Skip to main content

Work with बाळ

लेखक शेर भाई यांनी मंगळवार, 20/10/2020 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल बहुतेकजणांच Work from Home जोरात आहे. त्या वर गाजलेला कुकर शिट्टीचा विनोद आपल्या सगळ्यांना माहित आहेच. तुमच्या घरात जर बालमंडळी असतील तर बघायलाच नको. हि बालमंडळी आपल Work कधी, कुठे आणि कस वाढवून ठेवतील ते सांगायलाच नको. वानगी दाखल आमच्या बालाचे काही किस्से इथे नमूद करत आहे. आमच्या घरातल बाल (वय वर्ष अडीच) Tinker category मधल आहे. म्हणजेच आम्हाला खेळणी खेळायला नको असतात. तर ती उघडून बघणे / खेळणे हाच आमचा सगळ्यात आवडता उद्योग आहे.

डीडीएलजे : स्वप्न दाखवण्याची २५ वर्षे

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 20/10/2020 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
विसाव्या शतकाच्या अखेरीस भारताने आपली आर्थिक धोरणं बदलली आणि दोन-चार वर्षांत त्याचा परिणाम इथल्या मध्यमवर्गावर दिसू लागला.लोकांच्या खिशात खुळखुळणारा पैसा वाढला होता,उच्छभ्रु समजल्या जाणाऱ्या दुचाकीला लोकाश्रय मिळु लागला होता, केवळ सिनेमात दिसणारे ब्रँड्स भारतात आपली दालनं उघडू लागले होते. या साऱ्याचा बदल इथल्या तरूणाईवर होणं स्वाभाविक होतं. त्यांच्या इच्छा,स्वप्न यात कमालीचा बदल झाला तो ही फार झपाट्याने. याच बदलाच्या टप्प्यावर 'राज मल्होत्रा' भारतीय तरुणांना भेटला (आणि तरुणींना भावला.) उनाड,मित्रांसोबत गाड्या उडवत फिरणारा, मेंडोलीन वाजवणारा बेजबाबदार.

एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना

लेखक अमर विश्वास यांनी मंगळवार, 20/10/2020 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
गज़ल (मराठीत गझल?) आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय ... जणू मर्मबंधातली ठेव ही .... पण एकदम कोणीच गज़ल ऐकायला जात नाही. आपल्या संगीत जीवनाची (कानसेन म्हणून ... तानसेन नव्हे ) सुरवात होते ती सिनेसंगीताने. त्यावेळी प्रमुख दोन प्रकार असतात .. फिल्मी आणि गैरफिल्मी. गाणी ऐकायची सुरुवात व्हायची ती रेडिओ पासूनच . माझीही सुरुवात तशीच झाली. पुढे कॅसेट, सीडी , एमपी३ , ऑनलाइन अशी साधन बदलली तरी दोन गोष्टी कायम राहिल्या - संगीताची आवड आणि रेडिओ. या प्रवासात रफी किशोर बरोबरच ओपी, एसजे, एसडी, आरडी ही नावेही जवळची वाटू लागली आणि मजरुह, साहिर, शकील यांच्याशीही परिचय झाला.

भिती

लेखक VRINDA MOGHE यांनी सोमवार, 19/10/2020 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
भिती आज दुपारपासुनच मळभ दाटून आलय. हवेतला उष्माही वाढलाय. आलोक गेले पाच दिवस ऑफिसच्या टूरवर दिल्लीला गेलाय. अस्मिताला एकटं रहायची खुप भिती वाटते खरंतर, ती कधीच आजवर एकटी राहिलीच नाहीए. सासुबाई येणार होत्या पण तब्येतीमुळे नाही आल्या. नाईलाज झाला अस्मिताचा. त्यात अस्मिता- आलोक या नव्या बिल्डींगमधे नुकतेच रहायला आलेले. इतर दोघे तीघेच रहायला आलेत. पण अजून ओळखी नाही झाल्या. समोरच्या रस्त्यावर रहदारी आहे . दोन-पाच दुकानं आहेत..थोड्या अंतरावर आणखी बिल्डींगची बांधकामं चालू. त्यातल्या मजूरांच्या तात्पुरत्या बांधलेल्या झोपड्या...बाकी जास्त वस्ती काही नाही, अशा परिस्थितीत अस्मिता खुपच घाबरून गेलीय.

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ४)

लेखक दुर्गविहारी यांनी सोमवार, 19/10/2020 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
यापुर्वीचे भाग आपण ईथे वाचु शकता अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १) अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २) अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ३) भेटीसाठी शामियाना उभारिला:-

भेटीसाठीजी जागा शिवाजी महाराजांनी निवडली ती सुध्दा अतिशय मोक्याची होती.टेहळणी बुरुजाच्या खाली सपाट

OTT वरील पाहण्याजोग्या सिरीज /चित्रपट

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 19/10/2020 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊनच्या काळात OTT वर बऱ्याच सिरीज/चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे, यातला काही कन्टेन्ट दर्जेदार होता तर काही अगदीच टाकाऊ. मला भावलेल्या काही सिरीज आणि चित्रपटांची यादी आणि माहिती थोडक्यात देतोय. तुम्हांला आवडल्या तर नक्की पहा. तुमच्याकडेही अजून काही पाहण्याजोग्या सिरीज आणि चित्रपटांची माहिती असल्यास खाली प्रतिसादामध्ये डकवा म्हणजे एक चांगली यादी होईल. SCAM 1992: The Harshad Mehta Story - SONY LIV : हर्षद मेहता हे नाव माहिती नाही असं होवूच शकत नाही. भारतात उदारीकरण सुरु होण्याच्या काळात झालेल्या त्याकाळातल्या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्याविषयीची हि सिरीज.