Skip to main content

शब्देविण संवादिजे...

लेखक अशोक गोडबोले यांनी मंगळवार, 19/02/2008 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
सोंग झोपेचे घेऊन स्वप्न सुंदर पडेना देह-भूमिती जाणून मन-गणित सुटेना पडे पैशाचा पाऊस सूर कोरडा राहिला घाट बांधायाची हौस देव दगड जाहला भरी रांजण स्वार्थाचे घुसे मग तो दिंडीत टाकी रुपये चोरीचे वारकर्‍याच्या झोळीत पापपुण्याचा करावा हिशेब ना कधी कोणी गणिकेच्या गळ्यातून येती गंधर्वाची गाणी डोके चालविण्या आधी भिंत चालवावी लागे हीच ग्यानबाची मेख करी झोपलेल्या जागे शब्देविण संवादिजे असा अधिकार त्यांचा बाकी सार्‍यांनी आणिला आव श्रवणभक्तीचा --अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras

मानिनीस (पूर्ण कविता आठवतेय का?)

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 19/02/2008 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, एक कविता आठवण्याचा प्रयत्न करतोय... बहुधा बा.भ.बोरकरांची आहे. शीर्षक 'मानिनीस' (असेच आहे बहुधा :) आज तुझ्या नयनात मानिनी, शरणागती अनुताप हास्यविनोदांमध्ये तुझ्या अन सलज्ज मूक विलाप व्यथा परि तव आज मानिनी ................... नव्या .... मध्ये अन जूना तुझा अभिमान अशी काही ती कविता आहे. आपल्या पैकी कुणाला ती पूर्ण आठवत असल्यास येथे द्याल का? आभारी, --लिखाळ.
Taxonomy upgrade extras

सूर्योदय

लेखक ॐकार यांनी मंगळवार, 19/02/2008 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसाक्षींच्या सूर्यास्तामुळे मला ही सूर्योदयाची चित्रे टाकावीशी वाटली... नव्या घरातून टिपलेल्या उगवत्या सूर्याच्या छटा... (खालील चित्रप्रतिमेवर क्लीक करा आणि पिकासा अल्बममध्ये चित्रे पहा, किंवा इथे स्लाईड शो पहा)

प्लास्टीक खरंच उपयोगी की उपद्रवी ?

लेखक माझी दुनिया यांनी मंगळवार, 19/02/2008 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही महीन्यांपुर्वी लोकसत्तात शुभदा पटवर्धनांचा ’तरीही का करतोय आपण प्लास्टीकचा वापर’ हा लेख वाचला होता. मागच्याच महीन्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उपसंचालक, डॉ. इथेराधाकृष्णन यांचा ’प्लास्टीक वापरा आणि पर्यावरण वाचवा’ हा लेख वाचला होता. आजच्या लोकसत्तेत त्यावर ब-याच प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या.

हे पाप कुणाचं

लेखक मनस्वी यांनी मंगळवार, 19/02/2008 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस मिसळपाववरच काय पण सगळीकडेच "मुंबई आणि मराठी माणूस" यावर प्रत्येकजण आपापले मत मांडत आहे. त्याचसंदर्भात हा लेख वाचनात आला आणि तुमच्याबरोबर share करावासा वाटला. कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. "काथ्याकुट" मध्ये अशासाठी की तुमच्याही प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. मनस्वी

स्वैराचाराला मान्यता ?

लेखक माझी दुनिया यांनी मंगळवार, 19/02/2008 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच ही बातमी वाचनात आली. आधीच शासनाने लग्नाचे वय कमी करण्याचा घेतलेला निर्णय. शिवाय सध्याच्या युगात लग्नापुर्वी एड्सची चाचणी सक्तीची न करण्याचा घेतलेला निर्णय असे काही निर्णय पहाता तरूण पिढी चुकीच्या दिशेने/वाटेने चालली आहे याची काळजी वाटते. या वृत्तात म्हटल्याप्रमाणे, जे १००० इच्छूक तरूण भाग घेणार आहेत ते किमान विवाहीत असतील याची खातरजमा कंपनी करणार आहे का ? अन्यथा तो स्वैराचाराला पाठींबाच ठरेल.

श्रीमंतयोगी..

लेखक सरपंच यांनी मंगळवार, 19/02/2008 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव परिवाराचा शिवरायांना मानाचा मुजरा...