Skip to main content

... And a forward shortleg

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 16/07/2020 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपण कॉमेंटरीमध्ये नेहेमी ऐकतो बघा - Kumble resumes from round the wicket with an aggressive field – 2 slips, a gully, silly point and a forward shortleg. येस! ... And a forward shortleg! एकदम "...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" स्टाईलमध्ये! कारण ती जागाच तशी आहे. फुटबॉल मधे स्वीपर किंवा लिबेरो, हॉकीमध्ये quarterback , बास्केटबॉल मधे point guard, कबड्डीमधला कोपरा रक्षक यांचा जो माज, जे ग्लॅमर तेच क्रिकेटमध्ये फॉरवर्ड शॉर्टलेगचं. इथे डायलॉगबाजी करून टाळ्या शिट्ट्या घेण्याची बात नाही - कडक रोलमध्ये पिक्चर खाण्याचा विषय आहे.

मोबाईलमधील डेटा क्लिअर कसा करावा?

लेखक वेलांटी यांनी गुरुवार, 16/07/2020 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे तीनचार वर्षे जुना सॅमसंग गॅलक्सी ऑनफाईव्ह आहे. मोबाईलमधे स्टोरेज स्पेस कमी आहे. मेमरी कार्डमधेच सर्व डेटा मी सेव्ह करते. मात्र internal storage अतिशय कमी राहिले आहे. एकही नविन अॅप किंवा मोठी फाईल डाऊनलोड होत नाही. Settings-->storage--> अशा पाथने गेल्यास कॅश डेटा आणि miscellaneous असे दोन टाईप्स दिसतात. त्यापैकी कॅश मेमरी डिलिट करता येत आहे आणि नंतर स्पेस वाढलेलीही दिसतेय. मात्र miscellaneous या ऑप्शनपुढे जवळपास 1 GB डेटा use केल्याचे दिसतेय मात्र त्यावर क्लिक केल्यास आतमधे एकही फाईल दिसत नाही. त्यामुळे काही डिलिट करताच येत नाही.

कांद्याचे वाटप/ वाटण ..योग्य कृती ?

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 16/07/2020 06:15 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील समस्त पाककृतीत रमणाऱ्या बल्लवांना आणि बल्लवीनीना ( असा शब्द आहे का?) एक सामान्य प्रश्न कांद्याचे वाटप /वाटण ..योग्य कृती ? खाली पैकी कोणती कृती जास्त चविष्ट होऊ शते १) सोललेला कांदा कच्चा आधी वाटून ( बहुतेकदा मिक्सर मधून ) गेहेने आणि मग तेलात परतणे २) सोललेला कांदा मोठा किंवा मध्यम चिरून घेणे आणि तेलावर परतणे आणि मग वाटणे ३) रेस्टारंट मध्ये बघितलेला प्रकार (मोठ्या प्रमाणावर) = अख्खा कांदा ( सालासकट ) उकळवणे , मग साले काढून टाकणे आणि उरलेला लगदा मग तेलावर परतणे यातील एखाद्या पद्धतीत वाटण कडू होण्याची शक्यता असते का ? दुसरे असे कि यात मी फक्त कांदा वाटप म्हणले आहे त्यात टोम

पनीर चिलिमिली

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 15/07/2020 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊन झाले तेंव्हा आपल्या अनेकांच्या मनीही नसेल की आपण पुढे पुढे काय काय करू? आमचेही तसेच जाहले. आधी महिन्यातून एखादवेळा आवडत्या हाटीलात सकुटुंब खादाडीला जाणे. पंजाबि डिश,नन्तर आईस्क्रीम पानबीन यथासांग करून घरी येणे हे अनुष्ठान असायचे. कधीमधी मटकीभेळ ,चायनीज,वडापाव असे अनंत चराळ खाद्य खाणे. हे ही होतेच. पण या कोविडा--नाईनटीना (हे लक्ष्मीरमणा गोSssविंदा! च्या चालीवर वाचावे.) च्या अवतारानी सगळी खाद्य अनुष्ठाने बंद पाडली.

पाप आणि पुण्य

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/07/2020 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे देवाला आपण माणसासारखं उभं केलं. म्हणजे देवाची मूर्ती आपण माणसाच्या रूपासारखी बनवतो. आपल्याच रूपात आपण त्याला पहात आलोत. राग, लोभ, प्रेम, काही प्रमाणात दोषही माणसासारखेच आपण त्याला बहाल केले. माणूस आनंद व्यक्‍त करतो वा रागावतो तसा देवही प्रसन्न होतो वा कोपतो. याचा अर्थ माणसाच्या रूपातच सर्व देव आहेत. सगळ्या देवांवर आपण माणसासारख्या नाना तर्‍हा आरोपीत केल्या. काही देवांना आपण आपल्या वासना सुध्दा बहाल केल्या. माणसापासून आपण देवाला खूप दूर जाऊ दिलं नाही. माणुसकी हे मानवी समाजाचं मूल्य आहे. संस्कृती सोबत अधिक प्रगल्भ होत गेलेलं तत्व म्हणजे माणुसकी.

गुलाबी कागद निळी शाई - पत्रांक ८ कॉफी

लेखक @tul यांनी बुधवार, 15/07/2020 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियांसी खूप काही सांगायचंय पण लिहितात येत नाहीये आज. आपल्या आवडत्या व्यक्तीचा परिचय करून घ्यावा की हळूहळू ओळखावं त्याला? व्यक्तिमत्व हळूहळू उमलले, अलगत उलगडले की जास्त भावेल, नाही का? giftbox सारखं. आकार केवढाही असला तरी आत काय असेल याची उत्सुकता कायम राखणारा. गम्मत म्हणजे देणारा आणि घेणारा दोघेही तितकेच उतावीळ, उत्सुक, अस्वस्थ!! देणारा फारच विचार करून देतो आणि मग अस्वस्थ होतो आवडेल की नाही. एक गिफ्ट योजलय तुझ्यासाठो . आणि बघ ना gift च्या नुसत्या विचारांनी हृदयाचे ठोके वाढले. तू ते अलगद उघडताना दिसतेयस. किती रोमांचकारी क्षण असेल तो.

गुलाबी कागद निळी शाई - पत्रांक ८ कॉफी

लेखक @tul यांनी बुधवार, 15/07/2020 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियांसी खूप काही सांगायचंय पण लिहितात येत नाहीये आज. आपल्या आवडत्या व्यक्तीचा परिचय करून घ्यावा की हळूहळू ओळखावं त्याला? व्यक्तिमत्व हळूहळू उमलले, अलगत उलगडले की जास्त भावेल, नाही का? giftbox सारखं. आकार केवढाही असला तरी आत काय असेल याची उत्सुकता कायम राखणारा. गम्मत म्हणजे देणारा आणि घेणारा दोघेही तितकेच उतावीळ, उत्सुक, अस्वस्थ!! देणारा फारच विचार करून देतो आणि मग अस्वस्थ होतो आवडेल की नाही. एक गिफ्ट योजलय तुझ्यासाठो . आणि बघ ना gift च्या नुसत्या विचारांनी हृदयाचे ठोके वाढले. तू ते अलगद उघडताना दिसतेयस. किती रोमांचकारी क्षण असेल तो.

फाटका ट्रेक ढाकचा...! भाग २... समाप्त

लेखक विखि यांनी मंगळवार, 14/07/2020 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या भागा पासुन पुढं... गुहेत आल्याव फुल्ल एन्जॉय सुरु झाला..... थोडा वेळ गेल्यावर सगळे गुहेत सेट झालो ज्यानी-त्यानी आपली आपली कामं करायला घेतली. आज खास गावठी चिकनचा बेत होता. बारीक-पुंडल्यानी चूल लावायला घेतली, चावरे,कनकधर-मास्तर, सुम्या चिराचीरी करत बसली, इशा-अम्या गुहेची साफसफाई बघत होते. अ‍ॅजे मेन आचारी म्हणून चिकनला हळद मीठ चोळून मी गुहेच्या तोंडापाशी पाय पसरून बसलो. मस्त गार वाटत होतं. गुहेचा माहोल कायच्या-काय भारी होता. खाली खोल दरी,बाजूला वर ढगात घुसलेला कळकराय सुळका, तोंडाव येणारं गार वारं. लई लांबवर राजमाची जवळ एखादी लाईट दिसत होती. बाहेर अजिबात कसला आवाज नाय का काय नाय.

कंदील (रहस्यकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी मंगळवार, 14/07/2020 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
कंदील (रहस्यकथा) मार्चचा महिना लागून काहीच दिवस उलटले होते.तरी वातावरणात उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत होत्या. वातावरण संमिश्र होऊन,कधी उन्हाचा चटका बसायचा,तर मध्येच थंडीची झुळूक अंगाला झोंबून जायची.कदाचित वीस तीस मैलावर असलेल्या पश्‍चिम घाटाचा तो परिणाम असावा. पण हे वातावरण कसेही असो,कनकपुरचा प्राचीन वस्तूंचा बाजार माणसांनी फुलून गेला होता.आठवड्यातील गुरुवारी भरणारा तो बाजार,सगळ्या दक्षिण भारतात प्रसिद्ध होता.कनकपुर म्हटले,की डोळ्यापुढे केवळ प्राचीन वस्तूंची रासच दिसायची.

कोविड-१९, थांबा आणि गांभीर्‍याने घ्याच अजून जरासे

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 14/07/2020 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका परिचितांनी ऑनलाईन मिटींगमध्ये बॉसना कोरोनाचे वादळ कधी पर्यंत घोंघावणार, आपण जुन्या नॉर्मलला कधी जाऊ असे विचारले, बॉसने लगेच त्यांची इम्युनॉलॉजीस्टशी झालेल्या चर्चेचा दाखला देत अजून दिड एक वर्षात सगळं पुर्वी सारखे नॉर्मल असेल असा विश्वास दिला आणि ऑनलाईन मधली सगळी मंडळी सुखावली. लगोलग व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतून रशियन लस तयार असल्याची बातमी अगदी उद्यापासून उपलब्ध असल्याचा भास निर्माण करेल अशी फिरली. ....पण थांबा जरासे वस्तुस्थिती कदाचीत बरीच वेगळी असण्याची शक्यता आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल Dr Tedros Adhanom Ghebreyesus, AIIMS चे डॉ.