पौष शुद्ध १५
अर्थात शाकंबरी पौर्णिमा
जिजामाता जयंती
मागे पुराणकाळी पृथ्वीवर अवर्षण पडले अन् समस्त मानव प्रजाती अन्नावाचून नष्ट होण्याची भिती निर्माण झाली. मानवाची अन्नायाठी वणवण सूरू झाली. केवळ मानवच नाही तर सकल प्राणीमात्र अन्नावाचून तडफडू लागला अन् नष्टत्वाच्या फेऱ्यात सापडला.
अशा भयाण काळी साक्षात आदिशक्ती जगद्जननी भगवतीचे मातृहृदय तळमळून जागे झाले. आपल्या लेकरांचे दु:ख तिला पाहवेना, सोसवेना. त्याच्या दु:खावर फुंकर घालून ते शांत करण्यासाठी आवश्यकता होती अन्नाची त्यासाठी भगवतीनेच अवतार धारण केला.