Skip to main content

प्रवास (भाग 2)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 09/01/2021 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास भाग 1 https://www.misalpav.com/node/48038 प्रवास भाग 2 अनघा : हॅलो आनंद? ..... : त्याचं शूट चालू आहे. तुम्ही कोण? मुलीचा आवाज ऐकून अनघा गोंधळली. अनघा : तुम्ही कोण बोलताय? ..... : मी कोण याच्याशी तुमचा काही संबंध नाही. मी आनंदचा मोबाईल attend केला आहे याचा अर्थ मी कोणीतरी नक्की आहे त्याची. तुम्ही फोन केला आहात तुमचं नाव सांगा अगोदर. अनघाला त्या मुलीच्या बोलण्याचा राग आला. पण त्याक्षणी तरी ती काही करू शकणार नव्हती. त्यामुळे तिने फोन कट केला. पण अनघाचं मन तिला स्वस्थ बसू देईना.

लाक्कुंदी आणि दांडेली - भाग ३ (अंतिम)

लेखक एक_वात्रट यांनी शनिवार, 09/01/2021 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस तिसरा:
कर्नाटकातील दांडेली मुख्यत्वे प्रसिद्ध आहे तिथल्या रिव्हर राफ्टिंगसाठी. आम्ही मात्र ते करणार नव्हतो. दांडेलीत जाऊन तिथला निसर्ग अनुभवणे आणि जमले तर तिथल्या अभयारण्याला भेट देणे एवढाच आमचा कार्यक्रम होता.

बालकथा - वेदिका शहाणी झाली.

लेखक nanaba यांनी शुक्रवार, 08/01/2021 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
श्रुतिका आणि वेदिका दोघी छान मैत्रिणी होत्या. बागेत रोज भेटायच्या, मजा करायच्या. श्रुतिकाला वेदिका फार आवडायची. तिचे नीटनेटके कपडे, गळ्यातल्या छान छान माळा,गोड गाणी म्हणणं, गोड बोलणं. वेदिका होतीही मोठी हुशार आणि दिसायची पण कित्ती छान! श्रुतिकाला फार वाटायचं की आपल्याला पण वेदिका सारखं सगळं छान जमलं असतं तर! सुट्टीत श्रुतिका वेदिकाकडे रहायला गेली. दोघी पहिल्यांदाच एकत्र रहात असल्याने दोघीही जाम खूष होत्या. वेदिका च्या आईन श्रुतिका येणार म्हणून तिची आवडती इडली केली होती. दोघी खायला बसल्या. श्रुतिकाने सगळं छान संपवलं , पण वेदिका मात्र अखंड बडबड करत बसलेली.

तेरेखोल किल्ला/Terekhol fort/ Tiracol fort

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 08/01/2021 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी हि मानवाची मुलभुत गरज, त्यामुळे प्राचीन काळी मानवी वस्ती वाढली ती नद्यांच्या काठी. पुढे निरनिराळ्या प्रदेशाची सीमा आखणी करायची वेळ आल्यानंतर सहाजिकच नदी हिच हद्द ठरविण्यासाठी वापरली गेली. सह्याद्रीत आंबोलीजवळ उगम पावून आणि पर्यटकांना धबधब्यात मनसोक्त भिजवून तेरेखोल नदी गोवा राज्याची उत्तर सीमा आखत समुद्रात विलीन होते. नदीच्या उत्तर काठावर आपण महाराष्ट्रात असतो, तर फक्त तरीने नदी ओलांडली तरी राज्य बदलून गोव्यात पोहचतो. पण नियमाला अपवाद असतो,तस चक्क नदीच्या उत्तर किनार्‍यावरचा अगदी समुद्राला खेटून असणारा भाग हा गोवा राज्याच्या हद्दीत येतो. नेमका ईथेच खडा आहे, "तेरेखोल किल्ला".

ज्ञात अज्ञात पंढरपूर ७ व्यास तीर्थ आणि व्यास नारायण मंदिर, पंढरपूर

लेखक Ashutosh badave यांनी शुक्रवार, 08/01/2021 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञात अज्ञात पंढरपूर ७व्यास मंदिर व्यास तीर्थ आणि व्यास नारायण मंदिर, पंढरपूर आधुनिक जगतातील सर्वांत प्राचीन ज्ञानसंपदेचे साधन म्हणजे हिंदुंचे वेद होय. ते अपौरूषेय आहेत. तसेच ते मौखिक पद्धतीने शतकानुशतके जतन केले आहेत अगदी उकार, वेलांटी, अनुस्वार, काना, मात्राचेच नव्हे तर स्वराघाताताही कोणताहि बदले होवू न देता.

तप्तमुद्रा

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 08/01/2021 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा निर्मम कठोर आसमंतात दाटले तेव्हा अनाहत आत खोलवर निनादले अनाघ्रात अदृृष्टाची जाणवली रूणझुण स्पर्श,गंध,रस, रंग एक झाले कल्लोळून आकलनाच्या कवेत आले-आलेसे वाटले अज्ञेयाच्या धुक्यामध्ये नकळत वितळले जाणिवेची नेणीवेशी जेव्हा थेट भेट झाली जुन्या जखमेच्या जागी तप्तमुद्रा उमटली
काव्यरस

आज काय घडले.... मार्गशीर्ष व|| १० जयद्रथास प्रायश्चित्त मिळालें!

लेखक Ashutosh badave यांनी शुक्रवार, 08/01/2021 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले.... मार्गशीर्ष व|| १० जयद्रथास प्रायश्चित्त मिळालें!jayadratha vadh शकपूर्व २००९ च्या मार्गशीर्ष व.

माझे युट्युबर्स वरील पाककृतींचे विडिओ!!

लेखक देवीका यांनी शुक्रवार, 08/01/2021 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसाने आज आले आणि पाहिले की, इथे आपले युट्युबचे काम प्रमोट करु शकतो( हा माझा अजूनही अंदाजच आहे पण वाटले की, अश्या प्रमोशनला बंदी नसावी.) जर असलीच तर मी हा लेख काढून टाकेन, अ‍ॅडमिन कृपया मला तसे कळवा. खरे तर मी काही व्यवसायिक युट्युबर नाही आहे, म्हणजे पुर्णपणे छंद म्हणून काढलेला प्रयत्न होता. तो सुद्धा माझ्या आईसाठी. गणपतीत तिच्या खुपच मागे लागले की, तु तुझ्या पाककृती टाक म्हणून. कारणही तसेच होते. आई एकदमच एकाकी झाली होती एका धक्क्याने. तिला पुन्हा कशात तरी गुंतवावे म्हणून माझ्याकडे आणले व आग्रह केला.

सल्ला पाहिजे मुंबई दिल्ली प्रवास ७५+ वय

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 08/01/2021 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
सल्ला पाहिजे, विनंती मुंबई दिल्ली ७५ वर्षाच्या च्या पुढील माणसे विमानाद्वारे प्रवास करणार असतील ( जानेवारी अखेरी) तर काय काळजी घायवी, काय परिस्थितीती आहे याचा सध्याचं अनुभव असेलल्या मंडळींकडून सल्ला मागू इच्छितो .. - कोविद टेस्ट झाली आहे - मुंबई उपनगरातून विमानतळावर जाताना? ओला वैगरे किंवा स्थानिक माहितीतील टॅक्सी वाला ? कसे करावे ? - विमानतळावर, चेक इन करताना काय कागदपत्रे ? आणि इतर काळजी घेणे - सर्वात महत्वाचे विमान प्रवासात ( २ तासाचे उड्डाण असल्यामुळे खाणे पिणे वैगरे महत्वाचे नाही ..

स्वराज्याचा लढा आणि पुरंदरचा तिढा ! ( भाग १)

लेखक दुर्गविहारी यांनी गुरुवार, 07/01/2021 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
अश्विन महिन्यातील एक प्रसन्न सकाळ उजाडली. नुकताच वर्षाकाळ संपला होता आणि बंगलोर प्रांतीचा सर्वात मोठा सण दसराही थाटामाटात साजरा झाला. बेंगलोरच्या भुईकोटाला आणि शहाजी राजांना बर्‍याच काळांनी स्थैर्य मिळाले होते. वेशीच्या दरवाज्यातून एक ताफा बाहेर पड्ला आणि उत्तरेच्या दिशेने निघाला. या ताफ्यात हत्ती, घोडे,अमात्य, अध्यापक सारेजण होते. दोन मेणेही होते. एका हत्तीवर बारा वर्षाचा एक तरणाबांड तेजस्वी युवक बसला होता. एका मेण्यात त्याच्या मातोश्री तर दुसर्‍या मेण्यात पत्नी होती. हा ताफा होता बेंगलोर प्रांतीचे राजे शहाजी महाराजांची धर्मपत्नी जिजाउ साहेबांचा.