Skip to main content

"स्वयेश्री प्रोफेसर पाहती" स्वरचित विडंबन गीत

लेखक प्रा सुरेश खेडकर यांनी गुरुवार, 28/02/2008 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
परीक्षा सुरू होत आहेत,त्यासाठी संबंधितांना शुभेच्छा.कविवर्य गदिमांची क्षमा मागून एक स्वरचित विडंबन गीत सादर करित आहे.
(टीप:ह्यातील कॉलेज माझे व युनिव्हरसिटी माझी नसून तुमची ही नाही.)

स्वयेश्री प्रोफेसर पाहती,परीक्षेत मुले कॉपी करिती.

सुमार सगळे ते डोक्याचे,परंतू पुतळे धैर्यधराचे
समीप गठ्ठे गाईड वह्यांचे,आज ते पहिल्यांदा वाचती.

सावध मुद्रा लक्ष बकांचे,अर्थ लाविती ते प्रश्नांचे
अनर्थ करूनि ते अर्थाचे,पुस्तके भरभर धुंडाळती.

कांही भित्रे त्या वर्गातील,कैसे वाटती आज सुशील
प्रश्न तयांचे कैसे सुटतील,ग्लास पाण्याचे ते ढोसती.

राजा भोज याने कालिदासाला दिलेली समस्या

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 28/02/2008 00:28 या दिवशी प्रकाशित केले.

भोज राजाने फक्त दोन ओळी दिल्या आणि कालिदासाला श्लोक पूर्ण करण्यास सांगितले - काय आहेत त्या दोन ओळी?

--- -- --- ---
--- -- --- ---
सिंदूर बिंदू विधवा ललाटे
ते पाहुनी विस्मय फार वाटे

(उत्तर माहीत असेल तर व्य. नी. तून कळवावे - शुक्रवारी मी अचूक ओळखणार्‍यांच्या नावासह इथे देईन.)

मी कोण होणार? : भाग ३

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 27/02/2008 22:46 या दिवशी प्रकाशित केले.

खाली दिलेले आत्मकथन नाही. पन्नास वर्षांपूर्वी खेड्यात वाढलेल्या मुलांच्या अनुभवाची मिसळ आहे. त्यात चवीसाठी पदरचे तिखटमीठ घातले आहे.


डॉक्टर की कलेक्टर ?

महत्वाची सूचना

लेखक सरपंच यांनी बुधवार, 27/02/2008 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही  दिवसांपासून मिसळपाव वर काही सदस्यांना संकेतस्थळ उघडण्यात अडचण
येत असल्याचे जाणवले.या बाबत अधीक शोध घेतला असता असे निदर्शनास आले की ही अडचण इन्टरनेट एक्प्लोरर ६ व ७ मधेच केवळ आहे. 
या प्रकरणी प्रथम दर्शनी युट्युब चे मिसळपाव वर जोडल्या गेलेले व्हिडीयोज मुळे ही अडचण येते आहे असं दिसतंय.
 
त्यामुळे संकेतस्थळावर असलेले सगळे युट्युब व्हिडीओज पुन्हा संपादित करावे लागतील.

समस्यापूर्ती : चारोळी ..........

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 27/02/2008 13:27 या दिवशी प्रकाशित केले.

माझ्या कॉलेजच्या जीवनात आमच्या 'सांस्कॄतीक संघाची' एक 'पंच लाईन' होती. एकदम झक्कस .......
मला ती माझ्या ब्लोग वर टाकायची आहे पण मला त्या ४ ओळींपैकी फक्त ३ ओळीच आठवत आहेत, तर मला त्याची चौथी ओळ पूर्ण करण्यास मदत करा .........
मी हा 'मिपा' च्या 'चारोळीत्तम लोकांना ' दिलेला 'खो' समजावयास हरकत नाही ....

"जिज्ञासा आमची जननी आहे ,
-------------------------
जिंकण्यासाठीच जन्म घेतो,
यश आमच्या रक्तात आहे ...... "

 

बोलट.

लेखक धमाल मुलगा यांनी बुधवार, 27/02/2008 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार म॑डळी!
शिर्षक पाहून गो॑धळलात? जुन्या जाणत्या लोका॑ना मात्र हा प्रश्न पडला नसेल.
बोलट, म्हणजे नक्की काय बुवा? तो आहे बोल्टचा अपभ्र॑श. आता तुम्ही म्हणाल "बर॑ मग? त्याच॑ काय इथे?"

तर म॑डळी त्याच॑ अस॑ झाल॑ की, काल स॑ध्याकाळी कचेरीतून राहत्या खुराड्याकडे एका॑तवासात जाताना  अचानक मनात मळभ दाटून आल॑...खुराड्याकडे जाव॑स॑च वाटेना. मग पावल॑ आपसुक वळली ती साकीच्या मैखान्याकड॑.
ह॑sss अजुन बोलटाचा गु॑ता काही सुटत नाहीय्ये नाही का? तर ह्या मैखान्यात मला बोलट भेटला.

डायलॉग

लेखक सृष्टीलावण्या यांनी बुधवार, 27/02/2008 11:12 या दिवशी प्रकाशित केले.

माझे एक काका आहेत त्यांना कोणी विचारले की काय, ठीक चालले आहे 
ना... की ते म्हणतात, अहो कसले काय... दात पांढरे झालेत, केस 
हलायला लागलेत... 

कधी म्हणतात... आम्ही जिलबीसारखी सरळ माणसे.. चाल्लयं कसेतरी.. 

असे त्यांचे संवाद झक्कास असतात. ते प्रत्येक वाक्याला हुकुमी टाळी 
घेऊ शकतात.

सरसेनापतींचा सत्त्याहत्तरावा समर्पणदिन

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 27/02/2008 10:15 या दिवशी प्रकाशित केले.

दिनांक २७ फेब्रुवारी २००८ - हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्तक सेनेचे सरसेनापती हुतात्मा ’चंद्रशेखर आझाद’ म्हणजेच चंद्रशेखर सीताराम तिवारी यांचा सत्त्याहत्तरावा समर्पणदिन.
प्रखर राष्ट्रवाद म्हणजे काय ते स्वा. सावरकरांनी दाखवून दिले, धगधगते हौतात्म्य म्हणजे काय ते हुतात्मा भगतसिंगाने दाखवून दिले, समर्पित जीवन म्हणजे काय ते नेताजी सुभाषांनी दाखवून दिले तर एका सेनापतीचा मृत्यू कसा असावा हे हुतात्मा आझादांनी दाखवून दिले.

काळा

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 27/02/2008 07:42 या दिवशी प्रकाशित केले.

तुम्ही काहीही म्हणा, कोणत्याहि काळातील उदाहरण घ्या दोन रंगांनी मानवी समाजजीवनात एक विषेश स्थान पटकावले आहे. मानवी भावविश्व, अर्थविश्व, राजकारण, समाजकारण, काव्य, प्रतिभा अश्या नानाविध ठिकाणी या रंगानी आपला ठसा मानवाच्या आयुष्यात उमटवला आहे. तुम्ही ओळखलंच असेल हे रंग म्हणजे काळा आणि पांढरा