Skip to main content

जब I met मी:-5

लेखक Cuty यांनी शनिवार, 04/07/2020 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
मी जन्माला आलो तेच मुळी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन! आज कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही एवढी गडगंज संपत्ती होती आप्पांकडे. आप्पा! माझे वडिल. गावचे पोलीसपाटिल. माझे आजोबाही गावचे पाटिलच होते. कित्येक पिढ्यांपासून आमच्या घराण्याचा दबदबा होता पंचक्रोशीत. संपूर्ण तालुक्यात पाटलांशिवाय पानही हलत नसे कुणाचे. प्रचंड जनसंपर्क आणि जनाधारही होता आप्पांच्या मागे. बाकी तालुकापातळीवरचे सरकारी अधिकारी आणि राजकारणी फक्त नावालाच. आप्पांचा शब्द शेवटचा असायचा गावाबाबतच्या कोणत्याही निर्णयात. जिल्हापातळीवरील कोणीही अधिकारी किंवा राजकारणी लोक गावात आलेच तर आप्पांची घरी येऊन भेट घेतल्याशिवाय जायचे नाहीत.

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस दहावा) ०३.११.२०१९ दिंडीगल ते कोविलपट्टी सायकलिंग

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी शनिवार, 04/07/2020 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस दहावा) ०३.११.२०१९ दिंडीगल ते कोविलपट्टी सायकलिंग सकाळी सहा वाजता स्ट्रेचिंग आणि प्रार्थना करून दिंडीगल वरून कोविलपट्टीकडे प्रस्थान केले. आज जवळपास दीडशे किमी स्ट्रेच होता. . सकाळीच सूर्य दर्शन झाले. प्रभात समयी "मित्राच्या" भेटीचा आनंद अपरिमित होता.

विठूचा रंग काळा, आगळा

लेखक शेखरमोघे यांनी शनिवार, 04/07/2020 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
  आषाढी किंवा कार्तिकी, एरवी ही जेव्हा येई विठूदर्शनाचा उमाळा फक्त मिटा डोळे, आठवा अंतरी, तो राजस, सुकुमार, नीटस काळा  त्याचा रंग काळा, त्याला वाटे, भक्तांना सदैव दिसावा   जो रंग, प्रतीक उपेक्षितांचा, वंचितांचा, त्याचा कधी विसर न व्हावा  कधी कुणा भक्तांस वाटावे, हा विश्वाचा धनी कां स्वतः काळा  काय आहे त्याला सांगायचे, दाखवत आपुला अवतार काळा  त्याचा रंग काळा, असा रंग जो प्रतीक सर्व उपेक्षितांचा, वंचितांचा  तुडवले, लाथाडले, विसरले, गेले जे सदैव, इतर म्हणती हा दोष संचिताचा  तो असेल क

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस अकरावा) ०४.११.२०१९ कोविलपट्टी ते कन्याकुमारी सायकलिंग

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी शुक्रवार, 03/07/2020 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस अकरावा) ०४.११.२०१९ *कोविलपट्टी ते कन्याकुमारी* कोविलपट्टीच्या जयलक्ष्मी हॉटेल कडून सकाळी सहा वाजता राईड सुरू केली, येथून कन्याकुमारी फक्त १३० किमी होते. मुंबई कन्याकुमारी राईडचा आजचा शेवटचा दिवस होता. सर्वजण रिलॅक्स होते. हॉटेलजवळ सायकल बरोबर फोटो काढले. सायकलिंनी या सफरीत अतिशय प्रेमळ आणि अप्रतिम साथ दिली होती.

चिनी चाणक्यांच्या चातुर्य निती

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 03/07/2020 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
खोटे का होईना कोणा परकीयाने कौतुक करावे त्याने हुरळून जावे मग प्रत्यक्षात परकीय केवळ स्वार्थाने वरवर तुमच्याशी गोड स्तुती सुमने उधळून प्रत्यक्षात मार का देत नाही. भारतात चाणक्याच्या नावाची चर्चाच अधिक चाणक्य नितींचा वापर कमीच असावा. -उलट इतर देशात त्यांच्या त्यांच्या चाणक्य निती प्रभावीपणे वापरात दिसतात. अपयशाने बर्‍याचदा न्युनगंड येतात आणि न्युनगंड झाकण्यासाठी बर्‍याचदा अहंगंडाचे प्रदर्शन केले जाते त्या भरात दुसर्‍याकडचे अगदी शत्रुकडचेही चांगले आत्मसात करून घ्यावे याचा सोयीस्कर विसर पडतो.

अन् मग

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 03/07/2020 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या क्षणभंगुर कवितेवर प्रतिसाद देणार्‍या क्षमाशील वाचकांनो, या कवितेच्या शवपेटीवर मी शेवटचा खिळा ठोकेन. धन्यवादाचा. अन् मग विस्मृतीच्या विस्कळखाईत कायमची दफनल्यावर ह्या कवितेचं काळंशार मायाळू खत होवो. अन् मग उपेक्षेच्या झळा सोसून, दुर्बोधतेचे आरोप झेलून, कोमेजलेली कुण्या प्रतिभावंताची अस्सल कविता त्या खतावर पुन्हा जीव धरून तरारो. अन् मग विचक्षण वाचकांनो, त्या बावनकशी कवितेचं असणं, गारूड टाकणं, अस्वस्थ करणारे प्रश्न पाडणं, सारं सारं तुमच्यात अनिर्बंध साथीसारखं पसरत जावो.
काव्यरस

[अंतिम भाग] भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २१ - कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्य

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 03/07/2020 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रकरणात कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्याविषयीचा भगवान श्री रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणात आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे: पौर्वात्य जगतात प्रचलित असलेल्या बहुतांशी सगळ्या धर्मांच्या सिद्धांतप्रणालींनी 'कर्माचा सिद्धांत' मांडलेला आहे. या सिद्धांताचे सगळ्यात लोकप्रिय स्वरूप लक्षात घेतले तर तो असे गृहीतक मांडताना दिसतो, की प्रत्येक व्यक्तीने केलेल्या चांगल्या आणि वाईट कृत्यांची स्वतंत्र खात्यात नोंद ठेवणारी एक वैश्विक गणनप्रणाली अस्तित्वात आहे.

राजयोग - १९

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 03/07/2020 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग-१८ *** श्रावण महिना सुरु असताना त्रिपुरामधॆ उंदरांचा उपद्रव सुरु होता. शेतांमध्ये मक्याची कणसं तयार होत होती. डोंगराळ प्रदेशातल्या शेतीत आता पिकांमध्ये दाणे भरू लागले होते. बघता बघता तीन महिने पूर्ण झाले. मार्गशीर्ष महिन्यात जेव्हा देशावरची पिकं तयार होऊन, कापणी करायची वेळ आली तेव्हा सगळीकडे आनंदाचे वातावरण झाले. शेतकरी, स्त्रिया, तरुण, वृद्ध, लहान मुले सगळे हसतखेळत शेतावर पोचले. हैय्या हैयाच्या आरोळ्यांनी एकमेकांना उत्साहित करू लागले. तरुण तरुणींच्या गीतांनी शेतं आवारं दुमदुमली. राजाविषयी असलेली नाराजी दूर होऊ लागली.

ऍपल फोन पासून अँड्रॉइड

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 03/07/2020 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
ऍपल फोन पासून अँड्रॉइड ( सॅमसंग ) बदल करताना फोन मधील डाटा/ संपर्क आणि व्हाट्स अप मधील सर्व इकडून तिकडे नेण्यासाठी काही सोपे उपाय आहेत का?

जब I met मी :-4

लेखक Cuty यांनी गुरुवार, 02/07/2020 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार सुट्टीचा दिवस! हा एकच दिवस मिळायचा जरा आराम करायला. निदान दुपारी जरा वेळ निवांत लवंडता यायचं बेडवर. मी अशीच आतल्या खोलीत पडले होते. जरा डोळा लागतो तोच भर दुपारी कुणाचातरी कोंबडा आरवला. झालं झोपेचं खोबरं ! डोळे चोळते तोच बाहेर अंगणात समोरच्या काकूंचा आवाज आला आईशी बोलताना, ' मग शेवट काय ठरलं, जमतंय का?' ' पोरगीच नालायक!! स्वतःला काय अप्सरा समजते कुणास ठाऊक? कितीही चांगला मुलगा असला तरी, अस्सा नको न तस्सा नको! एवढा शिकलेला पाहिजे न तेवढाच पगार पाहिजे अन शहरातलाच पाहिजे. चांगली चांगली पोरं हातची घालवून मिळूदे शेवट गाळ! आम्हीतरी काय करणार मग. आम्हाला काय साधं टेन्शन आहे का या पोरीचं.