Skip to main content

संडे स्पेशल (गरमागरम सुप्स)

लेखक स्वाती राजेश यांनी रविवार, 20/04/2008 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
सूप ही एक अत्यंत पोषक व चवदार डिश आहे. शिवाय करायला अगदी सोपी आणि पचायला हलकी. डाएट फूड म्हणून विषेश लोकप्रिय. १.गाजर आणि कोथिंबीरीचे सूप साहित्यः ४ टे.स्पून बटर ३पातीचे कांदे स्लाईस करून ४५० ग्रॅम गाजर १ टे.स्पून धने पावडर ५ कप पाणी किंवा चिकन स्टॉक १/२ कप गोड घट्ट दही चवीनुसार मीठ, मिरपूड २-३ टे.स्पून सजावटी साठी कोथिंबीर एका मोठ्या पातेल्यात बटर गरम करा. त्यात पातीचे कांदे,गाजर घालून चांगले परतवा.झाकण ठेऊन १० मि. शिजवा, भाज्या मऊ झाल्या पाहिजेत्.धनेपूड घालून १मि.परतवा. स्टॉक घालून मीठ व मिरपूड घाला. उकळी आल्यावर मंद आचेवर२० मि.
Taxonomy upgrade extras

शरद पवारांच्या आवाहनात तथ्य किती?

लेखक देवदत्त यांनी रविवार, 20/04/2008 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
मला राजकारणातील जास्त कळत नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून जे काही माहीत आहे त्यावरून पुढील विवेचन.. शेतकर्‍यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको असे शरद पवार म्हणाले. (पहा बातमी) स्वत:ला काही करणे जमले नाही किंवा काही करायचे नसले तर अशी विधाने बाहेर निघतात का? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकर्‍याला खरच भाव मिळत असल्याचे त्यांना दिसत आहे का? मला नाही तसे वाटत. शेतकर्‍यांना कमी भाव मिळतो. तो माल बाहेर ग्राहकापर्यंत येता येता त्याचा भाव खूप वाढतो असेच दिसते.

भाषा आणि प्रमाण

लेखक नीलकांत यांनी रविवार, 20/04/2008 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून(ण) मिसळपाव वर शुद्धलेखन(ण) आणि(न) प्रमाण(न) भाषेचा जयघोष चालला आहे. काय आहे हो ही प्रमाण(न) भाषा? प्रमाण कशासाठी हवं? आणि प्रमाणा(ना)चं प्रमाण किती असावं? 'चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य. त्याकाळी मराठीला प्राकृत म्हणत असत. त्यानंतर आमच्या अमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीत 'ज्ञानेश्वरी' लिहिल्या गेली. सुरुवातीला मराठीत पद्य रचनाच लिहिल्या जायच्या. लिहायला कमी जागा, गेयता असल्यामुळे सहज मुखोद्गत होत असत आणि सहज प्रसार होई.

एक अशीही केस...

लेखक अजय जोशी यांनी रविवार, 20/04/2008 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
काळा असल्यावर सर्वांनाच आवडतो पांढ-याच्या नशीबात बायकोचाही नसतो

हे क्रांतिकारकांनो!

लेखक अजय जोशी यांनी रविवार, 20/04/2008 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
हे क्रांतिकारकांनो, बरं झालं तुम्हीच क्रांतिकारक झाला देशासाठी आता वेळ आहे कुणाला? बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला खाणं, पिणं, मौजमजेला वेळ आम्हाला दिला बरं झालं तुम्ही रक्त, मांस सांडलं प्रत्येकानं आपापलं घर त्यावर बांधलं बरं झालं तुम्ही चलेजाव म्हटलं संस्कार नि संस्कृतीला सहज आम्ही सोडलं बरं झालं तुम्ही तिरंगा फडकाविला प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला खुर्चीसाठी भांडायला चान्स आम्हाला दिला चू.भू.दे.घे.