Skip to main content

लिंगाण्याच्या सुळक्यावरील चढाई

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 04/09/2020 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
लिंगाण्याच्या माचीवर दुर्गबांधणीच अवशेष असले तरी हल्ली फार कोणी ते बघायला जात नाही. सध्या सर्वच दुर्गभटक्यांचे आकर्षण आहे तो ईथला भला थोरला सुळका. लिंगाणा सुळका सर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते व कधीतरी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची तो मनी इच्छा बाळगुन असतो. गिर्यारोहण हा दुर्ग भटक्याचा मुळ पोत नसला तरी रायगडच्या माथ्यावरून काळ नदीच्या खोऱ्यांतील लिंगाणा किल्ल्याचा सुळका त्याला सतत साद घालत रहातो व लिंगाणा किल्ला पहाण्यासाठी गिर्यारोहणाची जोखीम त्याला पार पाडावीच लागते. लिंगाणा किल्ला पहाताना त्याबरोबर लिंगाणा सुळका देखील सर होऊन जातो.

सुंदरा मनामध्ये भरली

लेखक मी-दिपाली यांनी गुरुवार, 03/09/2020 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
सुपरमार्केटमध्ये जायचं म्हणून अगदी निगुतीनं यादी करावी आणि येताना यादीत नसलेले दोनचार जिन्नस तरी अधिक घेऊन घरी यावं तसं माझं शिकवताना होतं. मनातल्या मनात आज काय शिकवायचं याचं कितीही नियोजन केलं तरीही बायोलाॅजीबरोबर कधी फिलाॅसाॅफी, कधी सोशोलाॅजी तर कधी सायकोलाॅजीला हात लावून यावं हे ठरलेलं. त्या दिवशीही तसंच झालं. बारावी सायन्सवर माझं लेक्चर होतं. Sex determination in different individuals हा टाॅपिक होता. त्याआधीचा बराचसा भाग केवळ माहितीवर आधारित (descriptive) असल्याने मुलांच्या चेहऱ्यावरचे थोडेसे कंटाळलेले भाव जाणवत होते.

चारीमुंड्या चित

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 02/09/2020 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
दारु पुरती प्रतिभा याची केवळ मर्यादित, रोज ढोसतो आणि होतो, चारीमुंड्या चित ॥१॥ कर्म दुविधेने तापुन हा झाला, पुरता संभ्रमित, जना विचारतो कर्मफले हा चारीमुंड्या चित ॥२॥ सकाळी होती वांधे याचे, त्याचे गातो गीत, हा खातो का पितो कळेना, चारीमुंड्या चित ॥३॥ वडा-पावच्या भंपक कविता, ना कोणी वाचित, सुमार विडंबने पाडी त्याचू, चारीमुंड्या चित ॥४॥ र ला ट जुळवून करतो हा विषयांचे भरीत, कसा निपजला थुकरट कवि हा चारीमुंड्या चित ॥५॥ किती मारल्यास उड्या तरी तुझी उंची मर्यादित, घेशी कुणाशी होड रे फट्टू चारीमुंड्या चित ॥६॥

जब I met मी :-6 (भाग दुसरा)

लेखक Cuty यांनी बुधवार, 02/09/2020 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस आम्हाला गोड बातमी मिळाली. आम्ही दोघेही खूष होतो. माझी नोकरी सुरूच होती. नवरा जमेल तशी माझी कळजी घेत होता. आता माझा दवाखान्याचा, खाण्यापिण्याचा वगैरे खर्च वाढला होता. पण नवरा काही कमी पडू देत नव्हता. त्याचीही खरेतर ओढाताण सुरू होती. मंदीमुळे बरेच दिवस पगारवाढ झाली नव्हती. तरीही आम्ही काटकसरीने पण आनंदाने राहत होतो. पण जसजसे दिवस पुढे जाऊ लागले, तशी मला चिंता भेडसावू लागली. कारण आईवडिल अलिकडे महिना दिडमहिना फोनसुध्दा करत नव्हते, माझ्या तब्येतीची विचारपूस तर दूरच राहिली.

प्रेम दिसावे

लेखक Bhakti यांनी बुधवार, 02/09/2020 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यासाठीच क्षण प्रत्येक जगावा माझ्या आधी 'तू ' होण्यात जगावा अस कस भरलं खूळ ,कोड पडावे सोडवण्याआधी मी आणखी गुंतावे साऱ्या दूनियेने कोठेही धावावे तुझ्या पावलांभोवती जग शोधावे खुडतांना दुःख होते फुलांनीही सांगावे नको त्यागाची 'वाहवाही' फक्त प्रेम दिसावे -भक्ती (२०१६)

जब I met मी :- 6 (भाग पहिला)

लेखक Cuty यांनी बुधवार, 02/09/2020 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
'पार काळाझारंय पोरगा! पण काय करायचं आता? ती म्हणते शिकलेलाय! मग कसंतरी उरकून टाकायचं, जाऊदे मरूदे एकदाचं!' आई माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करत, मला तिडिक जाणवेल इतक्या तुच्छतेने, बाहेरच्या खोलीत बसून शेजारच्या काकूला सांगत होती. मी आत पोळ्या करताकरता ऐकत होते. मला आईचा राग करावा की, कीव करावी की, स्वतःच्या नशिबाला दोष द्यावा हेच कळेना! अन माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले!

जब I met मी :- 6 (भाग पहिला)

लेखक Cuty यांनी बुधवार, 02/09/2020 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
'पार काळाझारंय पोरगा! पण काय करायचं आता? ती म्हणते शिकलेलाय! मग कसंतरी उरकून टाकायचं, जाऊदे मरूदे एकदाचं!' आई माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करत, मला तिडिक जाणवेल इतक्या तुच्छतेने, बाहेरच्या खोलीत बसून शेजारच्या काकूला सांगत होती. मी आत पोळ्या करताकरता ऐकत होते. मला आईचा राग करावा की, कीव करावी की, स्वतःच्या नशिबाला दोष द्यावा हेच कळेना! अन माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले!

श्रीगणेश लेखमाला २०२० - समारोप

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 02/09/2020 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मागील दहा दिवस सुरू असलेला गणेशोत्सव अन मिपाच्या श्रीगणेश लेखमालेचा शब्दोत्सव यांचा आज समारोप होतोय. मिसळपावची स्थापना श्रीगणेश चतुर्थीची. मिपाचा यंदा चौदावा वर्धापनदिन. गणेशोत्सवानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या मिपा श्रीगणेश लेखमालेचे हे नववे वर्ष. यंदा 'आठवणी - स्मृती' या विषयावर लेखमाला घेण्याचे जाहीर केले आणि मिपाकर नॉस्टॅल्जिक झाले. हा विषय किती जिव्हाळ्याचा आहे, हे आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून आले. वाचकांनाही हा विषय व लेखमाला आवडल्याचे त्यांच्या प्रतिसादावरून दिसून आले. या लेखमालेच्या निमित्ताने मिपाकरांनी किती वेगवेगळ्या आठवणींचा धांडोळा घेतला!

एकतारी

लेखक मायमराठी यांनी मंगळवार, 01/09/2020 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
धपापता ऊर गातसे ललित । हळवे ते सूर जीवघेणे ।। विरहाने चूर ठिणगी विदेही। जाणवतो धूर काळजात ।। वेदनेचा पूर क्षितिज ओलांडे वासुदेव दूर भिजे स्वतः ।। राऊळीं कापूर एकटा झुरतो । ज्याची हुरहूर तोच जाणे ।। चांदण्या फितूर दिसे कृष्णमेघ । वाजे कणसुर एकतारी ।। - अभिजीत

नोकरी ते उद्योजकता: एक ध्येय वेडा प्रवास!

लेखक केडी यांनी मंगळवार, 01/09/2020 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
Shvaan मी स्वयंपाक कधी करायला लागलो हे खरेच आठवत नाही, पण स्वयंपाक करायला लागलो याचे कारण मात्र माझे बाबा होते. बाबा मुळातच खवय्ये होते आणि आई सुगरण, त्यामुळे आमच्या घरात चमचमीत पदार्थांची रेलचेल असायची. बाबांच्या या खवय्येगिरीमुळेच असेल कदाचित, मला स्वयंपाक करायची आवड निर्माण झाली.