालीचं साम्य वाटतं. नव्या माणसाला भेटण्याचा अनुभव एखादं नवं गाणं ऐकण्यासारखाच असतो की. कधी ते माणूस/गाणं इतकं भावतं की आपल्या प्ले लिस्ट मध्ये त्यांच एक हक्काचं स्थान तयार होतं. काही गाणी मात्र आपण आयुष्यात एकदाच ऐकतो आणि काही व्यक्तींशी आपला संबंध येतो तो ही आयुष्यात एकदाच. ती गाणी ऐकण्याची किंवा त्या व्यक्तीला भेटण्याची परत इच्छा होत नाही. याचा अर्थ त्या गाण्यात/माणसात काही कमी होतं असा मुळीच नाही. फारफारतर त्यांची आणि आपली 'ट्युनिंग' जमली नाही इतकंच.

नक्की प्रॉब्लम काये ?

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 31/05/2020 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर २/४ जण सोडले तर इथे कुणाशी व्यक्तिगत ओळख नाही. त्यात फक्त २ जण मला प्रत्यक्ष भेटलेत. त्यात एक माझा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि दुसर्‍याशी आंतरजालीय ओळख आहे. सांगायचं कारण असं की फोकस कायम लेखनावर आहे. कुणाशीही व्यक्तिगत मित्रत्व किंवा शत्रुत्व नाही. ____________________________________________ १. देवभोळे लोक : जगातले ९०% लोक देवभोळे आहेत. संकेतस्थळ हा त्याच समाजाचा फोरम आहे. देव ही मानवी कल्पना आहे आणि मेंदूपलिकडे त्याला काही अस्तित्व नाही. अस्तित्व रहस्यमय आहे पण ते स्वयंभू आहे. थोडक्यात ते चालवणारा असा कुणी नाही. देव ही कल्पना आहे म्हटल्यावर हे ९०% लोक खवळतात.

धग

लेखक रातराणी यांनी रविवार, 31/05/2020 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
" संपूर्ण मानवजातीसमोर न भूतो न भविष्यती असे संकट उभे ठाकले असताना आपल्या देशातील सरकार आपल्याच देशबांधवांबाबत इतके निष्काळजी कसे असू शकते? फक्त ते गरीब आहेत म्हणून? त्यांच्या राहण्याचा तसाही काही ठावठिकाणा नव्हताच मग आता तरी त्यांची चिंता कशाला करा? की मग जातायत तर जाईनात का...उद्या त्यांच्या ओस पडलेल्या वस्त्यांवर टोलेजंग इमारती बांधून आपले तळवे चाटणाऱ्या अधिकारी, मंत्र्यांच्या पुढच्या पिढीची सोय करायची आहे? मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असं आम्हाला लहानपणापासून शिकवण्यात आलं. मग आजचे राजकारणी नक्कीच मनुष्य नाहीत. एक सत्ता सोडली तर इतर काहीही त्यांना प्रिय नाही.

खासियत खेळियाची - श्रीमंत थोरले वॉ साहेब

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 30/05/2020 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
बॅलन्स - समतोल - संतुलन - ईक्विलिब्रियम हा सृष्टीचा नियम आहे. एकीकडे झीज झाली की दुसरीकडे भर पडतच असते, कुठे थंडी पडली तर अजून कुठे उष्णतेची लाट आलेली असते. इतकंच काय एखाद्या घरी आज जेवणात मीठ कमी पडलं तर कुणाकडे जेवण खारट झालेलंच असतं. आज जरी कंटाळ्यातून असं गूढ गहन बोलत असलो तरी ह्या फिलोसॉफीचा शोध मला काही वर्षापूर्वीच लागला होता. "धूम ३" बघत होतो आणि एकदम न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडावं तसा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. "राम और श्याम"घ्या "सीता और गीता", "चालबाज", "अप्पू राजा", "कमीने", "किशन कन्हैय्या" अगदी "शर्मिली" सुद्धा.