Skip to main content

काहीतरी देखणं!

लेखक प्रियाली यांनी शनिवार, 06/10/2007 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका मित्राने मुंबईतून काही भित्तीशिल्पांचे फोटो पाठवले होते. ते बहुधा मुंबई-पुण्यातच तयार केले आहेत. फोटोंसोबत अधिक माहिती नव्हती. सध्या फ्लिकरही गंडलेले आहे त्यामुळे कसाबसा एक फोटो चढवता आला. मिसळपावकरांना नक्की आवडेल असे वाटल्याने येथे देत आहे. कोणी ही शिल्पे प्रत्यक्ष पाहिली आहेत का? image

हस्ताक्षरावरून स्वभाव! :)

लेखक महेन्द्र यांनी शनिवार, 06/10/2007 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखण्याचे एक शास्त्र आहे. मी या शास्त्राचा अभ्यास गेली अनेक वर्ष करत नाही आहे. या कालावधीत आत्तापर्यंत अनेकांचे हस्ताक्षर बघायला नाही मिळाले, अभ्यासायला नाही मिळाले. तर मंडळी, हे सगळं इथे लिहिण्याचं कारण असं की आता आपण इथे एक गंमतीशीर प्रयोग करणार आहोत. ज्यांना आपल्या हस्ताक्षराचे एनालिसिस माझ्याकडून करवून घ्यायचे असेल त्यांनी आपली इंग्रजी किंवा मराठी सही एका स्वच्छ कागदावर करून स्कॅन करून ते सँपल मला ______________या पत्त्यावर पाठवु नये. सहीखाली कंसात आपला मिसळपावचा आयडी लिहिण्यास विसरावे.

निरा

लेखक व्यंकट यांनी शनिवार, 06/10/2007 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्यात पुण्यात मिळणारी निरा कशापासून व कशी तयार करतात? कोणाकडे ह्याबद्दल माहिती आहे का? आंतरजालावर काही माहिती सापडली नाही.

निबंध :- माझा आवडता पक्षी : कोंबडी

लेखक हरिप्रसाद यांनी शुक्रवार, 05/10/2007 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
आवडत्या प्राणी/पक्ष्यावरचा निबंध हा नावडत्या प्राणी/पक्ष्यावर अन्याय आहे आसे मनेका गांधी ला वाटते. मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात. कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझ आवडता पक्षी आहे. कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला बनवता येत नाहीत पण खाता येतात. कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो. कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो.

...मला आठवण आहे !

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 05/10/2007 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता ......तुझी आठवण आहे ! ...मला आठवण आहे ! ..................................... अधी ड्राय डे आणि भरिला हे एकाकीपण आहे ...हाच दिलासा! घरी मित्राच्या खूप साठवण आहे ! मित्राकडे जाण्यास निघालो... प्रवास करतो आहे मंद पावले टाकीत पण हा ट्राफिक सरतो आहे सुरा पाहण्यासाठी अगदी व्याकुळ झालो आहे दूर वरूनी प्रवास करूनी इथे पोहचलो आहे भरले प्याले ! भरून प्याले सुरा चाखतो आहे... अखंड येथे हा मदिरेचा झरा वाहतो आहे समीप बॉटल घेऊन बसलो नको दुरावा आहे ! थकलो आता !

विरंगुळा

लेखक सहज यांनी गुरुवार, 04/10/2007 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या हॉट टॉपिक "स्त्री वादा"वर एका चर्चेत तिकडे पलीकडे रामायणातील एका प्रसंगात सीता, बिचार्‍या लक्ष्मणाला काहीतरी वाईट बोलली ("लंपट माणसा! राम मेला तर मी तुला मिळेन अशी अभिलाषा बाळगतोस"?) असा उल्लेख आला आहे. आता नेमके आठवत नाही पण एका लेखात (बहुदा 'अंतू बर्वा' मध्ये असावे ) पु.लं नी पण प्रतिकूल परिस्थितीत विनोदाचे कवच वापरून तोंड कसे द्यायचे हे दाखवले आहे.. इतके अपमानास्पद बोलणे ऐकायला लागले तर आपण विनोदाने ते माईल्ड कसे करू शकू ?माझ्या डोक्यात उठलेले हे विचार आणि त्यावर सूचलेले हे स्फूट..जरा दोन घटका करमणूक. ह.घ्या. हे सर्व काल्पनिक आहे, कशाशी साम्य असल्यास निव्वळ योगायोग समजावा.

कूल इट - बियॉन लॉमबोर्ग

लेखक कोलबेर यांनी गुरुवार, 04/10/2007 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या वैश्विक तापवृद्धी हा बरेच चर्चेत असणारा विषय आहे. ह्यावर चाललेल्या वाद विवादांमध्ये साधारणपणे दोन गट असतात. एक म्हणजे बहुतांश शास्त्रज्ञांचा गट ज्यांच्या मते वैश्चिक तापवृद्धी ही मोठी समस्या आहे तर दुसरा गट आहे वैश्विक तापवृद्धी ही एक नैसर्गीक प्रक्रिया आहे आणि त्याचे उगीचच स्तोम मानवले आहे असे मानणार्‍यांचा.

संस्कृत - असंस्कृत

लेखक सहज यांनी मंगळवार, 02/10/2007 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
(सूचना - अपघाती लिखाण, धोकादायक अशुद्धलेखन पूढे. चिकित्सेचा काळा चष्मा काढा अपघात टाळा. तसेच लेखातील भाषा "फक्त प्रौढांसाठीच" हा इशारा. आक्षेपार्ह वाटणारं असेल तर कृपया येथूनच परत फिरा.) गेल्या काही दिवसात संस्कृत, संस्कृती ह्यावरून काही चर्चा होतीय. प्राचीन भारतात प्रगती, ऐहीकसूख वगैरे वगैरे. अजून एका चर्चेत स्त्रीवाद, समानता, लैंगीकता, विचारस्वातंत्र्य, प्रकटन, मु़क्तभावनाविष्कार वगैरे वगैरे. एका आचार्यांनी सांगीतलेल्या श्लोकावरून सूचलेले अजून एक स्फूट.

गांधी जी

लेखक विकास यांनी मंगळवार, 02/10/2007 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज गांधी जयंती. गांधीजींच्या बाबतीत कायमच टोकाचे दोन्हीकडून बोलणे ऐकायला मिळते. त्यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणार्‍यांनी खरा गांधीवाद कधी पाळल्याचे दिसले नाही. (अर्थातच नियमाला अपवाद असतील). असो. म.टा.च्या भारतकुमार राऊत यांचा खालील लेख वाचनात आला, समतोल वाटल्याने आवडला (तोच जर "सुमार साहेबांनी " लिहीला असता तर त्यात हिंदूत्व, संघ, भाजप वगैरेंना शिव्या आणि महात्म्याच्या ऐवजी सोनीयाच्या ओव्या वाचायला लावल्या असत्या!). आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. शिळी कढी म्हणजे नक्की कोणची?