Skip to main content

चूक१

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 26/02/2008 20:46 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा माणूस१ यांची सुंदर कविता चूक

चूक, कुठे ही, सुधारण्याची संधी आहे?
माळ घातली, ही मरणाची नांदी आहे

रोज वेगळ्या मुली फिरवल्या श्रीमंतांच्या
सापडलो अन झाली ही लटकंती आहे

बोळे असती डाव्या-उजव्या कानामध्ये
घरात अमुच्या म्हणून इतकी शांती आहे

बायको घरी नाही, आता कशास डरणे ?
"कोण बोलले ?हा जरासा शिखंडी आहे !"

सावरकर - नवीन माहीतीपूर्ण संकेतस्थळ

लेखक विकास यांनी मंगळवार, 26/02/2008 20:32 या दिवशी प्रकाशित केले.

आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची ४२वी पुण्यतिथी.  आजच सावरकरांवरील खूप सुंदर आणि माहीतीपूर्ण मराठी-इंग्रजी संकेतस्थळ चालू केले आहे. तेथे माहीतीवाचण्या व्यतिरीक्त एमपी३ मधे सावरकरांचे आणि त्यांच्यावरील इतर मान्यवरांची भाषणे ऐकण्याची व्यवस्था आहे. खाली टाईम्स ऑफ इंडीया मधील बातमी वाचा. (म.टा. ला काय झाले?)

केवळ मिपासदस्यांनी आवर्जून पहावे असे हे संकेतस्थळ वाटल्याने सावरकरांवरील आधीच्या चर्चेत घालण्याऐवजी वेगळे लिहीले आहे. - कृपया गैरसमज नको.

संकेतस्थळः http://www.savarkar.org

कवितासंग्रह

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 26/02/2008 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत आपल्या आयुष्यात अनेक काव्ये आली, त्यांनी आपल्या मनावर आपली छाप पाडली. त्यांना आपण चाली लावल्या. विडंबने केली गेली.

चला तर मग... आपल्या ऐकीवात आलेली किंवा स्वरचित काव्ये येथे मांडूनएक कवितांचा संग्रह करुया.
म्हणजे ज्या कविता अस्तित्वात असूनही कोणाकडून ऐकल्या अथवा वाचल्यागेल्या नसतील, त्या त्यांस येथे येऊन वाचता येतील.

मी सुरुवात करतो.

लायब्ररीबाहेरचा पिंपळ असाच,
प्रत्येक संध्याकाळी सळसळून हसतो,
पुस्तकांत तुझ्या आठवणींची जपून पिंपळपानं,
जाळीत त्यांच्या स्वतःला मी गुंतवून टाकतो.

भेलकांडलेल्या पुस्तकांच्या गर्दीत,

गर्जा महाराष्ट्र माझा!

लेखक मनस्वी यांनी मंगळवार, 26/02/2008 15:34 या दिवशी प्रकाशित केले.

प्रत्येकालाच आपल्या मातीबद्दल अभिमान असतो. आपली मराठी माती म्हणजे आपला महाराष्ट्र!

खानदेश, विदर्भ, मराठवाडा, कोकण... पुणे, जळगाव, मुंबई, नागपूर, सोलापूर, अमरावती, कोल्हापूर, नाशिक एक ना अनेक प्रदेश, शहरे अन् खेडी!

चला तर मग गप्पा मारू आपल्या मातीच्या गप्पा.. ज्या तुम्हाला माहित आहेत.. इतरांना माहित नसतील कदाचित! छोट्या खेड्याबद्दल असेल, निसर्गसौंदर्याबद्दल असेल, तिथल्या माणसांबद्दल असेल, अनुभवांबद्दल असेल.. अगदी काहीही.. जे तुमच्या मनात त्या गावाबद्दल कायमचं घर करून बसलंय........

दिन विशेष

लेखक शेखर यांनी मंगळवार, 26/02/2008 14:11 या दिवशी प्रकाशित केले.

माननीय संपादक,

मिसळपाववर 'दिन विशेष' नावाचे सदर चालु करता येईल का?

ह्या सदरा मध्ये त्या दिवशी घडलेल्या घटना संक्षिप्त रुपात देता येतील.

 

शेखर.

 

बा. भ. बोरकर म्हणतात...

लेखक सृष्टीलावण्या यांनी मंगळवार, 26/02/2008 13:55 या दिवशी प्रकाशित केले.

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, 
सावळे की गोमटे या मोल नाही फारसे... 

 

तुमचा ह्या गोष्टीवर थोडातरी विश्वास आहे का?

असल्यास -

गोरी बायको / नवरा हवा हा बालहट्ट सोडणार का? 

किंवा 

आपण विवाहित असल्यास इतरांना हा बालहट्ट  सोडायला प्रवृत्त 
करणार का?

माझे अभंग माझी गाथा

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 26/02/2008 10:48 या दिवशी प्रकाशित केले.

तात्यांनी  केशवा, टेक युअर ओन टाईम पण येऊ दे एखादे फर्मास विडंबन... असा आदेश सोडला होता, पण मायदेशी परतण्याच्या गडबडीत खरोखरच टाईम जास्त गेला
आमची प्रेरणा नंदन यांची अप्रतिम कविता तिचे अभंग तिची गाथा..

एक तो 'वीकांत' | तेव्हाव्ही आकांत |
झोपाया निवांत | मिळेचिना ||

उशीरा झोपणे | उशीरा उठणे |
निवांत लोळणे | आळशी मी ||

हसावे मिशीत | थोड्याशा खुशीत |
उशी ही कुशीत | घोरताना ||

स्वगत

लेखक निनाद यांनी मंगळवार, 26/02/2008 07:33 या दिवशी प्रकाशित केले.

स्वगत

"बाबा तू येना... बाबा तू ये. मला तू हवाय""


इतकेच म्हणते ही फोनवर. दुसरे काहीच नाही!
काय करावे. मन हेलकावतय. जाण्याची इच्छा तर खूप आहे. पण कसे जमवावे...

इतके दिवस झालेत. इतके म्हणजे किती, तर ती बोबड्या बोलां नंतर चक्क व्यवस्थित बोलू लागलीय.
अरे मग त्यात काय? एका आठवड्यात होते ही प्रोसेस.
फक्त प्रोसेस? आठवड्यात होणारी एक प्रोसेस्?
किती काही आहे त्यात... वाक्य बोलण्यामध्ये सकारण स्प्ष्टीकरण पण येते. मग ते साधेसे बोल विरून जातात् नि उरतात शब्दांचे बुडबुडे.
त्यापेक्षा ते बोबडे पण खरे खुरे बोलच बरे.