परवा एका राजकीय मुखपत्राचे संपादक काहीतरी बोलले आणि त्यावरूनच बरेच विनोद, मिम्स असल्या गोष्टीचं सत्र सुरु झालं. पण त्यांच्या बोलण्याचं मूळ सुद्धा आपल्यात अजाणतेपणी रुजलेल्या समजुतीत आहे असं मला वाटतं. ते म्हणजे “डॉक्टरला काय कळतं?” ह्याचं एक्स्टेन्शन “WHO ला काय कळतं?
का म्हणे? डॉक्टरला काही कळत नाही तर २ दिवस अंगावर दुखणं काढून झालं की रात्री अपरात्री डाक्टर का आठवतो मग? ते राहू दे, त्याबद्दल पुन्हा केव्हातरी बोलू.
पण गेल्या काही महिन्यात जेव्हा जगावर हे महासंकट आलं तेव्हा WHO मध्ये बसलेल्या त्या तज्ज्ञ लोकांवर किती दबाव असेल, जबाबदारीचं ओझं किती असेल ह्याचा विचार केलाय कुणी?