हजारो ख्वाहिशें ऐसी - २०० किमी BRM - भाग १
(खर तर हे कुठल्या जागेच वर्णन नाही तरीही आमच्या प्रवासाचे वर्णन आहे आणि म्हणून त्याला भटकंती सदरात मांडते आहे.)
गोष्टीची सुरवात होते एका सायकलस्वारापासून. या माणसाने स्लो पौझनिंग सारखी आपली सायकलिंगची आवड बायकोकडे अर्थात माझ्याकडे पास केली. हळू हळू दोघे आपल्या लेकाला पण सायकलच वेड लावून फिरायला लागले. अनेक जण सल्ले मागायला यायला लागले. त्यातच याला भेटला माझा वर्गमित्र डॉ स्वप्निल दाभोळकर. सुरवातीला करमणुकीकरता म्हणून सायकल घेणारा माणूस थोडेच दिवसात एकदम सायकलच्या प्रेमात पडला. श्रीनिवास बरोबर इकडे जा तिकडे जा अशा फेऱ्या सुरु झाल्या.
मिसळपाव