Skip to main content

आयसीआयसीआय बँक

लेखक धोंडोपंत यांनी बुधवार, 21/11/2007 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
आयसीआयसीआय बँक रुपये १०९० च्या आसपास विकत घ्या. आपला, (आग्रही) धोंडोपंत

निफ्टी डिसेंबर २००७ चे फ्युचर्स घ्या

लेखक धोंडोपंत यांनी बुधवार, 21/11/2007 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, अपेक्षेप्रमाणे मार्केट खाली आले आहे. ज्यांची धोका स्विकारण्याची तयारी आहे त्यांनी निफ्टीचे डिसेंबरचे फ्युचर्स ५५६० च्या आसपास विकत घ्यावेत. डिसेंबरचे घ्यावेत नोव्हेंबरचे नव्हेत. एका लॉटमागे कमितकमी ३०० रुपये १५/२० दिवसात निघतील असा अंदाज आहे. यात बरीच रिस्क आहे. पन फायदा बी लईईईईईईईई. ज्यांची ही रिस्क घ्यायची तयारी आहे त्यांनीच याच्या वाटेला जावे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी ह्या भानगडीत पडू नये, हे आग्रहाचे सांगणे. आपला, (सटोडिया) धोंडोपंत

आगामी संपन्न दशकाची (काल्पनिक!!!) डायरी : भारतवारी

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 21/11/2007 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
आगामी दशकात मराठीत सर्वाधिक लिहिला जाईल, असा साहित्यप्रकार, म्हणजे भारतवारी. हा प्रकार ढोबळमानाने टवाळखोरपणा ह्या प्रकारात मोडतो, पण अशी टवाळखोरी ही बरेचदा रोचक असते, आणि, अमेरिकन भारतीयांच्या देसी सासूसासर्‍यांच्या अमेरिकावारीवरची टीकाकारी तसेच त्यांची स्वतःची भारतवारी हे या टवाळखोरांसाठीचे रेचक, हा ह्या दोन प्रकारांतील मुख्य फरक. भारतवारी हा साहित्यप्रकार गेल्या शतकापासून मराठी साहित्यात रूढ आहे. भारतवारीवरची समीक्षा, टीका केल्याने पंडितमैत्री होते, अशा काहीशा भाबड्या समजुतीने आजवर कागदाची अनेक रिमे आणि शाईचे अनेक ब्यारेल्स वाया गेलेले आहेत.

आमचा एक विषाणू दिवस

लेखक देवदत्त यांनी बुधवार, 21/11/2007 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
२५ एप्रिल १९९९. संध्याकाळी ६/७ च्या दरम्यान मी माझ्या संगणकावर DOS मध्ये विषाणूविरोधी संरक्षणाची संहिता चालवत होतो. का माहित नाही पण माझ्या संगणकावर विंडोजवर ते चालत नव्हते. त्यात त्याला C ड्राईव्ह मध्ये काही विषाणू मिळाले. ते मी काढून टाकले. पण D ड्राईव्ह तपासता आली नाही. कारण ती संकुचित होती(compressed). तेव्हा विषाणू मिळणे म्हणजे खास काही वाटत नव्हते. २६ एप्रिल १९९९. मी सकाळी झोपलो होतो. ७:३० किंवा ८ च्या दरम्यान स्नेहांशू मला उठवायला आला."ए, चल ना." "थांब रे जरा.", मी आपला उठायच्या मनस्थितीत नव्हतो. ५/१० मिनिटानी अमीत आला.

आमच कोल्हापुर

लेखक झकासराव यांनी मंगळवार, 20/11/2007 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी काढलेले फोटो. दिवाळीत कोल्हापुरला जावुन आलो त्यावेळचे. http://picasaweb.google.co.uk/zakasrao/MaajhKolhapur इथे पहा माझ कोल्हापुर आणि सांगा कसे आहे ते. :) प्रत्येक फोटोच्या कॅप्शनवर माउस नेला की त्याची माहिती पुर्ण दिसेल. काहि फोटोखालि माहिती लिहिली आहे. ती वाचायची राहु नये म्हणून सांगितले :) kolhapur
Taxonomy upgrade extras

दिवाळी नंतरचे शेअर मार्केट - खरेदी विक्रीकरिता एक दृष्टीक्षेप

लेखक सागर यांनी मंगळवार, 20/11/2007 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, दिवाळी संपली आणि शेअर बाजार आपले रंग दाखवू लागला. मागे मी अंदाज केल्याप्रमाणे दिवाळीनंतर बाजार कोसळू लागला आहे. आज बाजार 19307.36 वर बंद झाला. अर्थात हा वेग माझ्या अपेक्षेपेक्षा कमी नक्कीच आहे. शेअर बाजार १६५०० पर्यंत पडण्याची मला अपेक्षा होती. आता ती १८००० पर्यंत मला सिमीत करावी लागेलसे दिसतेय. येत्या १-२ आठवड्यात १८००० च्या घरात शेअर बाजार आला तर आश्चर्य वाटू नये.. असो. त्या अनुषंगाने सध्या मी जे शेअर्स घेतले आहेत ते (पाजळलेले ज्ञान?) सर्वांबरोबर वाटून घ्यावेसे वाटल्याने हा लेखप्रपंच खाली मी काही शेअर्स देत आहेत त्यांच्या कोडसकट आणि आजच्या भावासकट.

गुरूपालट दिनांक २१ नोव्हेंबर २००७

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 20/11/2007 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, कार्तिक शुध्द एकादशी रोजी म्हणजेच बुधवार दिनांक २१ नोव्हेंबर २००७ रोजी, उत्तररात्री २९ वाजून ०३ मिनीटांनी म्हणजेच गुरूवारी पहाटे ०५ वाजून ०३ मिनीटांनी गुरू वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करतो आहे. ह्या गुरूभ्रमणाचा पुण्यकाल गुरूवारी पहाटे ०३-१२ पासून ते सकाळी ०६-५४ पर्यंत आहे. ज्या लोकांची धनु रास आहे, त्यांच्या राशीत गुरू येत आहे. म्हणजेच त्यांच्या जन्मस्थ चंद्रावरून गोचर गुरूचे भ्रमण होणार आहे. शुभ आणि बलवान चंद्र असलेल्या धनुराशीच्या लोकांना जीवनात येत्या वर्षभरात अत्यंत शुभ अनुभव येतील. कन्या, वृषभ आणि मकर राशीला गुरू अनुक्रमे ४-८-१२ वा येत आहे.