Skip to main content

गुंतागुंत

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 06/11/2020 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
"नमस्कार सर, गोखले बोलतोय." बोला गोखले साहेब "मला वाटले तुम्ही फोन कट करताय की काय" ते का बरे? "अहो माझ्या मुलाने तुमचा पाणउतारा केला होता म्हणून" अहो कसला पाणउतारा ? त्याला माझे म्हणणे नाही पटले, चालतंय की, त्यात चूक काय? आणि मला कोब्रा दंशाची सवय आहे. "त्याचे परिणाम भोगतो आहे की" का? काय झाले? "जेईई ला ११० मार्क" चांगले आहेत की "सर मस्करी करताय." नाही हो, अजिबात नाही. मी तुम्हाला एक नंबर देतो. त्या वर मुलाला फोन करायला सांगा. माझा एक विद्यार्थी आहे अभय शाह. अमेरिकेत मास्टर्स करतोय. त्याला पण १०५ मार्क होते j जेईई मध्ये २०१५ मध्ये. माझ्या संपर्कात आला.

मंगळगड उर्फ कांगोरी (Mangalgad/ Kangori )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 06/11/2020 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीतल्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले. त्यापैकी मंगळगड उर्फ कांगोरी गड जावळीच्या खोर्‍यातील एका उंच पहाडावर बांधण्यात आला. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगळगड, चंद्रगड, प्रतापगड, कावळा किल्ला व पारघाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीत जावळीच खोर वसलेल आहे. हा भाग उंच पहाड, घनदाट जंगल व खोल दर्‍यांनी नटलेला आहे. सावित्री नदीकाठी वसलेल्या महाड शहरातून परदेशांशी व्यापार चालत असे. महाडात उतरलेला माल अनेक घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांत जात असे. ह्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी घाटमार्गाच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीवर व घाटमाथ्यावर अनेक किल्ले बांधण्यात आले.

महाराष्ट्र राज्य पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 05/11/2020 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ५ नोव्हेंबर हा श्री मारुती चितमपल्लि यांचा जन्मदिन तर १२नोव्हेंबर हा डॉ सलिम अलींचा.

आठवणींतील काही : सुरस आणि चमत्कारिक

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 05/11/2020 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो.

मावळतीचा?

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 05/11/2020 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
मावळतीचा सूर्य "ड"जीवनसत्व देतो का? माहीत नाही. ............ तपासणीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर सर्जन म्हणाले, "तुमची anaesthetist ओळख कशी काय? चांगल्याच गप्पा मारत होता तुम्ही सर्जरी चालू असताना" त्याचे असे आहे, त्यांची मुलगी माझी विद्यार्थिनी, दुसरे म्हणजे तुमच्या तोडफोड च्या आवाजाकडे लक्ष देऊन ब्लड प्रेशर वाढवून घेण्यात अर्थ नव्हता. "ठीक. तो व्हेक्टर ताब्यात राहिल्याने सर्जरी सोपी झाली. तुमचे फेमर फ्रॅक्चर वाईट्ट होते. आता सर्व काम १ वर्षे बंद. एक वर्षानंतर फक्त कॉम्प्लेक्स मध्ये फिरायला हरकत नाही." मला माहित आहे डॉक्टर. ६० टक्के mortality within ६ months.

हे फिजिक्स शिकायचं तरी कशाला - पहिला फिजिक्स्ब्लॉग विडिओवर

लेखक अनिकेत कवठेकर यांनी गुरुवार, 05/11/2020 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार दोस्तांनो, मिसळपाव साईट्वर माझे फिजिक्स ब्लॉग तुम्ही 'न्यून ते पूर्ण करोनि' वाचत आहात. पण आताची आपलीच शिकण्याची पद्धत ऑडिओ विडिओ झाल्याने मिसुद्धा ब-याच खटपटीने पहिला फिजिक्स ब्लॉग युट्यूब वर पोस्ट केलाय. मी तो Camtesia हे सॉफ्ट वेअर वापरून केलाय. फार काही ग्रफिक नाही कारण मला माफक ग्राफिक येते. शिवाय मुलं ऑलरेडी बराच काळ सध्या मोबाईल-टीवी- लॅपटॉप यांवर घालवत असल्याने माझा विडिओ ब्लॉग अजून त्यांच्या त्रासात भर नको म्हणून कमी/माफक इमेजेस आणि काळी बॅकग्राऊंड ठेवलीय. जेणेकरून बघितलं तरी काळ्यारंगामुळे रेडिएशन चा किमान त्रास व्हावा..असो..

ओळख!

लेखक राघव यांनी गुरुवार, 05/11/2020 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भः लहान मुलांकडे असलेल्या निरागसतेमुळे मी नेहमीच प्रभावित अन् अचंबित होत असतो. आणि खरंतर ते अत्यंत आनंददायी असतं! "अरे खरंच.. आपण असा साधा विचार का नाही करू शकलो?" असं स्वतःला अक्षरशः अनेकदा विचारण्याची वेळ येते ! त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन फार साधा आणि कुतुहलाचा असतो. सरळ स्वभाव असल्यामुळे केमिकल लोचा कमी असतो! परत, जरी त्यांची स्मृती चांगली असते तरी मनात अढी ठेवून वागण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. उलट ते फार सहजपणे गोड वागतात, माफ करतात आणि विसरूनही जातात. कदाचित याच कारणानं लहान मुलं सगळ्यांना हवीहवीशी वाटतात! ह्या अनुषंगानं विचार होत असता, काही ओळी सुचत गेल्या. ती ही रचना.

शहाणी मुलगी....

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 05/11/2020 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या समोर मी नेहमीच शहाण्यासारखं वागायचं ठरवते. खूप वाटंत असतं तुझ्याकड अनिमिष नेत्रांनी पहावं.. तुझ्या कपाळावर येणारी चुकार बट, तुझे भुरभुरणारे केस, तुझ्या गालावरची खळी, बोलताना हलणारे लोभस ओठ.. पण मी अगदी शहाण्या मुलीसारखी बसते, डोळे झुकवून. झुकलेल्या नजरेला दिसतात तू कोपरापाशी अस्ताव्यस्त दुमडलेल्या बाह्या, तुझी ती लांबसडक कलाकाराची बोटं, शर्टाच्या पहिल्या उघड्या बटणातून खुणावणारी तुझी रुंद छाती. मी नजर अजूनच आवरून घेते. मग दिसतो ऐकू न येणा-या तालावर हलकेच हलणारा तुझा पाय, त्याचा तो देखणा अंगठा, मृगमुखी! मी तिथेच हरवून जाते... भानावर येते तेव्हा तू माझ्या उत्तराची वाट पहात असतोस. "अं?"

स्मरणाला मदत

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 04/11/2020 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
चांगली स्मरणशक्ती कोणाला नको असते? सर्वांनाच हवी असते. याच स्मरणशक्तीच्या विश्वाचा एक भाग आहे स्मृती सहायक.स्मृती सहायक म्हणजे जे काही आठवायचं आहे ते आठवायला मदत करणारी साधने.या साधनांपैकीच एक साधन आहे आद्याक्षरांपासून बनवलेली लघुरुपे. भरपूर मुद्दे किंवा मोठी यादी असेल तेव्हा या प्रत्येक मुद्द्यातला महत्वाचा शब्द किंवा यादीतल्या वस्तू यांची आद्याक्षरे घेऊन त्यापासून एखादा शब्द किंवा वाक्य बनवणे ही युक्ती वापरली जाते. यातले काही शब्द हे मजेदार असतात.किंबहूना ते मजेदार असल्यानेच लक्ष वेधून घेतात आणि दीर्घकाळ स्मरणात राहतात. उदा.

कोऱ्याकागदावरील भृगुसंहिता वाचन...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 04/11/2020 00:17 या दिवशी प्रकाशित केले.

भृगु संहिता वाचन...

काही कोरे ए4 साईझचे कागद हातात घेऊन वाचन केले जाते. त्याचे प्रात्यक्षिक. वाचनाचा भाग ३ सादर केला आहे. आधीच्या भागात माझ्या पूर्व जन्माचे कथन चालू होते. या भागात माझे, पत्नीचे, तिच्या वडिलांचे - केशव आणि माझ्या वडिलांचे - जनार्दन ही नावे आपसूकच आली आहेत. पंडितजींना मी पहिल्यांदा मोगा येथे भेटायला गेलो होतो. तिथे त्या दिवशी एक समारंभ आधीच आयोजित होता. नेहमी येणार्‍या ४०-५० भृगुऋषींच्या शिष्यमंडळींनी महर्षींच्या दरबार स्थानी अनेक मिठाई पाकिटे वगैरे आणली होती. मी हात हलवत गेलो होतो. म्हणून मला संकोचून जायला झाले.