Skip to main content

ज्ञात अज्ञात पंढरपूर ६ कृष्णाचा हौद

लेखक Ashutosh badave यांनी मंगळवार, 05/01/2021 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णाचा हौद जुन्या काळी पंढरपूरात संत महात्मे वा भक्त रहिवास करित असलेली संत पेठ आणि जुनी पेठ या वसाहती अस्तित्वात होत्या. कालौघात गावाचा वाढता विस्तार आणि ग्राम गरजा लक्षात घेता नगरपरिषदेने नव्या पेठेची उभारणी केली.

आज काय घडले... मार्गशीर्ष व. ५ छत्रसाल बुंदेले यांचे निधन ! शके १६५५ च्या मार्गशीर्ष ब.५ रोजी बुंदेलखंडाचा अधिपति छत्रसाल बुंदेला यांचे निधन झाले.

लेखक Ashutosh badave यांनी मंगळवार, 05/01/2021 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... मार्गशीर्ष व. ५ छत्रसाल बुंदेले यांचे निधन ! शके १६५५ च्या मार्गशीर्ष ब.५ रोजी बुंदेलखंडाचा अधिपति छत्रसाल बुंदेला यांचे निधन झाले. याच्या वयाच्या चौदाव्या वर्षीच आईबाप निवर्तन होवून राज्याची वाताहात झाली होती. तेव्हां यांने 'नशीब' काढण्यासार्टी मोगल दरबारकडे धाव घेतली. मीर्झा जयसिंग याच्या पदरी तो राहू लागला. जयसिंगाबरोबर त्याने अनेक लढायांत पराक्रम करून दाखविला. परंतु पुढे मोंगल दरबारांतील बेइमानीपणा पाहून मोगलांच्या सेवेतून तो मुक्त झाला. याच वेळी श्रीशिवाजीमहाराज यांची आगऱ्याहून सुटका झाल्यामुळे त्यांचे नांव भारतांत दुमदुमून राहिले.

आज काय घडले... मार्गशीर्ष व. ६ शकपूर्व २००९, मार्गशीर्ष व. ६ या दिवशी भारतीय युद्धांतलि कौरवां- कडील विख्यात सेनापति भीष्माचार्य यांनी शरपंजरी देह ठेवला.

लेखक Ashutosh badave यांनी मंगळवार, 05/01/2021 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... मार्गशीर्ष व. ६ शकपूर्व २००९, मार्गशीर्ष व. ६ या दिवशी भारतीय युद्धांतलि कौरवां- कडील विख्यात सेनापति भीष्माचार्य यांनी शरपंजरी देह ठेवला. नऊ-दहा दिवस युद्ध होऊनहि पांडवांकडील कांहीं हानी होत नाहीसे पाहून जेव्हां दुर्योधन कर्णाकडे सेनापतिपद देण्याचा विचार करूं लागला त्या वेळी भीष्म संतप्त होऊन बोलले, 'उद्यां मी मरेन नाहीं तर पांडव तरी मरतील, उद्यां मी असे युद्ध करतो की, त्याची आठवण हजारों वर्षे लोक काढत राहतील. वीरश्रीच्या आवेशांत आचार्य कौरवसेनेस मागे टाकून बरेच पुढे गेले.

दापोलि हर्णे अंजीरले येथे घरगुति निवास व भोजनची माहिती हवी आहे

लेखक sandeepa यांनी मंगळवार, 05/01/2021 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
दापोली हर्णे अंजीरले येथे जाणे नियोजन आहे तेथील घरगुती हॉटेल भोजन व्यवस्था बद्दल माहिती असल्यास मार्गदर्शन करावे

निसर्गाची अप्रतिम भेट - वालावल । स्वर्गीय कोकण ची - Bike Road Trip part -२

लेखक व्लॉगर पाटील यांनी मंगळवार, 05/01/2021 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण special Bike Road ट्रिप च्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासात आम्ही सिंद्गुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ जवळच्या एका नैसर्गिक देणगी लाभलेल्या सुंदर खेडेगावात म्हणजेच "वालावल" या खेडेगावात पोहचलो. पहिल्या दिवसाच्या प्रवास संपवून संध्याकाळी मुक्कामासाठी आम्ही या गावात आलो. हे एक खेडे असल्यामुळे इथे हॉटेल / रिसॉर्ट कमी आहेत. तसेच राहण्यासाठी मोजकेच पर्याय आहेत. त्यापैकी हॉटेल कौस्तुभ आणि या भागातील प्रसिद्ध हॉटेल प्रभूशृष्टी. जर तुम्ही फॅमिली सोबत जात असाल तर हा बेस्ट पर्याय आहे. पण नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या यामुळे आधीच बुकिंग झाले होते.

नालायक .

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 04/01/2021 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
नालायक . प्रसिद्ध छायाचित्रकार रमेश जाधव यांना स्वतःबद्दल खूप अभिमान होता. आज सकाळी सुद्धा ते सकाळी आपला नेहमीचा पाळायचा व्यायाम करून घरात आले तेव्हा त्यांच्या चालीतून तो जाणवत होता. ते आत आले तेव्हा त्यांच्या घरचा फोन वाजत होता. ते आपल्या नेहमीच्या रुबाबदार चालीने दिवाणखान्यातील फोन जवळ गेले. “किती वेळ वाजतोय हा कुणास ठाऊक ? घरी काय माणसे नाहीत की काय ?” असे म्हणत त्यांनी फोन उचलला. “ मी रमेश जाधव बोलतोय ..” फोन कानाला लावत ते आपल्या नावाच्या उच्चारात रमेश यावर जास्त जोर देत म्हणाले.

ती जागा (भाग -२,गुढकथा )

लेखक Bhakti यांनी सोमवार, 04/01/2021 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
https://misalpav.com/node/48045(भाग -१) मग काही दिवस माहेरी राहून रमा पुन्हा त्याच घरी आली.आजूबाजूच्या बायका भेटायला आल्या.त्यातला एक म्हणाल्या “ही जागा भाड्याने गेली तेव्हाच आम्हांला आश्चर्य वाटलं...” “का?” रमाने प्रतीप्रश्न केला. “अग इथे एक जोडप राहायचं तुमच्यासारखच ..चांगल चालल होत.

Unsafe Roads : महाराष्ट्र

लेखक जिन्क्स यांनी सोमवार, 04/01/2021 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी काही कामा निमित्त रात्री एकटाच कार ने पुण्याहून सोलापूर कडे निघालो होतो. सोलापूर हायवे एकंदरीत पुण्यावरून निघणाऱ्या इतर महामार्गाच्या मनाने सूनसानच. त्यात पाटस गावाच्या पुढे तुरळक ट्रक ट्रॅफिक वगळता इतर वाहने फारच कमी. रात्री 11:30 च्या आसपास मळद गाव ओलांडल्यावर एका वळणाजवळ गाडी आली असता अचानक डाव्या बाजूने झाडीतून तूफान दगडफेक सुरू झाली. त्यातला एक दगड हेडलँपवर बसला आणि दुसरा बोनेटवर आदळला. दुसऱ्या दगडाच्या आघातामुळे गाडी डावीकडे रस्त्याच्या खाली उतरली. आरश्यातून मागे पाहिले असता 4-5 जण झाडीतून रस्त्यावर येताना दिसले.

लाक्कुंदी आणि दांडेली - भाग २

लेखक एक_वात्रट यांनी सोमवार, 04/01/2021 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस दुसरा: आजचा दिवस आमच्या सहलीतला एकूणच आराम दिवस होता. डंबलचे डोड्डाबसप्पा मंदिर आणि इटगीचे महादेव मंदिर पहाणे एवढेच आजचे आमचे काम होते. मला सहलीत हे असले दिवस जाम आवडतात. जर धावपळच करायची असेल तर मग सहलीला येण्यात काय हशील?
आरामात उठून अगदी सावकाश आम्ही आमचा नाश्ता उरकला आणि बाहेर पडलो. गदगपासून साधारण २२ किमी अंतरावर गदग-मुंदरगी रस्त्यापासून थोडे आत डंबलचे डोड्डाबसप्पा मंदिर आहे. वाटेत काही पवनचक्क्या दिसल्या, तेव्हा तिथे थांबून थोडी छायाचित्रे काढली आणि निघालो.

पुस्तकवेड्यांचं वेड

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 04/01/2021 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
गतवर्षी मार्च ते नोव्हेंबर हा काळ आरोग्य-दहशतीचा होता. त्याकाळात घराबाहेरील करमणूक जवळपास थांबली होती. साहित्य-सांस्कृतिक आघाडीवरही शांतता होती. त्यामुळे घरबसल्या जालावरील वावर जास्तच राहिला. तिथे चटपटीत वाचनखाद्याला तोटा नसतो, पण लवकरच तिथल्या तेच ते आणि प्रचारकी लेखनाचा कंटाळा येतो. आता काहीतरी सकस वाचले पाहिजे असे तीव्रतेने वाटत होते. साहित्यिक पुस्तकांची ऑनलाईन खरेदी मी अद्याप केलेली नाही, कारण मला त्याद्वारे पुस्तक निवडीचा निर्णय घेणे कठीण जाते. प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन थोडेतरी चाळल्याशिवाय मी ते विकत घ्यायचे धाडस करीत नाही. डिसेंबरमध्ये सामाजिक वावर तसा वाढू लागला.