Skip to main content

दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग १

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 16/11/2020 23:50 या दिवशी प्रकाशित केले.

दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग १


📢   हे प्रवासवर्णन एका दीर्घ लेखाच्या स्वरुपात यंदाच्या मिपा दिवाळी अंकासाठी लिहायला घेतले होते. परंतु प्रयत्न करूनही ते लेखन पाठवण्यासाठी वाढवून दिलेल्या मुदतीतही लिहून पूर्ण झाले नाही त्यामुळे दिवाळी अंकात नाही तर किमान दिवाळीत तरी ते मिपावर प्रकाशित करावे ह्या उद्देशाने हे प्रवासवर्णन आता पूर्ण करत करत तीन किंवा चार भागात प्रकाशित करत आहे.

दिवाळी पाडवा ! पती-पत्नीच्या नात्याचा गौरव !!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी सोमवार, 16/11/2020 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी पाडवा ! पती-पत्नीच्या नात्याचा गौरव !! खरं तर समाजात आजकाल हे नातं, अनेकवेळा वेगळ्या कारणांमुळे चर्चेत येतयं. पूर्वीची चाकोरी सोडून, आपण नवे विचार(?) रुजवू पाहतोय. लग्नानंतर काही काळाने, काही ठिकाणी नवरा बायकोचं पटेनासं होतं. मानसिक, शारीरिक, बौद्धिक, तात्विक गरजांची गणितं चुकत आहेत, असं वाटू लागतं. अनेक पातळ्यांवर आपल्या जोडीदाराचं, अपूर्णत्व जाणवू लागतं. मग आपलंच मन, सखा/सखी शोधू लागतं. अनेकांना अशी व्यक्ती सापडतेही... मन मोकळं होऊन, आपण सुखाचा श्वास घेतोयं, अशी गोड जाणीव होते. ती अनेक प्रसंगातून पक्की होत जाते. नकळत हे नवीन नातं, दृढ होत राहतं...

१. एका क्षणात विदेहत्व ! : निर्विचारता

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 16/11/2020 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा सोत्रींचा दिवाळी अंकातला लेख वाचून; जनमानसात अप्रिय असणार्‍या पण वास्तविकात अत्यंत मोहक अशा या विषयावर लिहिण्याचा मोह आवरला नाही. ही घ्या दिवाळी निमित्त सर्वांना एक अनमोल भेट ! १. मृत्यू ही काही फार भारी घटना नाही. पूर्वीच्या सिद्ध लोकांनी या गोष्टीचा उगीच मोठा लफडा करुन ठेवला आहे. संजीवन समाधी, (सोत्रींच्या लेखात वर्णन केलेली) जन्मभर करायची साधना, पुष्पक विमान, झालंच तर यम अँड रेडा वगैरे कल्पनांनी लोकांच्या मनात मृत्यूविषयी दहशत निर्माण करुन ठेवली आहे.

शब्द आणि सूर

लेखक श्रिया सामंत यांनी सोमवार, 16/11/2020 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
कदाचित शब्द निरर्थक ठरले नसतील पण ते पोचले नाहीत त्या अंतापर्यंत काही ओळी ओसाड पडल्या खऱ्या पण त्यांना तर वाटाच नाही सापडल्या म्हणूनच तर मनातल्या पर्णरेखांना डायरी जवळची वाटली कारण त्यांना माहित आहे मनातून उमटलेल्या सुरांचा प्रवास चालू असतो निरंतर .....

मी आणि तू

लेखक श्रिया सामंत यांनी सोमवार, 16/11/2020 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
मला प्रत्यक्ष एकदाही न भेटता तुला माझ्या मनाचा गाभारा गवसला आणि मी मी मात्र तुला माझ्यात शोधायचं सोडून इतरत्रच भटकत राहिले ...

प्रतापगड ( Pratapgad )

लेखक दुर्गविहारी यांनी सोमवार, 16/11/2020 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
किल्ले प्रतापगड म्हणजे मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासातील एक सुवर्णपान ! महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा बुलंद किल्ला बांधला.सह्याद्रीच्या सपाट माथ्यावर ठाई-ठाई दुर्ग वसलेले आहेत. जगात कुठल्याही पर्वतावर एवढ्या संख्येने दुर्ग नाहीत. सह्याद्रीच मस्तक या दुर्गांनी नटलेली असल्यामुळे या परिसरातील क्षितीज रेषा चित्रकार झाल्या आहेत. सह्याद्री हिमालायाएवढा विस्तीर्ण व उत्तुंग नसला तरी वयाने वडील आहे. त्याचा भेद मजबूत आहे.

किस चा किस

लेखक शेर भाई यांनी रविवार, 15/11/2020 02:41 या दिवशी प्रकाशित केले.
टिपूर पौर्णिमेची रात्र होती, मुसळधार पाऊस कोसळत होता. सगळे बेडूक आपापल्या बेडकीला रिझवायला आपला रियाझ जोरकसपणे सादर करत होते. आपल्या मधु-चंद्राचा सोहळा साजरा करायला आलेले ती दोघं त्या रोमांची वातावरणात मिलनोत्सुक नजरेने एकमेकांकडे बघत होते. त्याच वेळी आकाशात वीज कडाडली आणि तो तिच्याकडे झेपावला त्याच्या ह्या पावित्र्याने ती लाजली आणि तिची पाठ त्याच्याकडे फिरली. त्याला तिच्या कंचुकीच्या लटकनच्या मागे दडलेला तिच्या पाठीवरील नितंबाजवळचा तीळ त्याला खुणावू लागला (ही तर पद्मिनी जातीची स्त्री, (Ref.

मोह मोह के ' धागे..' (संपादकीय)

लेखक गवि यांनी शनिवार, 14/11/2020 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
body {background-image: url("https://i.postimg.cc/JhGSHjSZ/rsz-1lights-new.jpg");} /* जनरल */ h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif} p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;} h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;} /* H